सायकल चालवा मस्त! आरोग्य होईल स्वस्थ!!

प्रेस नोट
सायकल चालवा मस्त! आरोग्य होईल स्वस्थ!!

रोजच्या व्यायामामुळे शरीरातील सर्व अवयव निरोगी राहतात व्यायामामुळे ब्लड सर्कुलेशन सुधारते – संजय मते
सायकल चालवा मस्त! आरोग्य होईल स्वस्थ!!
रोजच्या व्यायामामुळे शरीरातील सर्व अवयव निरोगी राहतात व्यायामामुळे ब्लड सर्कुलेशन सुधारते
पचनक्रिया सुधारते, आणि वजन नियंत्रित राहते योग, धावणे, चालणे, सायकल चालविणे किंवा जिम मध्ये व्यायाम करणे. हे चांगले पर्याय आहेत. नियमित सायकलिंग करणे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर असून अगदी बालवयापासून तर प्रौढ वयापर्यंत करता येणारा स्वस्त आणि मस्त व्यायाम प्रकार आहे. आरोग्य हीच खरी धनसंपदा असल्यामुळे रोज सायकल चालवा आणि निरोगी रहा!! असा संदेश देण्यासाठी भंडारा शहरातील आठ मित्रांनी सुप्रभात मार्निंग ग्रुप तयार करून सकाळी5:30 पासून दररोज 25 ते 30 किलोमीटर सायकलिंग करून सर्व नागरिकांना आरोग्य निरोगी राहण्याचा संदेश देत आहेत. आजच्या या धकाधकीच्या जीवनात आपले आरोग्य तंदुरुस्त रहावे असे सर्वांनाच मनापासून वाटते.
यासाठी अनेक व्यायाम प्रकार केले जातात. मात्र निरोगी व सुदृढ आरोग्य ठेवण्यासाठी सायकलिंग हा व्यायाम प्रकार सर्वोत्तम असून सायकल चालवा मस्त! आरोग्य होईल स्वस्थ!! शरीर माध्यम! खलधर्म साधनम!! हा संदेश देण्यासाठी भंडारा शहरातील प्रतिष्ठित नागरिक विधीज्ञ. सतीश ठवकर, प्रा विद्यानंद भगत( सेवानिवृत्त ज. क. म. तुमसर) संजय मते ओबीसी क्रांती मोर्चा संस्थापक अध्यक्ष ),गोविंद रेहपाडे, ओमप्रकाश मोहबंशी, जीवन सार्वे, पवन सार्वे व यशवंत गायधने हे आठ मित्र सन 2022 पासून एकत्रित येऊन रोज पहाटे सायकलिंग करून भंडारा नगरवासीयांना सायकलींग व्यायाम प्रकारा विषयी जनजागृती करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून उन्हाळा, हिवाळा, व पावसाळा या तीनही ऋतूत कधीही खंड पडू न देता गेल्या दोन वर्षापासून नियमित सायकलिंगचा सराव करीत आहे. सुरुवातीला पाच ते दहा किलोमीटर सायकलिंग केली
मात्र नियमित सराव केल्याने आता भंडारा शहरालगतच्या तवेपार, खुर्चीपार, सातोना, पाहुणी, खात कोरंबी, अंभोरा, कोका जंगल आदी वीस ते पंचवीस किलोमीटर पर्यंतचा गावी सायकलिंग करून सायकल चालवा! निरोगी रहा! असा संदेश देऊन नियमित सायकल चालवण्याचे फायदे जनतेला सांगत आहेत. सायकल चालविण्याचे फायदे 01) सायकल चालविणे हा कमी प्रभावाचा व्यायाम प्रकार आहे. यामुळे आपले वजन नियंत्रित राहते. 02) सायकलिंग हा एक निरोगी एरोबिक व्यायाम प्रकार आहे. जो शरीर आणि मनाच्या सर्वांगीण विकासावर लक्ष केंद्रित करते . 03) सायकलींग शरीराला बळकट करते आणि मनाला आराम देते. 04) सायकलिंग ही अशीच एक क्रिया आहे जी वजन कमी करण्यास सहनशक्ती निर्माण करण्यास आणि सामर्थ्य सुधारण्यास मदत करते. 05) सायकल चालवल्याने स्ट्रोक, हृदयविकाराचा झटका, काही कर्करोग, नराश्य, मधुमेह, लठ्ठपणा आणि संधिवात यासारख्या गंभीर आजारापासून तुमचे संरक्षण होऊ शकते.
शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकररावलिंगे 7387 37 78 01



