सोशल

महात्मा फुले सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मयाप्रमाणे फुले चित्रपटातील एकी हि शब्द कट केल्यास तीव्र आंदोलन!

महात्मा फुले सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मयाप्रमाणे फुले चित्रपटातील एकी हि शब्द कट केल्यास तीव्र आंदोलन!

 

अखिल भारतीय माळी महासंघ च्या वतीने मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन! N

मा.ना. देवेंद्रजी फडणवीस साहेब,
मुख्यमंत्री,
महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई-३२.
विषय :-
१) फुले चित्रपट महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या शासनप्रकाशित समग्र वाङ्‌मयाप्रमाणे असल्यास त्याचा कोणताही भाग व कोणतेही शब्द कट करु नयेत.
२) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ शाखा १) नाशिक २)
अहिल्यानगर शाखेचे बदलणेबाबत. व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा लोगो विषमतेचे प्रतीक शनिवारवाडा बदलून समतेचे प्रतीक फुलेवाडा कर ने बाबत
महोदय,
आपणांस कळविण्यात येते की, फुले चित्रपट ११ एप्रिल २०२५ रोजी महात्मा फुले १९८ वी जयंतीच्या मुर्हतावर प्रदर्शन होणार होता परंतु काही समाजकंटक जातीयवाद्यांनी त्यातील काही भाग त्यांच्या सोयीप्रमाणे कट करण्यासाठी ठराविक एक ते दीड टक्का असणा-या लोकांनी हजारो वर्षापासून बहुजन महापुरुषांना, फुले दामपत्यांना अत्यंत नीच प्रवृत्तीने त्रास दिला आहे. आजही त्या शक्ती १७५ वर्षानंतर ही डोके वर काढत आहेत. त्यांचा र’ त्वरीत
.बंदोबस्त करावा अन्यथा सेन्सर बोर्डामधील सदस्यांच्या प्रत्येकाच्या घराला घेराव घातला जाईल. त्यातुन उद्रेक झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शासनावर असेल. २) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची शाखा नाशिक यांचे नाव बदलून बळीराम हिरे असे करण्याचा प्रयत्न चालू आहे. तसेच या विद्यापीठाची शाखा अहिल्यानगर या शाखेचे नाव बाळासाहेब विखे पाटील किंवा अन्य लोकांचे नाव देण्याचा प्रयत्न चालू आहे. तो त्वरीत थांबवावा नाशिक शाखेचे नाव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नाशिक व अहिल्यानगर शाखेचे नाव सावित्रीबाई फुले विद्यापीठ अहिल्यानगर असे राहिले पाहिजे. बोधचिन्ह बदलून समतेचे प्रतिक “फुलेवाडा” असे करावे. हा ठराव आखिल भारतीय माळी महासंघाच्या बैठकीमध्ये एकमताने मंजूर झाला आहे. वरील ठरावाची अंमलबजावणी शासनाने न केल्यास महाराष्ट्रातील व देशातील माळी ओबीसी व फुले प्रेमी एकत्र येऊन वेगवेगळया प्रकारची तीव्र आंदोलने करणार आहेत. यांची वेळीच दखल घ्यावी. ही नम्र विनंती.

अन्यथा होणा-या परिमाणास महाराष्ट्र शासनच जबाबदार असेल. तरी वरील मागण्यांचा गाभीर्याने विचार करुन सकारात्मक निर्णय त्वरीत घेण्यात यावा, ही नम्र विनंती.

आपल

शंकरराव लिंगे
अखिल भारतीय माळी महासंघ
माहितीसाठी.-१) मा.ना. अतुलजी सावे साहेब, इतर मागास बहुजन विकास मंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
२) मा. ना. पंकजाताई मुंडे वनमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई
३) मा. ना. दत्तात्रय भरणे, क्रिडा व युवक कल्याण मंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई
४) मा. ना. जयकुमार गोरे साहेब, ग्राम। कास पंचायतराज मंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनाही निवेदन नाची प्रेत देण्यात आली असल्याचे सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी दिनबंधू न्यूज साठी सांगितले आहे

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button