सोशल

संत भगवान बाबाचे लिंग छेद कोणामुळे क्रमशा. 5

संत भगवान बाबाचे लिंग छेद कोणामुळे क्रमशा. 5

की काय ? माणिकबाबांना भीती वाटली. करड्या रंगाच्या घोडीवर बसून गड

उतरून लिंबा गावी आले. भगवानबाबांनी दर्शन घेतलं. बाबांजवळ बसले.

गावकऱ्यांना बरं वाटलं, जेवणाखाण्याची व्यवस्था केली. माणिकबाबांच्या मर्जीखातर भगवानबाबांनी आज दोन दिवसानंतर अन्न घेतले होते. भक्तांना आनंद झाला. वातावरण निवळले. एक-एक करून आपापल्या उद्योगाला जाऊ लागले. मंदिरात आता फक्त दोघेच बसले. पहारेकरी मंदिराबाहेर उभे होते. माणिकबाबांनी भीमाला आवाज दिला. “भीमा कीर्तन संपल्यानंतर तू कोठे होतास?” “बाबा, मी पहारा करीत बैठकीच्या दारातच बसून होतो, बापू आणि मी रात्रभर जागेच होतो.”
✅✅✅✅
“मग मुक्ता आत्याची चोळी कोणी टाकली भगवानाच्या अंथरुणावर ?” बाबांचा प्रश्न.

“नाही ना बाबा, कोणी आले नाही, गेले नाही. पण चोळी कोणी टाकली माहितीच नाही !” भीमाने उत्तर दिले.

माणिकबाबांनी बापू भिल्लाला बोलावले, त्यानेही तसेच सांगितले. पण एक महत्त्वाची गोष्ट सांगितली, “तुम्ही माडीवरून खाली उतरत असताना तुम्हाला हात देण्यासाठी आम्ही तुमच्याकडे धावलो, तेवढ्या वेळात लिंबागणेशचा तात्या पाटील गडबडीने बाबांच्या बैठकीत पळाल्याचं आठवतं !”

“हो, हो, तोच हातात चोळी घेऊन माझ्या समोर नाचवीत होता. बरोबर ! त्यानेच हे कुभांड रचलं असावं. ठीक आहे, पुढं काय करायचं ते मी योजिले आहे.” माणिकबाबा म्हणाले.

भीमा आणि बापू बाहेर गेले. मंदिराच्या पटांगणात उभे राहिले. माणिकबाबा, भगवानबाबांशी बोलत बसले. समजाऊ लागले…

“तुला भगवान हे नाव का दिलं माहीत आहे? नाही ना? तर मग ऐक. वेदामध्ये योग्याचे सहा गुण सांगितले आहेत. यश म्हणजेच विजय, श्री म्हणजे लक्ष्मी, औदार्य म्हणजेच दान, ज्ञान म्हणजे सकल विद्या, वैराग्य म्हणजे कशाचीही आसक्ती नसणे आणि ऐश्वर्य म्हणजे मोठेपण, यांनाच वेदोनारायण भग म्हणतात. आणि वान म्हणजे अंगीकृत असणारा. भग-वान षड्गुण अंगीकृत करणारा भगवान.

“हे सर्व गुण तुझ्या जवळ आहेत. तू गडावर आल्यापासून गडाला धाकटी पंढरी नाव मिळालं आहे. पूर्वी जे नव्हते ते ते सर्व तू केलेस. पैठण, पंढरपूरची दिंडी, वार्षिक हरीनाम-नारळी सप्ताहाची सुरुवात दोन वर्षापासून केलीस, गावोगाव फिरून माळकरी, वारकरी वाढविलेस. गुरुवार, एकादशीला गडाची वारी सुरू केलीस, गडावर दूध मिळत नव्हते आता पांजरपोळ झाला आहे. एवढं मोठं विशाल आणि सुंदर असं गडाचं बांधकाम केलंस. गावोगाव भिक्षा करून गडाचं भांडार भरवलंस. तू कार्य धरलं आणि काही अडचण आली असं कधीच घडलं नाही. रिद्धी, सिद्धी, दासी झाल्या, लक्ष्मी पायी लोळण घेत असूनही कसलीही कामना नाही किंवा आसक्ती नाही. राजासारखं ऐश्वर्य मिळालं, तसाच वैराग्याचा पुतळा बनलास. आंधळे, पांगळे, दीन दलितांना सांभाळतोस, गोरगरिबांच्या मुलींची लग्न लावून देतोस. समाज जागृती करून शिक्षणासाठी सर्वांना आग्रह करून त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था केलीस. अंधश्रद्धा हटवून जीव हत्या बंद करून लोकांना सन्मार्गाला आणलेस. तुझ्या अंगी असणारे षड्गुण पारखले होते. म्हणूनच तर गुरूमंत्राबरोबरच तुला भगवान नाव दिलं होतं. ते तू सार्थ ठरविलेस. तुझा गुरू म्हणवून घेण्यास मला खूप स्वाभिमान वाटतो. गडावरील परवाच्या घटनेचा विचार करीत असशील तर तो. मनातून काढून टाक. तुला वाटतं का, की हे लोक तुला त्रास देतात ते मला कळत नाही ? मला सर्व माहीत आहे. माझ्यानंतर गडाचा कारभार मी तुझ्याकडे देणार आहे हे सांगितल्यापासूनच तुला हाकलण्यासाठी हे चांडाळ टपले आहेत.

मी आता थकलो आहे. तुझं कोडकौतुक पाहायचं तेवढं पाहिलं आहे. आता मी जास्त दिवस जिवंत राहीन असं वाटत नाही. धन ही गोष्टच वाईट आहे. धनासोबत दुश्मनही गडावर जमा झाले. दरोडेखोर, सरकारी शिपाई यांच्यापासून संरक्षण व्हावे म्हणून मल्ल पाळले; पण त्यांनाच धनाची आशा सुटली. या धनासाठीच ते तुझ्या आणि माझ्या जीवावर उठले आहेत.

भगवान तू धीर सोडू नको. कोठे इकडे तिकडे जाऊ नको. मला एकट्याला सोडू नकोस. माझी म्हातारपणाची काठी आहेस. गडाचा वारस आहेस. आता लवकरच वारसपत्र बनवून ठेवतो. या चांडाळांच्या करणीची मला भिती वाटू लागली आहे. तुझ्यासोबत एवढे बलदंड आणि चतुर अंगरक्षक असूनही तात्याबानं

 

शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button