महाराष्ट्रसोशल

परतूर (जि. जालना) | सत्यशोधक शंकरराव लिंगे यांची सांत्वन भेट. अॅड. माणिकराव तुळशीरामजी काळे (BA, LLB)वय ८५रा. परतूरयांचे वृद्धापकाळाने दि. २७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुःखद निधन

 

 

 

  • 1 lपरतूर (जि. जालना) | सत्यशोधक शंकरराव लिंगे यांची सांत्वन भे ट अॅड. माणिकराव तुळशीरामजी काळे (BA, LLB)वय ८५रा. परतूरयांचे वृद्धापकाळाने दि. २७ नोव्हेंबर २०२५ रोजी दुःखद निधन 1झाले
  • .

अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष, ओबीसी नेते सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी जालना जिल्ह्यातील परतूर येथे स्व. अॅड. माणिकराव तुळशीराम काळे यांच्या राहत्या घरी जाऊन कुटुंबीयांची सांत्वन भेट घेतली.

यावेळी अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹

कुटुंबीयांचा परिचय

स्व. अॅड. माणिकराव काळे यांच्या पश्चात — l

विनायक माणिकराव काळे – माजी नगराध्यक्ष, परतूर

शिवनाथ माणिकराव काळे – न्यायाधीश, जिल्हा सत्र न्यायालय, मुंबई

बाळासाहेब माणिकराव काळे – संचालक, वर्ध विनायक लॉन्स, परतूर

डॉ. संतोष माणिकराव काळे (MBBS) – वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय

कन्या : सौ. संजीवनी संजयराव ठाकरे, सिंदखेडराजा

तसेच नातवंडे, सुना, जावई असा मोठा, सुसंस्कृत व स्वयंपूर्ण परिवार आहे.

सामाजिक, राजकीय व कायदे क्षेत्रातील योगदान

स्व. अॅड. माणिकराव काळे यांनी परतूर, परभणी व जालना विभागात वकील क्षेत्रात उल्लेखनीय सेवा दिली.

क्रिमिनल प्रकरणांमध्ये त्यांचा खोल अभ्यास, प्रेमळ स्वभाव व पुरोगामी विचारसरणी सर्वश्रुत होती.

ते महात्मा फुले, शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन कार्यरत होते.

त्यांनी पुलोद, राष्ट्रवादी काँग्रेस भारिप बहुजन महासंघ भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षा सोबत कार्य केले.

१९९९ पासून ओबीसी संघर्ष समितीत कार्य करत असताना, तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख व संस्थापक माननीय सुधाकरराव गणगणे साहेब यांच्या सोबत त्यांनी सक्रिय भूमिका बजावली.

२००३ साली रद्द झालेले ओबीसी आरक्षण पुन्हा मिळवून देण्यासाठीच्या लढ्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता.

चार लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व सहकार क्षेत्रात ओबीसींना दोन संचालक राखीव जागा मिळवून देण्याच्या आंदोलनातही त्यांचे मोठे योगदान होते.

१९९५ साली भारिप बहुजन महासंघाच्या तिकिटावर परतूर विधानसभा निवडणूक त्यांनी लढवली होती.

परतूर नगर परिषदचे उपाध्यक्ष पदही त्यांनी भूषविले होते.

पोकळी कधीही न भरून निघणारी

स्व. अॅड. माणिकराव तुळशीराम काळे यांच्या निधनाने परतूर–जालना–परभणी परिसरातील एक अभ्यासू, संवेदनशील व लढवय्ये नेतृत्व हरपले आहे.

सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व न्याय क्षेत्रात गेल्या ५० वर्षांत दिलेली सेवा कधीही विसरता येणार नाही.

या महान आत्म्यास सद्गती लाभो, तसेच त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी यावेळी निर्माकास केली.

श्रद्धांजली अर्पण करणाऱ्या संस्था

शिवक्रांती टीव्ही

दिनबंधू न्यूज

लिंगे उद्योग समूह

अखिल भारतीय माळी महासंघ

राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद

संस्थापक – माननीय छगनरावजी भुजबळ साहेब

राज्य ओबीसी संघर्ष समिती

संस्थापक – माननीय सुधाकरराव गणगणे साहेब

यांच्या वतीने

आदरांजली | श्रद्धांजली | विनम्र अभिवादन..🙏🙏🙏🙏🌹🌹🌹:🌹🌹🌹🌹🌹

📲 सोशल मीडिया संदेश

ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा.

लाईक 👍 शेअर 🔄 फॉरवर्ड 📤 करा.

📞 संपर्क : ७३ ८७ ३७ ७८ ० १

दिनबंधू न्यूज | संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button