सोशल

संत भगवान बाबाचे छेद कोणामुळे.? क्रमशा.4

संत भगवान बाबाचे छेद कोणामुळे.? क्रमशा.4

मल्हारी बापू गीते, चांगदेव नागरगोजे, त्र्यंबक नामदेव सानप अनेक जण झोपले होते.

स्वयंपाक घरात आत्या आणि अनेक वारकरी बाया दाटीवाटीने झोपल्या होत्या. कोणी दारातच आडव्या लवंडल्यामुळे दारही बंद करता येत नव्हते. दोन अडीचशे माणसं आज मुक्कामाला असल्यामुळे चोर, डाकूंची भीती नव्हती. दारं उघडीच होती.

ब्रह्ममुहूर्ताला नेहमीप्रमाणे भगवानबाबा उठले. मल्हारी बापूला सोबत घेऊन प्रातर्विधीसाठी खाली गडवाडीच्या विहिरीकडे गेले. एक एक जण हळूहळू जागा होऊ लागला. अचानक गडबड झाली.

• आळ घेतला :- चार-पाच जण पायऱ्या चढून माणिकबाबांच्या माडीवर गेले. दाराची कडी वाजवून वाजवून बाबांना जागे केले. म्हणू लागले, “चला खाली बघा तुमच्या भगवानबुवाने काय दिवे लावले ? आत्याची चोळी त्याच्या अंथरूनावर कशी आली? चला बघा जरा ? सर्वजण खाली आले. भीमा, बापू उभेच होते. त्यांना काही कळायच्या आधी एकजण आत गेला. बघा, बाबा ! तुमच्या भगवानबुवाचा प्रताप? त्याच्यावर लईच विश्वास होता ना तुमचा? असे म्हणत गोंधळ घालायला सुरुवात केली.”

आतापर्यंत सर्व वारकरी जागे झाले. जवळ येऊन ऐकू लागले. खरं की खोटं ! अंदाज करू लागले. कोणी म्हणे, हे बरेच दिवसापासून चाललेलं असावं, तर कोणी म्हणे खोटा आळ घेतला. चांडाळांनी. अपवाद आणला. भगवानबाबा परत आले तर त्यांच्या बैठकीसमोरच गोंधळ चाललेला

होता. जवळ आल्यानंतर सर्व गोष्ट कळली. आपल्यावर आळ घेतल्याचं विशेष काही वाटलं नाही पण संत मीराबाईसारखी प्रांजळ भक्त, गडाची निष्काम सेवा करणाऱ्या मुक्ताआत्यांना विनाकारण बदनाम केलं, बिचारीचा मुलगा बबन अशातच गडवाडीच्या विहिरीत पडून मरण पावला होता. दुःखातून आत्ता कोठे सावरली होती, तर या चांडाळांनी पुन्हा तिलाच दुःख दिलं, याचच जास्त वाईट वाटलं.

हे कारस्थान कोणी, कशासाठी रचलं असावं हे कळून चुकलं होतं, पण निष्पाप भगिनीची बेआब्रू झाली. आपल्याला त्रास देण्यासाठी हे लोक काय

करताहेत याचा तिटकारा आला. आपल्या थांबण्यामुळे दुर्जनांना त्रास होत होता, पण आता सज्जनांनाही त्रास होत आहे. मन विषन्न झाले, उदास-उदास वाटू लागले, दूर कोठे तरी निघून जावे, आता येथे थांबायचे नाही असा विचार करून आपल्या कपड्याची पिशवी भरली, माणिकबाबांचे दर्शन घेऊन निघाले. माणिकबाबांनी हातातील पिशवी हिसकावून घेतली. माडीवर घेऊन गेले. उपदेश केला. थोडा वेळ थांबवून घेतले. लिंबा (खांबा) गावचे भाविक एकादशीला वारीला गडावर आले होते. कीर्तनानंतर आडमार्ग म्हणून तेथेच मुक्कामाला थांबले होते. मुक्ता आत्याची चोळी भगवानबाबाच्या अंथरुणावर टाकून चांडाळांनी आपवाद घेतला. खोटा आळ आणला, याची खात्री असल्यामुळे बाबांची तयारी नव्हती, तरीही माणिकबाबांकडे विनवणी करून आपल्या गावी घेऊन आले. मारोतीच्या देवळात व्यवस्था केली. भीमा आणि बापू भिल्ल दिमतीला होते. बातमी चहू दिशेला पसरली होती. खांबा, खालापुरी, खोकरमोहा, रायमोहा, आनंदगाव, बावी, पाडळी, तागडगाव, अनेक गावचे लोक येऊन भेटून जात असत.

असं कसं झालं ? कोणी केलं ? चर्चा निघे. कोणालाच कशी चाहूल लागली नाही? अंगरक्षक बैठकीसमोर पाहारा देत होते तरी अंथरुणावर चोळी कोणी टाकली. हे कोणीच कसं पाहिलं नाही? अनेक प्रश्न विचारले जात होते. खोटा आळ घेतला याची सर्वजण ग्वाही देत होते.

गडावरच्या धनासाठी टपलेले लांडगे काहीही करायला लागले ! बाबा आम्हाला सांगा, हे कोणी केलं असावं? एका एकाचा मुडदाच पाडतो. रागारागात कोणी बोले.

हे लोक आपल्यासाठी रणसंग्राम करतील. गडावर रक्तपात होईल, बाबांना जाणीव झाली. म्हणाले, दुर्बुद्धी असणाऱ्यांचा हा खोडसाळपणा आहे, तुम्ही आततायीपणा करू नका, कोणीतरी अडाणी, अज्ञानी लोकांनी हे केलं असावं, तुम्ही काळजी करू नका, मी बघतो काय करायचं ते. समजावून सांगून सर्वांना आपआपल्या गावी परत पाठविले.

• माणिकबाबा समाजावणी घालतात दोन दिवस झाले तरी भगवानबाबा गडावर आले नाहीत. अपवाद आला म्हणून हा कोठे निघून जातो

 

शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01 ह हा नंबर आपल्य वॉटरॉपग्रुप मध्ये ऑड करा बातमी लाइककरा रोरकरा सबस्क्राइबकरा फारवड करा आइकॉन बेल दाबा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button