निःशुल्क पोलीस संरक्षण मिळणेबाबात प्रा श्रावण देवरे यांचे पत्र…

निःशुल्क पोलीस संरक्षण मिळणेबाबात प्रा श्रावण देवरे यांचे पत्र…
प्रा. श्रावण देवरे,
201, स्पर्श हाईट्स,
विजय-ममता सिनेमा सिग्नलजवळ,
अशोका टायर कार गॅरेजजवळ
पुणे रोड, नाशिक-422011
दि. 12 ऑक्टोंबर 2024
प्रती-
माननीय पोलीस आयुक्त, नाशिक
विषयः 1) माझ्या घरावर हल्ला करणार्या हल्लेखोरांवर गुन्हे दाखल करून कारवाई करणेबाबात
2) हल्लेखोरांपासून संरक्षण व्हावे म्हणून निःशूल्क पोलीस संरक्षण मिळणेबाबत
महोदय,
मी श्रावण तानका देवरे (वय 65) ओबीसी समाजातील समाजिक कार्यकर्ता असून गेल्या 45 वर्षांपासून समाजिक क्षेत्रात जनजागृती, प्रबोधन व संघटनचे काम करीत आहे. ओबीसी आरक्षणासाठी अनेक आंदोलने केलेली आहेत.
आज महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी ओबीसी नेते व कार्यकर्ते आंदोलने करीत आहेत. त्यांच्या विरोधात काही समाजकंटक हिंसक आंदोलने करीत आहेत. ओबीसी कार्यकर्त्यांची घरे जाळणे, त्यांच्या रोजी-रोटीच्या व्यवसाची दुकाने तोड-फोड करणे, ओबीसी नेते व कार्यकर्त्यांना अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन शीवीगाळ करणे व त्यांना खोटे आरोप करून बदनाम करणे आदी हिंसक कारवाया करून समाजात दहशत निर्माण केली जात आहे. या अन्याय-अत्याचाराचा प्रतिकार ओबीसी समाज अत्यंत शांततेने, लोकशाही मार्गाने व वैचारिक पद्धतीने करीत आहे. तथापि ओबीसी समाज शांत असल्याचे पाहुन समाजकंटकांची हिम्मत वाढली आहे व ते आता घरावर हल्ले करायला लागले आहेत.
या सर्व अन्यायाच्या विरोधात आम्ही सोशल मिडियावरून शाब्दिक प्रतिकार करत असतो, परंतू हा शाब्दिक प्रतिकारही त्यांना सहन करण्याची क्षमता नाही. माझ्या एका सोशल मिडियाच्या पोस्टचा राग धरून 4 ऑक्टोंबर 2024 रोजी या समाजकंटकांनी माझ्या घरावर हल्ला केला. उपनगर पोलीसांनी प्रसंगावधान ठेवून मला त्याआधीच संरक्षण देऊन घराबाहेर नेले म्हणून मी व माझी पत्नी वाचली.
आजही मी घराबाहेर असून माझ्या जीवाला धोका आहे. माझ्या जीवाला काही धोका झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबादार संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी व इतर मराठा कार्यकर्ते राहतील, याची कृपया नोंद घ्यावी.
या अर्जाद्वारे मी विनंती करित आहे की, मला त्वरीत निःशूल्क पोलीस संरक्षण मिळावे व हल्लेखोरांवर कारवाई करावी.
धन्यवाद!
आपला विश्वासू,
प्रा. श्रावण देवरे, नाशिक
विशेषः- माझ्या घरावर झालेल्या हल्ल्याची टि.व्ही. चॅनलची एक लिंक येथे देत आहे-
प्रत माहीतीसाठी,
1) माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई
2) माननीय उपमुख्यमंत्री व गृहमंत्री, महाराष्ट्र राज्य
3) माननीय नाम. छगन भुजबळ, अन्न व नागरी पुरवठा मंत्री
4) माननीय नाम. वडेट्टीवार, विरोधी पक्षनेते, महाराष्ट्र विधानसभा
5) माननीय उपमुख्यमंत्री अजित पवार, महाराष्ट्र राज्य
6) माननीय ओबीसी नेते नाना पटोले, अध्यक्ष, कॉंग्रेस महाराष्ट्र राज्य




