२०२४ विधानसभा निवडणूक ओबीसी समाजासाठी का महत्त्वाची आहे ?

२०२४ विधानसभा निवडणूक ओबीसी समाजासाठी का महत्त्वाची आहे ?
१. ओबीसींची हिते जपणारा पक्षाचा उमेदवार जर विधानसभेला पराभूत झाला तर ओबीसी प्रवर्गातील जाती कधीच एकत्र होत नाहीत असा संदेश जाईल.
२. ओबीसी समाज वगळून सत्ता स्थापन करता येईल असा विश्वास महाविकास आघाडी ला होईल.
३. ओबीसी समाजाला विरोध केला तरी काही फरक पडत नाही असा समज ओबीसी विरोधी शरद पवार आणि इतर पक्षांचा होईल.
४. ओबीसी प्रवर्गात जर बहुसंख्य असलेले जाती समाविष्ट केल्या तर ओबीसींना त्यांचं आरक्षण सोडावं लागेल.
५. या विधानसभेनंतर जर ओबीसींनी एकजूट दाखवली नाही तर सत्ताधारी वर्ग कधीच ओबीसींना सिरीयस घेणार नाही.
६. आज आरक्षण असूनही बऱ्याच ओबीसी जागा रिक्त ठेवल्या जातात किंवा वेगवेगळे निकष लावून ओबीसींना त्यांचा अधिकार डावलला जातो.
७. बारा बलुतेदार आणि १८ पगड जाती मिळून तयार झालेला ओबीसी समाज व त्याची एकता विधानसभेत दिसून नाही आली तर ओबीसीतील छोट्या जातसमुहांचे जगणे मुश्किल होईल.
८. हरियाणा प्रमाणे ओबीसींना त्यांची एकजूट दाखवून द्यावी लागेल तसेच राज्यातील सत्तेत आपला वाटा या विधानसभेत निश्चित करावा लागेल.
टिपः हा मेसेज सर्व ओबीसी बांधवांपर्यत पोहोचावा. ज्यांना वाचता येत नाही त्यांना इतर ओबीसींनी तो वाचून दाखवावाआणि समजून सांगावा.




