सोशल

सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः 36

सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः
36

 

यशवंतराव बव्हाण आणि महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांच्या उपस्थितीत कुंभार गुरुजींचा सेवाकार्याबद्दल उचित सत्कार करण्यात आला. कुंभार गुरुजीनी सत्यशोधक पठडीतील आणि शिक्षणाच्या संदर्भात अनेक

छोटी – मोठी पुस्तके लिहिली. कुंभार गुरुजींनी महात्मा फुले आणि संत एकनाथ महाराजांच्या अस्पृश्योद्धारक कार्यावर मुलांसाठी स्वतंत्र अशा एक अंकी दोन नाटिका लिहिल्या, “महात्मा जोतीराव फुले यांचे कार्य’ ही नाटिका १९५३ साली प्रकाशित झालेली आहे. शाळाशाळांमधून मानवतावादाचा प्रचार करण्याच्या हेतूने ही नाटिका गुरुजींनी लिहिली असून १८६८ सालच्या उन्हाळ्यात महात्मा फुले यांनी अस्पृश्यांसाठी स्वतःच्या घरातील विहीर खुली केल्याच्या मानवतावादी प्रसंगावर या नाटिकेची संहिता उभी आहे. या नाटिकेचे दिल्लीच्या भारत हरिजन सेवक संघाने हिंदीत रूपांतर करून देशात या नाटिकेचे वितरण केले, तर दुसरी नाटिका ‘संत एकनाथ’ असून, संत एकनाथांनी तहानलेल्या गाढवाला गंगाजल पाजलेला प्रसंग, गोदावरी नदीच्या वाळवंटात हरिजनाच्या मुलाला कडेवर घेण्याचा प्रसंग, पितृपक्षात महारांना भोजन देण्याचा प्रसंग आदी प्रसंग चितारले आहेत. तसेच ‘दारूड्याचा संसार म्हणजे सत्यानाश’, ‘श्री तुकाराम महाराजांची शिकवणूक’ आदी सत्यशोधकी पठडीतील त्यांची ग्रंथसंपदा आहे.

आयुष्यभर अडलेल्या नडलेल्यांची सेवा करणाऱ्या सत्यशोधक कुंभार गुरुजीचे १६ नोव्हेंबर १९८१ रोजी निधन झाले.

संदर्भ – सत्यशोधक श्री कुंभार गुरुजी डॉ. मु. ब. शहा

कालेकर खंडेराव

गणपतराव

सत्यशोधक ब्राह्मणेतर लेखक खंडेराव गणपतराव कालेकर है नारायण आश्रम, मुंबई येथील सत्यशोधक असून १९२८ साली त्यांचे ‘सत्यशोधकांचा वेद’ अथवा ‘जेथे जवळकरा ‘स उत्तर ही पुस्तिका प्रसिद्ध झाली. दिनकरराव जवळकर यांनी ‘जेधे – जवळकर’ ही कैफियत प्रसिद्ध केली. या पुस्तिकेला

अच्युत बळवंत कोल्हटकर यांनी प्रस्तावना दिली. प्रस्तुत प्रस्तावनेत कोल्हटकरांनी सत्यशोधक समाज आणि ब्राह्मणेतर पक्षावर अप्रस्तुत टीका केली. या टीकेला आरंभी कालेकरांनी संदेश आणि नवयुग पत्रांमध्ये लेख लिहून उत्तर दिले. या लेखाचीच प्रस्तुत पुस्तिका पुढे प्रसिद्ध केली. या पुस्तिकेला सत्यशोधक विचारवंत सी. के. बोले यांची एकपानी घोटीव प्रस्तावना लाभली आहे. सत्यशोधक समाज

हा सत्याचा पक्ष असून हिंदू धर्माच्या उन्नतीसाठी स्थापन झाल्याचे सांगून प्रसंगी महात्मा फुले आणि महात्मा गौतम बुद्धांच्या कार्याचे दाखले दिले आहेत. सत्यशोधक समाज कर्मकांडी नसून प्रार्थना समाज आणि आर्यसमाजापासून वेगळा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

तसेच सत्यशोधक चळवळ जनतेची चळवळ असून जनतेसाठी स्थापन केल्याचे म्हटले आहे. राष्ट्रीय एकात्मतेसाठी सत्यशोधक चळवळ आवश्यक असल्याचे मत त्यांनी नोंदविले आहे.

संदर्भ – १. सत्यशोधकांचा वेद अथवा जेधे जवळकरास उत्तर । कालेकर खंडेराव गणपतराव

कालेवार व्यंकू बाळोजी

(जन्म १८२०-मृत्यू ७ सप्टेंबर १८९८)

सत्यशोधक व्यंकू बाळोजी कालेवार यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील घोडनदी येथे इ. स. १८२० मध्ये झाला. त्यांचे वडील बाळोजी कालेवार हे ईस्ट इंडिया कंपनीच्या लष्करात शिपाई होते. सेवानिवृत्तीनंतर ते कपडे विक्रीचा व्यवसाय करत असत. वडिलांच्या निधनानंतर व्यंकू बाळोजी यांनी तड़क मुंबई गाठली. आरंभी बांधकामावर बिगारी म्हणून काम केले. बिगारी, गवंडी, मिस्त्री आणि पाहता पाहता ते इमारत बांधकामांची कंत्राटे घेऊ लागले. इ.स. १८६५-६६च्या दरम्यान त्यांनी कामाठीपुऱ्यातील तिसऱ्या गल्लीत घर बांधले. इ.स. १८७७ ला भंडारदरा जलाशयाचे बांधकाम भागीदारीत पूर्ण

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button