महाराष्ट्र

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट! आरोपी जयराम चाटे 14 महिन्यांनंतर काही तासांसाठी जेलबाहेर

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे याला 14 महिन्यांनंतर काही तासांसाठी तुरुंगाबाहेर जाण्याची परवानगी विशेष न्यायालयाने दिली आहे. मात्र ही परवानगी कडक अटींसह देण्यात आली आहे.

आरोपीला कोर्टाकडून तात्पुरता दिलासा

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी जयराम चाटे याला जिल्हा न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला आहे.

त्याच्या भावाच्या बाराव्या विधीसाठी त्याला 13 मार्च रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत गावात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी मानवतावादी दृष्टिकोनातून देण्यात आल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे.

पोलिस बंदोबस्तातच गावात जाणार

कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार जयराम चाटे याला पोलिसांच्या कडक बंदोबस्तातच गावात नेले जाणार आहे.

तो धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर त्याच दिवशी पुन्हा तुरुंगात परत आणला जाईल. आरोपीने कोर्टाने घालून दिलेल्या सर्व अटींचे पालन करणे बंधनकारक असेल.

सरकारी पक्षाचा विरोध

सरकारी वकिलांनी या परवानगीला विरोध करत आरोपीवर गंभीर गुन्हे असल्याचा युक्तिवाद केला.

त्याला बाहेर सोडल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे सरकारच्या बाजूने सांगण्यात आले. मात्र दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने मर्यादित वेळेसाठी परवानगी दिली.

14 महिन्यांनंतर तुरुंगाबाहेर

संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक झाल्यानंतर जयराम चाटे सुमारे 14 महिन्यांपासून तुरुंगात आहे.

या प्रकरणातील आरोपींपैकी कोणीही अद्यापपर्यंत तुरुंगाबाहेर आले नव्हते. त्यामुळे 14 महिन्यांनंतर काही तासांसाठी तो तुरुंगाबाहेर येणार असल्याची ही पहिलीच वेळ आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरण

9 डिसेंबर 2024 रोजी बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली होती.

या प्रकरणात अनेक आरोपींवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला आहे.

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button