राजकारण

मराठा आरक्षणाविरोधात ओबीसी उभे राहतायत आणि त्यातून तणाव निर्माण होण्याची स्थिती आहे.

मराठा आरक्षणाविरोधात ओबीसी उभे राहतायत आणि त्यातून तणाव निर्माण होण्याची स्थिती आहे. या परिस्थितीला भाजप आणि फडणवीसला दोषी धरल जातय आणि ते अत्यंत चुकीच आहे.

यात फडणवीसला दोष देण्यात अर्थ नाही असंविधानिक असलेल्या मराठा आरक्षणाला समर्थन करण्याऐवजी बहुजन समाजातील सामाजिक राजकीय संघटनांनी, त्यांच्या नेत्यांनी आणि विचारवंतांनी जर आरक्षण आणि त्याचा हेतु,

उद्देश नीट लोकांना समजावून सांगीतला असता तर ही वेळ आली नसती. बहूसंख्य असल्याच्या संशयास्पद आकडेवारीला भुलून जो तो असंविधानिक, अनैतिक आणि अनैसर्गिक असलेल्या आरक्षणाला समर्थन देत सुटल्यावर ओबीसींची प्रतिक्रिया सहाजिकच आहे आणि त्याचा दोष फडणवीसला देण हे पळ काढण झाल. फडणवीस, भाजप वगैरेचा हेतूच इथे Civil War व्हाव अशीच आहे आणि ते त्यांचे प्रयत्न करतायत.

आणि त्यात ते यशस्वी सुद्धा होताना दिसत आहेत. मणिपुर आणि तिथे सुरु झालेल्या Civil War च्या आधीची स्थिती आठवा. महाराष्ट्रातली सध्य स्थिती आणि मणिपुरची तेंव्हाची स्थिती बरचस साम्य आहे.

सुरवातीपासूनच असंविधानिक असलेल्या मराठा आरक्षणाच समर्थन केल नसत तर ही वेळ आली नसती. बामण लोक हे राजकारण करायलाच बसलेत इतरांनी ते करु नये म्हणून त्यांनी थोडीच अडवलय. मराठा आरक्षणच समर्थन करत बसण्याऐवजी जातीय- आर्थिक जनगणनेची मागणी करुन त्याचा रिपोर्ट प्रकाशित केल्यानंतर आरक्षणासंबंधिचे निर्णय घ्यावेत हे नॅरेटिव्ह सेट केल असत,

ओबीसी आणि मराठा यांच्यासोबतच इतर जातीयांचही या मागणीला समर्थन मिळवल असत तर भाजप आज बॅकफूटवर असती. फडणवीस आणि भाजपला जे हवय तेच पुरोगामी ते आंबेडकरवाद्यापर्यंत सगळे तेच करतायत मग यात दोष फडणवीसचा कसा?? फडणवीस आणि भाजपविरोधात योग्य भुमिका तुम्हाला घेता येत नाही त्याचा कितीही दोष फडणवीस भाजपला दिलात तरी त्याचा घंटा फरक पडत नाही.

आपला जनसंपर्क नसण, लोकमताची काडीची माहीती नसण आणि त्यानुसार नॅरेटिव्ह सेट करता न येण सत्यशोधक दिन बंधू न्यूज संपादक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button