शरणगाथा क्रमशा.25

शरणगाथा क्रमशा.25
परस्पर संमतीने विवाह झाला. अनुभव मंटपात खुद्द राज्याचे महामंत्री असलेले बसवण्णा आणि शरणांच्या साक्षीने हा विवाह झाला. परंतु व्यवस्थेने हरळय्या आणि मुलाची जात शोधत या लग्नास विरोध केला. या विवाहाने बसवण्णांच्या चळवळीला विरोध करणाऱ्यांच्या असंतोषाचा स्फोट झाला. राजा बिजळ धर्ममार्तंडांच्या इशाऱ्यावर नाचू लागला. परिणामी खुद्द बसवण्णांना कल्याणमधून निघून जावे लागले. ते कुडलसंगमला गेले. धर्मसत्तेने राजसत्तेला हाताशी धरून हरळय्या, मधुवय्या आणि नवरदेव शिलवंत या तिघांना हत्तीच्या पायाखाली तुडवून टाकलं. हत्तीच्या पायाला बांधून फरफरटत नेलं. (एळेहोट्टे शिक्षा) त्यांच्या डोळ्यात तापलेल्या सळ्या खुपसल्या. थोडक्यात चित्रहिंसा करून त्यांना सार्वजनिकरीत्या ठार करण्यात आले. त्यामुळे कल्याणमध्ये हिंसाचाराचा आगडोंब उसळला. धर्ममार्तंडांच्या इशाऱ्यावरून राजा बिजळाच्या सैनिकांनी शरणांचे सामूहिक हत्यासत्र सुरू केले. अनुभव मंटपला आग लावण्यात आली. वचनांचे गड्ढे जाळण्यात आले. वचनांच्या रक्षणासाठी अक्क नागम्मा, चन्नबसण्णा, कक्कय्या, माचय्या आदी शरणांनी कल्याण सोडण्याचा निर्णय घेतला. जगाच्या इतिहासामध्ये साहित्याच्या रक्षणासाठी झालेला हा एकमेव संघर्ष आहे. कल्याणच्या विध्वंसाच्या बातम्या ऐकून बसवण्णांचे मन विषण्ण झाले. कुडलसंगम येथे त्यांनी शेवटचा श्वास घेतला. कृष्णा आणि मलप्रभा नदींचे संगम असलेल्या या ठिकाणी महात्मा बसवण्णा यांची समाधी आहे. त्यांच्या मृत्यूबद्दल अनेक तर्क काढले जातात. परंतु पुराव्याअभावी त्यांच्याकडे केवळ तर्क अथवा शक्यता म्हणूनच तूर्तास पाहावे लागणार आहे. येशूपासून भगवान बुद्धांपर्यंतच्या सर्व करुणामयी धुरीणांचा वाट्याला आलेला द्वेष आणि कर्मठ लोकांचा विरोध बसवण्णांनाही चुकला नाही.
दया हाच धर्म
प्रत्येक धर्माचा गाभा दया ही संकल्पनाच आहे हे स्पष्ट करताना बसवण्णा म्हणतात-
दया नसलेले धर्म कोणते आहे.
दया हेच धर्माचे मूळ आहे.
सकल प्राण्यांप्रती दया असावी.
दयाभाव नसल्यास कुडलसंगमदेवाची कृपा होणार नाही. (
समग्र वचन संपुट-१ वचन क्रमांक २४७)
बसवण्णांनी दया म्हणजेच धर्म असल्याचे म्हटले आहे. दयेविना धर्मच असू शकत नाही. केवळ आपलाच विचार करणे, स्वार्थ साधणे हा धर्मच होऊ शकणार नाही. परहिताचा विचार करणे, इतरांच्या सुख-दुःखाची जाणीव ठेवून त्याप्रमाणे वागणे हा खरा धर्म होय. दया ही केवळ आपल्या अवतीभवती असणाऱ्यांपुरती, आपल्या हितसंबंधापुरती
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01




