भगवान बाबाचे लिंग छेद कोणामुळे झाले

भगवान बाबाचे लिंग छेद कोणामुळे झाले
क्रमशः भाग 2
चान्याबरोबर धन जमा होऊ लागले. गडाचे बांधकाम चांगल्या पद्धतीने चालू केले; पण पाळलेले माह धन मागू लागले. आडमागनि पळवू लागले. हे कळाल्यानंतर भगवानबाबांनी प्रतिबंध केला, धनाची चटक लागलेल्या लांडग्यांना हा अपमान बाटला, समोर दिसत असूनही धनाचा उपभोग घेता येत नसल्यामुळे तडफडू लागले.
ही सर्व पाटलांची, मोठ्या बापांची पोरं होती. बीड येथील मोठ्या लोकांना खोठ्या-नाट्था चहाडया सांगून गडाचे बांधकाम बंद पाडले, तरी भगवानबाबांनी जमा झालेल्या धनाचा आणि धान्याचा हिशोब लिहून ठेवून हिशोबाची वही माणिकबाबांजवळ ठेवली. धन बळदात, तळपरात ठेवले. त्याला मुटक्याचे कुलुप लावून किल्ली माणिकबाबांजवळ दिली. माणिकबाबांचा भगवानबाबांवर खूपच जीव होता. ते जे सांगतील ते सर्व सत्य समजत असत. त्यांच्या हातात एक सोटा असायचा, कोणीही भगवानबाबांची कागाळी केली तर माणिकबाबा दणादण सोटा मारीत. यामुळे चांडाळांच्या मनात जास्त द्वेष भरला होता; परंतु चेहऱ्यावर आणि कृतीतून दिसू देत नसत.
माणिकबाबांना वाचासिद्धी प्राप्त होती. न जाणो, एखादे वेळी शाप देतील म्हणून हे सर्वजण दूर असत. बार्शीच्या प्रकरणात या सर्वांच्या मनातील भाव उघड झाले होते. तरीही भगवानबाबा शांत वृत्तीने राहात असत. आपले नित्यनेम पाळून कथा-कीर्तने चालवित असत. भल्या पहाटे ब्रहामुहूर्ताला उठावे, पखाल डोहाला जाऊन स्नान करून कसरत, व्यायाम करावा, गडावर येऊन ध्यान धारणा, जप-तप, अनुष्ठान आणि देवपूजा करून उगवत्या सूर्याला दौऱ्यासाठी सज्ज होत असत. गावोगावीचे दौरे करून कीर्तन, प्रवचन, समाज प्रबोधन करून लोकांना माळकरी, वारकरी बनवित होते. दुःखीतांचे अश्रू पुसून दशमीला गडावर आले की, ही चांडाळ चौकडी हजरच असे. त्यांचा जळफळाट होई. परंतु माणिकबाबांची माया आणि अंतःकरणीचे प्रेम हा मोठा आधार होता, त्यामुळे कोणाचीही दखल घेत नव्हते.
भगवानबाबा येथून गेल्याशिवाय आपणाला धन घेता येणार नाही असा आराखाडा मनाशी बांधला होता. माणिकबाबा थकले होते. त्यांनी जर भगवानबाबांच्या नावे गड केला तर आपण पराधीन होणार ! आपणास त्यांची
॥ राजयाकरी, गुलामी करावी लागणार असा आपमतलबी विचार केला होता.
• कुस्ती: ही पाटलांची पोरं भगवानबाबांचा द्वेष करीत आहेत हे माणिकवावांनी जाणले होते. यांचा गर्वहरण झाला म्हणजे थंड होवून भगवानचे श्रवत्व मान्य करतील, बाबांनी विचार केला. एक दिवस सर्व मल्ल तालमीत कुस्त्याचा सराव करत होते. उस्ताद सर्वांना डाव प्रतिडाव शिकवित होता. माणिकवाबा आणि भगवानबाबा कठड्यावर बसून बघत होते. बराच वेळ खेळ चालला. उस्तादाने सांगितलेल्या डावाला, माणिकवावा दुसऱ्या गड्याला प्रतिडाव सांगत होते. त्यामुळे डाव मोडून प्रतिडाव टाकणारा गडी विजयी होत होता; मग सर्वजण खदाखदा हसत. विश्वनाथाला अपमान वाटला, म्हणाला, “पोरा सोरांचे जाऊ द्या, पडणारा आणि पाडणारा दोघेही माझेच शागीर्ट आहेत. तुमच्या डाव-प्रतिडावाची कला दाखवायची असेल तर तुमच्या भगवानबाबाला माझ्याबरोबर कुस्ती खेळायला लावा.”
मनात योजिल्याप्रमाणे जुळून आल्यामुळे माणिकबाबांनी भगवानबाबांना कपडे काढायला लावले. आशीर्वाद देऊन तालमीत उतरविले. भगवानबाबांनी सद्गुरूचे दर्शन घेतले. सलामीला हातात हात दिला आणि डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोपर्यंत झटक्यात स्वतःचे अंग फिरविले. वस्तादाचा उजवा हात आपल्या उजव्या खांद्यावर घेऊन उजव्या पायाने त्याच्या पायाला दणका दिला आणि पाठीवरून अलगद फेकला. वाहवा रे पट्ट्या ! याला म्हणतात लांग ! माणिकवाबांचे शब्द निघेपर्यंत उस्ताद अलगद तालमीच्या भितीवर जाऊन आदळला होता.
विश्वनाथ गवळी गंडावरील सर्व मल्लांचा उस्ताद होता. आजूबाजूच्या पाच-पन्नास गावात दवंडीचा पहिलवान म्हणून त्याचा बोलबाला होता. कुस्तीच्या खेळातील पराभव त्याच्या जिव्हारी लागला. मनात खुत्रस ठेऊन वागू लागला, कुसूर काढण्यासाठी संधी शोधून आखणी करू लागला.
दिवस काही गेले पुढे काय झाले। चडफडू लागले दुष्ट लोक ।। पुढील प्रकार नाही सांगवत । चरित्र म्हणून श्रुत करीतसे ।। शके १८५७ नारळी सप्ताह, लाखेफळ ता. पैठण येथे नियोजित केला होता. सर्व भाविक, टाळकरी, वारकरी घेऊन भगवानबाबा लाखेफळ येथे
१८२
॥ राजयोगी ।।
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01




