शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण; सोलापुरात ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ निमित्त विशेष कार्यक्रम

शिवछत्रपतींच्या शुद्धीकरण मोहिमेला ३५० वर्षे पूर्ण; सोलापुरात ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ निमित्त विशेष कार्यक्रम
सोलापूर | प्रतिनिधी
सोलापूर येथील श्रमिक पत्रकार संघ येथे आज आयोजित पत्रकार परिषदेत हिंदू जनजागृती समिती आणि हिंदू राष्ट्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने २ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वाजता आयोजित करण्यात येणाऱ्या ‘राष्ट्रीय शुद्धीकरण दिन’ विशेष कार्यक्रमाची माहिती देण्यात आली.
पत्रकार परिषदेत हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य समन्वयक श्री. सुनील घनवट यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती नेताजी पालकर यांच्या ऐतिहासिक शुद्धीकरण (घरवापसी) घटनेला यंदा ३५० वर्षे पूर्ण होत असून, त्या स्मरणार्थ हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
यावेळी कार्यक्रमामध्ये धर्म, इतिहास, सामाजिक जागृती आणि शुद्धीकरण मोहिमेच्या ऐतिहासिक महत्त्वावर विविध मान्यवर मार्गदर्शन करणार असल्याची माहिती देण्यात आली.
पत्रकार परिषदेला उपस्थित मान्यवर :
श्री. सुनील घनवट – राज्य समन्वयक, हिंदू जनजागृती समिती (महाराष्ट्र व छत्तीसगड)
श्री. रवी गोणे – शहर संघटक, हिंदू राष्ट्र सेना
श्री. प्रसाद पंडित – धर्माधिकारी
🖋️ संपादकीय संदेश
इतिहासातील घटनांचा अभ्यास करताना तथ्यांवर आधारित चर्चा, सामाजिक सलोखा आणि संविधानिक मूल्यांचा आदर राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. विविध मतांचा सन्मान ठेवून समाजात संवाद आणि बंधुभाव वाढविणे हेच लोकशाहीचे बळ आहे
📺 दीनबंधू शिवक्रांती टीव्ही
संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
📱 संपर्क : 73 87 37 78 01
👉 हा नंबर आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये जोडा.
👍 बातमी लाईक करा.
📤 शेअर करा.
▶️ सबस्क्राईब करा.
📨 फॉरवर्ड करा.
💬 कमेंट करा.
🔔 बेल आयकॉन दाबा.
🟢 दिनबंधू न्यूज WhatsApp चॅनल फॉलो करायला विसरू नका.
#हॅशटॅग
#दिनबंधू_न्यूज #शिवक्रांतीTV #सोलापूर #पत्रकारपरिषद #हिंदूजनजागृतीसमिती #राष्ट्रीयशुद्धीकरणदिन #नेताजीपालकर #रवीगोणे #सुनीलघनवट #प्रसादपंडित #महाराष्ट्र #BreakingNews




