सोलापूर

🔥 अखिल भारतीय माळी महासंघाचा मोठा निर्णय! प्रा. डॉ. अविनाश विठ्ठलराव खरात यांची अमरावती विभाग शिक्षक आघाडीच्या अध्यक्षपदी निवड; फुले दांपत्याच्या २०० व्या जयंतीनिमित्त राज्यव्यापी जनआंदोलनाची घोषणा! 🔥

🔥 अखिल भारतीय माळी महासंघाचा मोठा निर्णय! प्रा. डॉ. अविनाश विठ्ठलराव खरात यांची अमरावती विभाग शिक्षक आघाडीच्या अध्यक्षपदी निवड; फुले दांपत्याच्या २०० व्या जयंतीनिमित्त राज्यव्यापी जनआंदोलनाची घोषणा! 🔥

बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील प्रा. डॉ. अविनाश विठ्ठलराव खरात (एम.पी.एड., पीएच.डी.), डायरेक्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स, संत भगवान बाबा कला महाविद्यालय, सिंदखेडराजा, यांची अखिल भारतीय माळी महासंघाच्या अमरावती विभाग शिक्षक आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ही नियुक्ती प्रदेशाध्यक्ष शिक्षक आघाडी मा. मनिषजी गिऱ्हे, अमरावती विभाग अध्यक्ष मा. शरदजी बनकर, विभाग उपाध्यक्ष मा. राजेंद्रकुमार पल्हाडे, जिल्हाध्यक्ष मा. विजय राजाभाऊ खरात, प्रदेश कार्यकारिणी सदस्य मा. राजेश द. मेहेत्रे, प्रदेश संघटक मा. जनाबापू मेहेत्रे आणि चिखली तालुका अध्यक्ष शिक्षक आघाडी मा. विनायक पुरुषोत्तम जाधव यांच्या आदेशानुसार करण्यात आली.

डॉ. खरात हे उच्चशिक्षित, क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञ आणि समाजाभिमुख विचारांचे अभ्यासू प्राध्यापक असून त्यांच्या नेतृत्वामुळे अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशीम आणि वर्धा या पाच जिल्ह्यांमध्ये शिक्षक संघटन अधिक सक्षम होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि क्रीडा क्षेत्रात नवचैतन्य निर्माण करून महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारांचा व्यापक प्रसार करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.

यावेळी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंती गौरव वर्षानिमित्त राज्यव्यापी जनजागृती मोहीम राबविण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. फुले दांपत्याला भारतरत्न प्रदान करणे, पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला महात्मा ज्योतिराव फुले यांचे नाव देणे, केजी ते पीजी मोफत शिक्षण, राज्यातील सर्व जिल्ह्यांत पूर्णाकृती पुतळे, शाळा-महाविद्यालयांना फुले दांपत्यांची नावे, अभ्यासक्रमात स्वतंत्र धडा, महात्मा फुले पुरस्कार, सावित्रीबाई फुले पुरस्कार, विद्यार्थ्यांसाठी विशेष सन्मान निधी, प्रमुख उद्याने, मार्केट यार्ड, रेल्वे स्थानकांना फुले यांचे नाव देणे, तसेच ₹२०० च्या नोटेवर महात्मा फुले यांचे छायाचित्र छापण्यासह एकूण १६ ऐतिहासिक मागण्यांसाठी महाराष्ट्र शासन व केंद्र सरकारकडे आक्रमक पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

याचबरोबर जातनिहाय जनगणना तातडीने लागू करावी, ओबीसी आरक्षणाचे संरक्षण करावे, ओबीसींवरील अन्याय दूर करावा आणि गावागावांत ग्रामपंचायतींचे ठराव करून राज्य व केंद्र सरकारकडे पाठविण्याची राज्यव्यापी चळवळ उभारण्याची घोषणा करण्यात आली.

डॉ. खरात यांच्या निवडीबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष मा. शंकरराव लिंगे, विश्वस्त तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष मा. रमेशभाऊ हिरळकार, प्रदेशाध्यक्ष मा. गौतमजी क्षिरसागर यांच्यासह प्रदेश, जिल्हा, तालुका आणि महिला आघाडीतील सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

✍️ संपादकीय संदेश

फुले-शाहू-आंबेडकरांच्या परिवर्तनवादी विचारांना केवळ घोषणांमध्ये न ठेवता शासनाच्या धोरणांमध्ये आणि प्रत्यक्ष कृतीत उतरविण्याची हीच वेळ आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या २०० व्या जयंती गौरव वर्षानिमित्त मांडण्यात आलेल्या मागण्यांवर शासनाने तातडीने निर्णय घ्यावा. समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने उभे राहणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.

🟡 दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे

📲 आपल्या WhatsApp ग्रुपमध्ये 7387737801 हा क्रमांक जोडा.
👍 बातमी लाईक करा.
📤 शेअर करा.
▶️ सबस्क्राइब करा.
📩 फॉरवर्ड करा.
💬 कमेंट करा.
🔔 बेल आयकॉन दाबायला विसरू नका!

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button