सोलापूर

मंगळवेढा तालुका अध्यक्षपदी संतोष गोडसे यांची निवड — सर्व समाजातून आनंदाची प्रतिक्रिया

 

मंगळवेढा तालुका अध्यक्षपदी संतोष गोडसे यांची निवड — सर्व समाजातून आनंदाची प्रतिक्रिया l!

मंगळवेढा तालुका, सोलापूर :


अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या मंगळवेढा तालुका अध्यक्षपदी मल्लेवाडी गावचे प्रसिद्ध फुल व्यवसायिक संतोष गोडसे यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे तालुक्यातील बीसी, ओबीसी आणि अल्पसंख्यांक समाजातून आनंद व्यक्त करण्यात येत असून, संतोष गोडसे यांच्या नेतृत्वाबद्दल व्यापक विश्वास दाखविण्यात आला आहे.

या निवडीप्रसंगी सत्यशोधक शंकरराव लिंगे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष बापूसाहेब भंडारे, मधुकर गोडसे, अशोक माळी, चेअरमन धनंजय माळी, सुरेश माळी, अजय माळी, दत्तात्रय भुसे, शंकरराव माळी (माजी नगराध्यक्ष) आदी मान्यवर उपस्थित होते.

निवडीस माननीय नामदार छगनरावजी भुजबळ (अन्न व नागरी पुरवठा मंत्री, महाराष्ट्र राज्य) यांची लवकरच सहीने अधिकृत मान्यता देऊन निवडपत्र समारंभपूर्वक प्रदान केले जाणार आहे.

संतोष गोडसे हे मागील १५–२० वर्षांपासून फुल व्यापार क्षेत्रात कार्यरत असून, त्यांचे विविध समाज घटकांशी विस्तृत संपर्क जाळे आहे. समाजकार्याची आवड, संघटन कौशल्य आणि सर्वसमावेशक दृष्टीकोन यामुळे त्यांच्या निवडीनंतर समता चळवळीला तालुक्यात नवी गती मिळेल, अशी भावना व्यक्त होत आहे.

या आनंददायी प्रसंगी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी निवडीस मान्यता देत संतोष गोडसे यांचे अभिनंदन केले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

सोशल मीडिया सूचना

शिवक्रांती टीव्ही — दिनबंधू न्यूज
संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
73 87 37 78 01
हा नंबर आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये नक्की जोडा!
लाईक • शेअर • सबस्क्राईब • फॉरवर्ड • कमेंट करा
बेल आयकॉन दाबा — विसरू नका!

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button