सोशल

“महात्मा फुले वाड्यावर” ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आंदोलन

“महात्मा फुले वाड्यावर” ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आंदोलन

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. बाळासाहेब प्रकाश आंबेडकर यांचे महात्मा फुलेंच्या क्रांती विरोधात कार्य करणाऱ्या शक्तीच्या विरोधात आंदोलन. महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या कार्यास दीडशे वर्षे पूर्ण झाली तरी त्यांच्या क्रांतिकारी कार्यास विरोध करणाऱ्या शक्ती आजही आहेत. त्यांना विरोध करण्यासाठी आज प्रकाश आंबेडकर यांनी महात्मा फुले वाड्यावर आंदोलन केले. ते म्हणाले, महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांचे जे कार्य आहे ते महाराष्ट्रात घराघरात पोहोचलेले आहे. देशात सर्वत्र पोहोचलेले आहे. जगात देखील पोहोचत आहे आणि असे कार्य हे आता शासनाने ही मान्य केलेले आहे.

फुले यांच कार्य क्रांतिकारक देश घडवणार आहे. त्यामुळे १५० वर्षा नंतर देखील सनातन्यांची जळत आहे. त्यामुळे कोणीही याचा विरोध करू शकत नाही. “फुले”या चित्रपटामध्ये काही सीन्स आहेत. ते सीन्स काढून टाकण्याबद्दल सेन्सर बोर्ड ची भूमिका घेत आहे. ती चुकीची आहे. शासन मान्य फुले वाड़मयाचा चा जो भाग आहे तो कट कराता येणार नाही. सेंसर बोर्डातील सदस्यांची स्वतः ची विचारसरणी चालवता येणार नाही . त्यांना तो अधिकार नाही. असं स्पष्ट मत आंबेडकर यांनी मांडलेले आहे. ज्या सत्यघटना आहेत, त्या घटना महात्मा फुले, सावित्रीबाई फुले समग्र वाड़मयामध्ये आहेत. त्या घटनेचा विरोध या सेंसॉर बोर्डाला करता येणार नाही.

जर असा त्यांनी विरोध केला किंवा जर पक्षपाती धोरण घेतलं आणि काही सीन्स कट केले तर ,सेंसॉर बोर्डाच्या सदस्याच्या एका सदस्याच्या घरी जाऊन आम्ही आंदोलन करू असा इशाराही प्रकाश आंबेडकर यांनी आज फुले वाड्यावर बोलताना दिला. ते पुढे बोलताना म्हणाले की, जो राणा 26 / 11 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील हल्ल्यातील जो आरोपी आहे. त्यांना जो अमेरिकेतून पकडून आणले आहे तो मुख्य आरोपी नाही. त्याची फार मोठी भूमिका नाही.

त्याची भूमिका एक कस्पटा सारखी तुटपुंजी आहे. त्या काळातले होम सेक्रेटरी पिलाई यांचे स्टेटमेंट पहा. त्यामुळे भारत सरकारचे फार मोठे यश वैगेरे नाही. ढोल ताशा बडवून घेऊ नये. महात्मा फुले यांच्या स्मारकाच्या विस्तारीकरणाबद्दल बोलताना आंबेडकर म्हणाले, माननीय भुजबळ साहेबांनी आंदोलन करू नये. ते शासनातच आहेत आणि ते ज्या पक्षात आहे त्या पक्षाचे अध्यक्ष अजित पवार हेच सरकार चालवत असल्याचे दिसत आहे. त्यांच्याबरोबर बसून एक टाईम बॉण्ड मध्ये महात्मा फुले स्मारकाच्या विस्तारीकरणाचा किंवा जागा अधिग्रहण करण्याचं काम जे आहे ते आराखडा तयार करून मंजूर निधी कसा उपलब्ध होईल त्याकडे लक्ष केंद्रीत करावं. असा सल्लाही आंबेडकर यांनी दिला

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button