शंकरराव लिंगे: नाभिक समाज मोर्चा धरणे आंदोलन आझाद मैदान मुंबई सेना महाराज विकास महामंडळास 1000 कोटी रुपये द्यावे

शंकरराव लिंगे: नाभिक समाज मोर्चा धरणे आंदोलन आझाद मैदान मुंबई सेना महाराज विकास महामंडळास 1000 कोटी रुपये द्यावे
सकल नाभिक समाज महाराष्ट्र
मुंबई
नाभिक समाजासाठीचे संत सेनाजी महाराज केश शिल्पी महामंडळ कार्यान्दीत करावे या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रतील सकल नाभिक समाज दि.30 सप्टेंबर रोजी सोमवार आझाद मैदान मुंबई येथे एकदिवसीय राज्यव्यापी महाधरणे महा आंदोलन शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी 10000 नाभिक समाज आझाद मैदानामध्ये आक्रोश करत असल्याची माहिती किरण भांगे यांनी दिली


शासनाकडे दिलेल्या निवेदनात केशशिल्पी महामंडळास 1000 कोटी रुपयांचा निधी द्यावा, ओबीसी विकास महामंडळ कंपनीचे मुबई मुख्यालयातील बारा प्रशासकीय अधिकाऱ्याऱ्यांची पदे भरण्यासाठी शासनाने जाहिरात काढापी संचालक समिती अध्यक्ष , उपाध्यक्ष, शासकीय सदस्य यांच्या निवडी कराव्यात, थेट कर्ज योजनेतील सिविल रिपोर्टव जामीनदारांची जाचक अट शिथिल करावी, उपकंपनीचे लेटरहेड, कार्यालय, माहितीपत्रक यांचेवर सेना महाराजचा फोटो वापरावा छापावा या आंदोलनाच्या
प्रमुख मागण्या आहेत. 13 सप्टेंबर 20 19 रोजी स्थापन केलेले केश कला बोर्ड घोषित करून दि.05 जाने 2024 रोजी ओबीसी महामंडळाची उपकंपनी घोषित करण्यात आलेली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासाटी निधीची तरतूद केली आहे. परंतु कोणतीही अद्याप
कारवाई झालेली नाही.
त्यामुळे शासनाने 5 वर्षात समाजाला फक्त आश्वासनांचे गाजर दाखवून फसवणूक केली असायाची भावना नाभिक समाजाची झाली आहे. म्हणून महाराष्ट्रातील विविध संघटना एकत्र आल्य आहेत
( किरण तुकाराम भांगे )
(रा. चाकोरे ता. माळ शिरस जिल्हा सोलापूर (7558369071 77448553461
समन्वयक )
सकल नाभिक समाज महाराष्ट्र यांनी पुढाकार घेऊन दोन महिने कष्ट घेऊन समाजाला एकत्र करून आज आझाद मैदानामध्ये दहा हजार लोकांचा समूह जमा केला परंतु या नाभिक समाजाकडे शासनाने पाठ फिरवली शासनाचा कोणताही मंत्री या धरणे आंदोलनाला संबोधित करण्यासाठी त्यांचे निवेदन स्वीकारण्यासाठी आला नाही त्यामुळे महाराष्ट्रातील संपूर्ण नाभिक समाज नाराज होता या सभेला प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय नानाभाऊ पटोले यांनी सांगितले मी पुन्हा येणार म्हटलेले आले नाही गेल्या पाच वर्षांपूर्वी आपणाला नुसते गाजर दाखविले हे सरकार परत कधी येणार नाही त्यामुळे आम्हीच आपणाला थोड्या दिवसात सत्तेवर आल्यानंतर 1000 कोटी काय लागेल तेवढा पैसा आपणास पुरवण्यास आम्ही तयार आहोत आपण फक्त या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला आशीर्वाद द्यावा मी पण तुमच्यापैकीच एक ओबीसी आहे त्यामुळे तुम्ही मला साथ द्यावी आपणच आपले सहकार्यातून आपले प्रश्न सोडविले पाहिजेत असे मत त्यांनी व्यक्त केले धरणे आंदोलनामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत विखुरलेला न्हावी समाज दहा हजारापेक्षा जास्त संख्येने आझाद मैदानावर उपस्थित होता परंतु आज त्यांच्या पदरी निराशा आली लोक नाराज होऊन दुःखी कष्टी मनाने आपल्या आपल्या घरी परत गेले यावेळी बोलताना अनेकांनी नाभिक समाजासाठी ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषदा राज्यातील सर्व एसटी स्टँडवर सर्व रेल्वे स्टेशनवर नाभिक समाजासाठी नाम मात्र भाड्याने किंवा किमतीने गाळे आरक्षित करून द्यावेत गावोगावी आमची पिळवणूक होते प्रस्थापित लोक आमच्यावर दादागिरी करतात अन्याय करतात हल्ले करतात मारहाण करता तोडफोड करतात जाळपोळ करतात अत्याचार करतात शिवीगाळ करतात म्हणून आम्हाला अपमानित जीवन जगावे लागते आम्हाला बारा बलुतेदारांना ओबीसी ना ॲट्रॉसिटी कायद्याप्रमाणे संरक्षण द्यावे मुख्य म्हणजे आर्थिक विकास महामंडळामध्ये आर्थिक तरतूद करून जाचक अटी रद्द करून कर्जपुरवठा करावा आणि आम्हाला प्रस्थापितांच्या गुलामगिरीतून दादागिरीतून बाहेर काढावे अशा अनेक मागण्या आणि समस्या महाराष्ट्रातून आलेला नाभिक समाज मांडत होता अन्यायाचा पाढा वाचत होता आक्रोश करत होता असाच अत्याचार झाला तर महाराष्ट्रात आम्हाला करपूरी ठाकूर सारखा नेता तयार करावा लागेल अशी माहिती आझाद मैदान मुंबईतून
स्पेशल रिपोर्ट सत्यशोधक शंकरराव लिंगे
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01



