सत्यशोधक समाज स्थापनेच्या 151 व्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त

सत्यशोधक समाज स्थापनेच्या 151 व्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षांनिमित्त सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः 40
प्रसिद्ध करून गोविंद मुकुंद यास न्याय मिळवून दिला. अस्पृश्यांच्या समस्यांना धसास लावण्यासाठी शिवराम कांबळे यांनी पुढाकार
घेऊन, प्रथमच मौजे सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे येथे ५१ गावांच्या महारांची सभा आयोजित केली होती. या कार्यक्रमात अस्पृश्र्याच्या जटिल प्रश्नांची चर्चा होऊन, एक निवेदन तयार करून त्यावर १५८८ अस्पृश्यांच्या स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या.
प्रस्तुत निवेदन मुंबई सरकारकडे रवाना करण्यात आले. मात्र मुंबई सरकारने या निवेदनाची दखल न घेतल्याने कांबळे यांनी प्रस्तुत अर्ज केंद्र सरकारकडे पाढविला, ‘सैन्यात महारांची भरती करावी’ या मुद्द्याची सरकारने दखल तर घेतली, मात्र सैन्यभरतीच्या अनुषंगाने असमर्थता प्रगट केली,
१ ऑगस्ट १९०४ रोजी कांबळे यांनी पुणे लष्करातील सेंटर रस्त्यावरील घर नं. ४७ मध्ये ‘श्री शंकर प्रासादिक सोमवंशीय हितचिंतक मित्र समाज’ या संस्थेची स्थापना केली. याच सुमारास त्यांनी एक शाळाही सुरू केली होती. मात्र ही शाळा फार दिवस चालली नाही.
तत्कालीन समाज जागृतीसाठी शिवराम कांबळे यांनी १ जुलै १९०८ रोजी ‘सोमवंशीय मित्र’ हे नियतकालिक (मासिक) पुणे येथून सुरू केले. हरिवा शिवराम उबाळे, गणपतराव हणमंत गायकवाड, जोरदास रामजी भालेराव आदींनी या पत्रास आर्थिक साहा केले.
थोड्याच कालावधीत ‘सोमवंशीय मित्र’ पत्र लोकप्रिय झाले. ‘सोमवंशीय मित्र’पत्र लोकप्रिय झाल्यावर सयाजीराव महाराज गायकवाड यांनी शिवराम कांबळे यांना बडोद्यास बोलावून त्यांचा उचित सन्मान केला (१३ सप्टेंबर १९०८). हे पत्र प्रामुख्याने से. परंतु मुरळी लग्न प्रथेच्या चळवळीला उचलून धरल्यामुळे बहधा हे पत्र बंद पडले असावे !
जेजुरी येथे ५ एप्रिल १९१० रोजी कांबळे यांनी महार जाती बांधवांची दुसरी परिषद भरविली. या परिषदेत कांबळे यांनी अस्पृश्य बांधवांच्या प्रश्नांसंबंधीच्या निबंधाचे वाचन केले. या परिषदेला महर्षी विठ्ठल रामजी शिंदे आवर्जून उपस्थित होते. ते ‘डिप्रेस्ड क्लासेस कमिटी’साठीही १९२१साली अग्रभागी राहिले, अस्पृश्य बांधवांच्या मानवमुक्तीसाठी शिवराम कांबळे यांनी पर्वती मंदिर सत्याग्रह केला.
पुणे येथील पर्वती मंदिर अस्पृश्य बांधवांसाठी खुले व्हावे म्हणून २२ सप्टेंबर १९२९ रोजी रामेश्वर मंदिराजवळील सेल्फ गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन हॉलमध्ये या प्रश्नी एक सभा आयोजित करण्यात आली. या प्रसंगी सत्याग्रह समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी
शिवराम कांबळे यांची निवड करण्यात आली. भवती न भवती होऊन १३ ऑक्टोबर १९२९ रोजी या सत्याग्रहाला शिवराम कांबळे यांच्या नेतृत्वाखाली अखेर तोड फुटले. पर्वतीच्या पायथ्याशी आरंभी शिवराम कांबळे, पो. ना. राजभोज, न. वि. गाडगीळ, थोरात आदी सत्याग्रही नेत्यांची भाषणे झाली. या प्रसंगी सत्याग्रहीच्या पाच तुकड्या करण्यात आल्या. यातील दुसऱ्या क्रमांकाच्या तुकडीचे नेतृत्व कांबळे यांनी केले. या प्रसंगी तानुबाई (पत्नी) आणि शेवंताबाई ओगले (कन्या) याही सत्याग्रहात सहभागी झाल्या.
या प्रसंगी पुणे येथील ज्येष्ठ सत्यशोधक केशवराव जेधे, ‘विजयी मराठा’ कार सत्यशोधक श्रीपतराव शिंदे, ‘मजूर’कार रामचंद्र लाड आदी दिग्गज सत्यशोधक नेते आवर्जुन उपस्थित होते. हा सत्याग्रह बरेच दिवस चालला, पुढे मंदिर प्रवेश सत्याग्रहाची मोहीम चालूच राहिली. दरम्यान न. चिं. केळकर, जमनालाल बजाज यांनी मंदिर पंच समितीशी मध्यस्थी करण्याचे आश्वासन दिल्याने काही दिवस मंदिर सत्याग्रह तहकुबीचा निर्णय कांबळे यांनी घेतला. मात्र मध्यस्थी यशस्वी न झाल्याने प्रस्तुत आंदोलन तीव्र झाले. इतकेच नव्हे तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या सत्याग्रहास पाठिंबा दिला. या आंदोलनाने मंदिर प्रवेश चळवळीला देशभर प्रोत्साहन मिळाले.
३० व ३१ मे आणि १ जून १९२० रोजी नागपूर येथे बहिष्कृत भारत परिषदेचे अधिवेशन झाले. या परिषदेचे अध्यक्ष राजर्षी शाहू महाराज होते. या परिषदेत शिवराम कांबळे यांचे व्याख्यानही झाले. यापूर्वी १९१९८ साली संपन्न झालेल्या माणगाव अस्पृश्य परिषदेला कांबळे आवर्जून उपस्थित होते.
सत्यशोधक शिवराम कांबळे यांचे मराठा दीनबंधु, दीनबंधु, दीनमित्र, डेक्कन हेरॉल्ड, ज्ञानप्रकाश आदी पत्रांना लेखन लाभले. विशेष म्हणजे ३० मार्च १९०७ आणि १३ एप्रिल १९०७ च्या ‘दीनबंधु’ पत्राच्या दोन अंकास त्यांचे ‘एक महार गृहस्थाचे उद्गार’ शीर्षकाचे खुले पत्र विभागून प्रसिद्ध झाले आहे. या पत्रात प्रामुख्याने वर्णव्यवस्था आणि अस्पृश्यता निर्मूलनाच्या अनुषंगाने विस्तारपूर्वक विचार मांडले आहेत. तसेच अस्पृश्यता निर्मूलनासाठी हिंदूधर्मीयांसाठी विविध धर्मग्रंथ नसावेत, सकल हिंदूंसाठी एकच धर्मग्रंथ असावा म्हणून सुचविले आहे.
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




