सोशल

वर्षभरात जवळपास दोन लाख लोकांना अन्नदान करणाऱ्या अन्नपूर्णा प्रीती यलमार

नवदुर्गा , प्रशांत वाघमारे
वर्षभरात जवळपास दोन लाख लोकांना अन्नदान करणाऱ्या अन्नपूर्णा प्रीती यलमार
पंढरपूर तीर्थक्षेत्र हे दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. इथे वर्षभरात लाखो वैष्णव जन येत असतात. पंढरीतील प्रत्येक जण जसे जमेल तसे त्यांची सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो. अध्यात्मा बरोबरच अन्नदान हा आपल्या भारतीय संस्कृतीतील महत्त्वाचा घटक आहे. तीच आपली संस्कृती जपत वर्षभरात जवळपास दोन लाख लोकांना अन्नदान करणाऱ्या नवदुर्गा आहेत प्रीती वामन यलमार.
पंढरपूर मध्ये वारीच्या बंदोबस्तास येणाऱ्या पोलीस कर्मचारी, होमगार्ड, पोलीस अधिकारी, एसटी ड्रायव्हर कंडक्टर यांच्या जेवणाची प्रचंड हेळसांड होत होती. त्यांच्या जेवणाचे कॉन्ट्रॅक्ट देऊनही जेवण व्यवस्थित बनवले जात नव्हते. त्यासाठी सुरुवातीला प्रीती यलमार यांनी आपले पती पोलीस नाईक वामन यलमार यांच्या मदतीने या कर्मचाऱ्यांसाठी मोफत अन्नछत्र, शहर पोलीस स्टेशनमध्ये चालू केले. सुरुवातीचे एक-दोन वर्ष त्यांनी बाहेरील काही दानशूर लोकांची त्यासाठी मदत घेतली. त्यानंतर मात्र त्यांनी स्वतःच, आपल्या पतींच्या मदतीने चार वारीसह वर्षभर कर्मचारी व सर्वच वारकऱ्यांसाठी अन्नछत्रच चालू करून वैष्णव जणांची सेवा करायला सुरुवात केली. या कामी त्यांना त्यांचे दीर महादेव, जाऊ अनिता, ननंद सविता, बाळाबाई, सुनिता मेहुणे वैभव कायम सहकार्य करीत असतात
दर्शन रांगेतील लोकांना दानेश्वर महाराज यांच्या वतीने अन्नदान केले जाते. यापासून प्रीतीने प्रेरणा घेऊन रेल्वे स्टेशन जवळील बिर्ला धर्म शाळेत दानेश्वर महाराज अन्नछत्र मंडळ सुरू केले आहे. त्यातून जवळपास 200 लोकांना रोजगारही मिळतो. स्वतः पदवीधर असणाऱ्या प्रीतीने पोलीस पत्नींसाठी पतसंस्था निर्माण करून आर्थिक नियोजन साधण्याचा ही मानस व्यक्त केला आहे. सासू सिंधुबाई व सासरे महादेव यांच्या स्मरणार्थ प्रीती कायम विविध ठिकाणी वृक्षारोपण करीत असतात. पारंपारिक वस्तूरचना असणाऱ्या भैरवनाथ मंदिराची उभारणी करणार असल्याचेही प्रिति सांगतात.
भविष्यामध्ये पंढरपुरात स्वाभिमानी महिला उद्योग समूह काढून वेगवेगळ्या लघुउद्योगामार्फत महिला भगिनींना व्यवसाय उपलब्ध करून देण्यासाठी प्रीती प्रयत्न करीत आहेत. भारतीय संस्कृती जपत आपल्या सामाजिकतेचा वसा पुढे चालवत, अन्नदान करणाऱ्या या नवदुर्गा प्रीती यलमार यांच्यापासून अनेक तरुण महिलांनी आदर्श घ्यायलाच हवा. श्री $$ वाघमारे, पंढरपूर
,, .. show Kranthi TV sampadak satyashodhak shankarvali 7701

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button