श्रीमंत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज अभंग पंचविशी

श्रीमंत जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज
अभंग पंचविशी
१. आईवडील
१ मायबापे केवळ काशी । तेणें न वजावे तीर्थासी ।। १ ।। पुंडलीकें काय केले ? । परब्रह्म उभे ठेले ।। २ ।। तैसा होई सावधान । हृदयीं धरी नारायण ।। ३ ।।
तुका म्हणे मायबापे । अवघी देवाची स्वरूपे ।॥ ४ ॥ (२०६
जगामधे जिथं आपलं मस्तक नम्रपणानं झुकवावं असं आपलं पहिलं श्रद्धास्थान म्हणजे आपले आईवडील. तुकाराम महाराज त्यांच्याविषयी म्हणतात,
आईवडील म्हणजे शुद्ध काशी होत. जो मनुष्य आईवडिलांच्या सहवासात असेल, त्यानं काशीची तीर्थयात्रा केल्यासारखं होतं. त्यानं तीर्थयात्रेला जाण्याची गरज नसते. अशा वेळी पुंडलिकानं काय केलं, ते ध्यानात घ्यावं. तो आईवडिलांची सेवा करणं थांबवून देवाकडं धावला नाही. त्यानं देवालाच उभं रहायला लावलं. तेव्हा, प्रत्येकानं पुंडलिकाप्रमाणं सावध रहावं. ईश्वराला आपल्या हृदयात ठेवावं, पण त्याला प्राप्त करण्यासाठी आईवडिलांची सेवा करणं थांबवू नये. कारण, आईवडील म्हणजे पूर्णांशानं ईश्वराचं स्वरूप होत. तुकाराम महाराज आपल्याला सांगत आहेत, की आईवडिलांची सेवा हीच ईश्वराची पूजा होय दीनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा मेसेज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल दावा कमेंट करा




