महाराष्ट्रदेश - विदेश

आज पुणे शहरातील महात्मा फुले वाडा, सावित्रीबाई फुले स्मारक व भिडे वाडा स्मारकाच्या कामाच्या ठिकाणी भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांसमवेत कामाची पाहणी केली.

आज पुणे शहरातील महात्मा फुले वाडा, सावित्रीबाई फुले स्मारक व भिडे वाडा स्मारकाच्या कामाच्या ठिकाणी भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांसमवेत कामाची पाहणी केली

यावेळी महात्मा फुले वाडा स्मारक आणि सावित्रीबाई फुले स्मारकाच्या एकत्रीकरणासाठी भूसंपादनाच्या कामास गती न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली.

[gspeech-button]

तत्कालीन राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा आणि तत्कालीन मुख्यमंत्री मा. शरद पवार साहेब यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात ‘महात्मा फुले वाडा’ राष्ट्राला अर्पण करण्यात आला. तेव्हापासून या ठिकाणी देशभरातील फुलेप्रेमी अभिवादन करण्यासाठी येत असतात. या ठिकाणी आपल्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने दरवर्षी कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात येत असते. या महात्मा फुले वाड्याच्या नजीकच पुणे महानगरपालिकेने उभारलेले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक आहे. या दोनही स्मारकांत अंतर कमी असल्याने यादरम्यान रस्ता तयार करून त्यांचे एकत्रीकरण करण्यात यावे यासाठी आपल्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने मोठा लढा दिला, तसेच सातत्याने शासन दरबारी पाठपुरावाही केला.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या मागणीनंतर राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्याकडून या स्मारक परिसराचे एकत्रीकरण करण्यासाठी आवश्यक भूसंपादन व इतर कामासाठी तातडीने २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यातील १०० कोटी रुपयांचा निधी मार्चअखेर वितरित करण्यात आला आहे. असे असतानाही प्रत्यक्षात पाहणी केली असता या ठिकाणी कुठलेही काम होताना दिसत नाही. विशेषतः या परिसरातील लोक स्वतःहून पुढे येत जागा द्यायला तयार असताना कुठलीही कार्यवाही होताना दिसत नाही. एकीकडे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री महोदय स्वतः लक्ष घालून तत्परतेने काम करत आहेत, तर दुसरीकडे अधिकारी मात्र काम करताना दिसत नाही.

आले आहेत त्यांची अधिकाऱ्यांसमवेत भेट घालून दिली. हे सर्व लोक महापालिकेला सहकार्य करत सर्व कागदपत्रे उपलब्ध करून देत आहेत. त्यामुळे अधिकाऱ्यांनी याबाबत तातडीने लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावावा, अशा सूचना त्यांना केल्या आहेत. यावर अधिकाऱ्यांनी देखील एक महिन्याच्या आत भूसंपादनाचा प्रश्न मार्गी लावला जाईल, असे म्हटल
आहे.

पुणे दौऱ्यावर असताना महात्मा फुले वाडा या ठिकाणी भेट दिली. तसेच क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या पुतळ्यांना पुष्पहार करून वंदन केले. क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या उद्या असणाऱ्या जयंतीदिनाच्या पार्श्वभूमीवर आज फुले दाम्पत्याच्या कर्मभूमीत त्यांचे वास्तव्य राहिलेल्या या ठिकाणी भेट देण्याचा योग आला, ही माझ्यासाठी नक्कीच भाग्याची गोष्ट आहे.

यावेळी ॲड. मंगेश ससाणे, ॲड. मृणाल ढोले पाटील, मंजिरी धाडगे, संदीप लडकत, योगेश पिंगळे, प्रितेश गवळी, रोहिणी रासकर, वैष्णवी सातव, अविनाश चौरे, सपना माळी, पंढरीनाथ बनकर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

#दिन​ बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा आपल्या वाढदिवसा निमित्त बातमी फोटो व्हिडिओ मोफत प्रसारित केला जाईल व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस एक हजार रुपये जाहिरात 500 बाय 500 मेगापिक्सल एक दिवस शंभर रुपये कमीत कमी सवलतीच्या दरात
#दिन​ बंधू न्यूज
#शिवक्रांती टीव्ही#
#माजी ऊप मुख्यमंत्री छगन भुजबळ
#अतुल सावे ओबीसी कल्याण मंत्री
#आमदार गोपीचंद पडळकर
#मंत्री दत्तामामा भरणे #मंत्री पंकजाताई मुंडे​

#obc​
#एससी
#एसटी
#अल्पसंख्यांक​
#, गरीब अल्प भूधारक शेतकरी

#Pune #PhuleWada #MahatmaJotibaPhule #savitribaiphule

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button