डोळ्याचे पारणे फेडणारा नाशिकच्या फुले स्मारकातील क्रांतीसूर्याचा जयंती सोहळा!

डोळ्याचे पारणे फेडणारा नाशिकच्या फुले स्मारकातील क्रांतीसूर्याचा जयंती सोहळा!

आज आपल्या नाशिकमधील मुंबई नाका येथील फुले स्मारकात क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांचा नेत्रदीपक जयंती सोहळा अत्यंत उत्साहात पार पडला. पालखीच्या मिरवणुकीसह या सोहळ्यात सहभागी झालो आणि क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून वंदन केले.
यानिमित्त भव्य चित्ररथ मिरवणुकीत फुलेप्रेमी जनता अतिशय उत्साहाने सहभागी झाली होती. छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई आंबेडकर यांच्या वेशभूषा करून सहभागी झालेले कलाकार सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. नकळत त्यांच्यासमोर नतमस्तक झालो.
नवनिर्मित फुले स्मारकातील क्रांतिसूर्य महात्मा फुलेंचा हा जयंती सोहळा फुलेप्रेमींचा ओसंडून वाहणारा उत्साह आणि अभिनवतेने संपन्न झाल्याने खऱ्या अर्थाने अभूतपूर्व असा ठरला. यावेळी उपस्थितांशी संवाद साधत सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी खासदार राजाभाऊ वाजे, खासदार डॉ. शोभा बच्छव, माजी खासदार समीर भुजबळ, आमदार सत्यजित तांबे, सीमाताई हिरे, माजी आमदार वसंत गिते, जेष्ठ नेते दिलीप खैरे, नानासाहेब महाले, सुनिल बागूल, दत्ता गायकवाड, प्रकाश लोंढे, बाळासाहेब कर्डक, शिवसेना जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते, भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, विष्णुपंत म्हैसधूने, शिवसेना महानगरप्रमुख डी. जी. सूर्यवंशी, गणेश गिते, विनायक पांडे, आकाश छाजेड यांच्यासह फुलेप्रेमी जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती.
#दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात
#दिन बंधू न्यूज
#शिवक्रांती टीव्ही#
#माजी ऊप मुख्यमंत्री छगन भुजबळ
#अतुल सावे ओबीसी कल्याण मंत्री
#आमदार गोपीचंद पडळकर
#मंत्री दत्तामामा भरणे #मंत्री पंकजाताई मुंडे
#obc
#एससी
#एसटी
#अल्पसंख्यांक
#, गरीब अल्प भूधारक शेतकरी
#MahatmaPhuleJayanti #Mahatmaphule #Nashik #yeola #Maharashtra #educationist #SocialReformer



