सोशल

शरणगाथा क्रमशः1

भूमिका जिसन भामका

संत-महात्मे, महापुरुष आणि समाजधुरीण यांच्या वाटण्या झालेल्या आहेत.

राजकीय पक्षांनी, सामाजिक संघटनांनी, ज्ञाती संस्थांनी विभूतींना वाटून घेतले आहे. काही मंडळी महापुरुषांना स्वतःची अस्मिता बिंदू म्हणून वापरत आहेत. खरं तर ही प्रक्रिया खूप दिवसांपूर्वीच सुरू झाली. दिवसेंदिवस ती अधिकच टोकदार होत आहे. तुम्ही सोनार असाल तर नरहरी महाराज आठवतात. नाभिक असाल तर सेना महाराज आठवतात. सावतोबा, सावता महाराज केवळ माळ्यांचे झाले आणि नामदेवरायांचे फोटो शिंपी समाजाच्या भिंतीवर शोभून दिसू लागले.

छत्रपती शिवरायांवर मराठ्यांचे कॉपीराईट सुरू झाले. त्यातल्या ज्ञानोबारायांचे थोडसे बरे. ते लोकसखा झाले. इथेही त्यांच्या माऊली असण्याबाबत काहींना कटच दिसतो. इतर संतांच्या वाट्याला उपेक्षाच आल्याचे दिसेल. हीच कथा शरणांची. कल्याणपर्वाचा म्हणजेच बसवयुगाच्या रक्तरंजित शेवटानंतर जातीविरहित समाजाची निर्मिती केलेल्या या धुरीणांच्या जाती शोधण्यात आल्या. त्यांच्या भोवती चिरेबंदी भिंती उभारण्यात आल्या. आपल्या कवितेतून महापुरुषांना बंदिस्त करण्याची कविवर्य कुसुमाग्रजांनी व्यक्त केलेली परिस्थिती दिवसेंदिवस अधिक विदारक होत आहे.

आपली वाटचाल कळपाकडे झुंडीकडे होताना दिसते. संत आणि शरणांचा अभ्यास करताना ही बाब प्रकर्षाने जाणवते. त्याही पलीकडे त्यांना देवत्त्व बहाल करताना त्यांचे माणूसपण नाकारण्याचे प्रयत्न सातत्याने आणि आग्रहाने केले गेले. कटिंगच्या दुकानामध्ये सेना महाजांची छायाचित्रे दिसतात. ते दुकान लिंगायत संस्कृतीतील व्यक्तीचे असेल तर साईबाबा, श्रीदत्त वा स्वामी समर्थांसह
शरणगाथा
1

शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरावलिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉम बेल दाबा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button