🌹🌹🙏 अकोला माजी मंत्री सुधाकररावजी गणगणे साहेब यांना सत्यशोधक शंकरराव लिंगे यांची सदिच्छा भेट, हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🙏

🌹🌹🙏 अकोला माजी मंत्री सुधाकररावजी गणगणे साहेब यांना सत्यशोधक शंकरराव लिंगे यांची सदिच्छा भेट, हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🙏
अकोला येथील निवासस्थानी माननीय माजी मंत्री, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व राज्यव्यापी संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष माननीय सुधाकररावजी गणगणे साहेब यांची अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी सदिच्छा भेट घेऊन वा हार्दिक शुभेच्छा दिल्या.
माननीय सुधाकररावजी गणगणे साहेब हे काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत ज्येष्ठ नेते असून गांधी घराण्यावर त्यांचा अतूट विश्वास आहे. विद्यार्थी दशेपासून त्यांनी महाराष्ट्र प्रदेश **एन.एस.यू.आय.**चे अध्यक्षपद भूषविले. अवघ्या पंचविसाव्या वर्षी ते आमदार झाले आणि पुढे मंत्रीपदाची जबाबदारी त्यांनी समर्थपणे सांभाळली.
आपल्या कारकिर्दीत त्यांनी अकोला जिल्ह्यात शेतीसाठी पाणी, शेती सुधारणा, कालवे, बंधारे, सूतगिरण्या तसेच शैक्षणिक संस्था उभारून त्या सक्षमपणे वाढवल्या. त्यांच्या काळात राबवलेल्या पाणी प्रकल्पांचा लाभ आजही शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होत आहे.
ओबीसी समाजासाठी त्यांनी अतिशय मोलाचे कार्य केले. सन 2003 साली जनगणनेचा डाटा नसल्याने व ट्रिपल टेस्ट न झाल्यामुळे ओबीसी आरक्षण रद्द झाले होते. त्या काळात ओबीसी संघर्ष समितीच्या माध्यमातून त्यांनी उभारलेल्या आंदोलनाला यश मिळाले आणि ओबीसींचे २७ टक्के आरक्षण पुन्हा सर्व क्षेत्रांत लागू झाले.
स्वातंत्र्यानंतर तब्बल पन्नास वर्षे ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नव्हती. या अन्यायाविरोधात त्यांनी उभारलेल्या ओबीसी संघर्ष समितीच्या आंदोलनात सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी सत्यशोधक शंकरराव लिंगे यांच्याकडे होती. सोलापूर जिल्ह्यात भव्य रथयात्रा काढण्यात आली आणि या लढ्याला यश मिळाले. परिणामी महाराष्ट्रातील सुमारे चार लाख ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.
या निर्णयाला तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी मान्यता दिली, तर सन 2004 मध्ये आर्थिक तरतूद सुशीलकुमार शिंदे यांनी केली. या तिघांच्या नेतृत्वामुळे देश स्वतंत्र झाल्यानंतर पन्नास वर्षांनी ओबीसी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळू लागली, जी आजतागायत सुरू आहे. हे शैक्षणिक क्षेत्रातील अत्यंत मोठे आणि ऐतिहासिक कार्य मानले जाते.
यावेळी सुधाकररावजी गणगणे साहेब यांच्या प्रकृतीची सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी विचारपूस केली. सध्या त्यांची तब्येत उत्तम असल्याचे त्यांनी सांगितले. सध्याच्या परिस्थितीमध्ये ओबीसी आरक्षण राजकीय सामाजिक विषयावर सखोल चर्चा झाली तसेच वहिनी सौ. सूनंदा सुधाकररावजी गणगणे यांचीही भेट घेऊन तब्येतीची चौकशी केली. नुकतेच त्यांच्या दोन्ही गुडघ्यांचे ऑपरेशन यशस्वी झाले असून त्या सध्या व्यवस्थित चालण्याचा प्रयत्न करीत आहेत.
या दांपत्याला दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी लाभो, अशा मनःपूर्वक शुभेच्छा देत सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांचे आशीर्वाद घेतले. याप्रसंगी अखिल भारतीय माळी महासंघाचे विश्वस्त मनीष हिवराळे व महेश गणगणे उपस्थित होते.
—
📲 सोशल मीडिया संदेश
हा नंबर आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये नक्की जोडा – 7387377801
बातमी लाईक करा 👍
शेअर करा 🔁
सबस्क्राईब करा ▶️
फॉरवर्ड करा 📤
कॉमेंट करा 💬
🔔 बेल आयकॉन दाबायला विसरू नका!
—
🔖 हॅशटॅग
#सुधाकरराव_गणगणे
#सत्यशोधक_शंकरराव_लिंगे
#अखिल_भारतीय_माळी_महासंघ
#ओबीसी_संघर्ष
#सामाजिक_न्याय
#_शुभेच्छा
#दिनबंधू_न्यूज




