10 जून 1890 पासून कामगारांना रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या कामगार लढ्यामुळे कामगारांना रविवारची सुट्टी मिळते. – परमेश्वर बनकर, बीड 9503288282

10 जून 1890 पासून कामगारांना रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या कामगार लढ्यामुळे कामगारांना रविवारची सुट्टी मिळते.
– परमेश्वर बनकर, बीड 9503288282
नारायण मेघाजी लोखंडे हे महात्मा फुलेंच्या चळवळीतील नामवंत व्यक्तीमत्व, काही काळ पोस्ट खाते, रेल्वे खात्यात नौकरी केल्यानंतर मुंबई येथे भांडारपाल म्हणून गिरणी विभागात रुजू झाले. त्यामुळे त्यांचा कामगारांशी संपर्क आला.त्या ठिकाणी 14 -14 तास काम करणारे मजूर त्यांना दिसले, शिवाय दुपारच्या जेवणासाठी सुद्धा त्यांना खूप कमी वेळ दिला जात असे, एकदा कामावर आलं म्हणजे बाहेर जाण्याचा मार्ग बंदच असायचा. महिलांना सुद्धा त्याच पद्धतीने काम करावं लागत होतं. कामगारांना आठवड्यातुन कोणतीही सुट्टी दिली जात नव्हती, एखाद्या कामगाराला काम करताना काही लागलं तर त्याला त्याचा कोणताही खर्च दिला जात नव्हता, महिलांना प्रसूती रजेचा पगार दिला जात नव्हता. एखादा कामगार कामावरती दगावला तर त्याला कोणतीही आर्थिक मदत होत नव्हती.
अश्या परिस्थिती मध्ये कामगार काम करत होते. ही बाब रावबहादूर लोखंडे यांच्या लक्षात आल्या नंतर त्यांनी 1880 मध्ये मिल हॅन्ड असोशियशन नावाची कामागरांची भारतातील पहिली संघटना स्थापन केली,आणि त्या माध्यमातून ते कामगारांसाठी लढत राहिले. त्यांच्या लढ्यामुळेच भारतीय कामगारांना रविवारची सुट्टी, कामाचे तास कमी, दुपारच्या जेवणासाठी सुट्टी, जखमी कामगारांना मदत,महिलांना नाईट ड्युटी पासून मुक्तता इत्यादी गोष्टी कामगारांना ज्या मिळत आहेत त्या मागे नारायण मेघाजी लोखंडे यांचे खूप मोठे योगदान आहे परंतु ते आमच्या बहुजन समाजापर्यंत पोहोचू दिले नाही.
अश्या या महान क्रांतिकारकास विनम्र अभिवादन.
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴*




