राजेसाहेब मी आपल्या वडिलांच्या शिवसेनेच्या कार्यकाळापासून मी शिवसेनेचा आजपर्यंत कडवट शिवसैनिक राहिलेलो आहे

राजेसाहेब मी आपल्या वडिलांच्या शिवसेनेच्या कार्यकाळापासून मी शिवसेनेचा आजपर्यंत कडवट शिवसैनिक राहिलेलो आहे व यापुढेही राहणार आहे परंतु भूमिगत माझा कोठेही फोटो आपणास दिसणार नाही बॅनर दिसणार नाही परंतु कार्य निरंतर चालू राहणार यात तीळ मात्र शांत नाही मी तेरणा कारखाना आपला व्हावा यासाठी अहोरात्र संत गोरोबाकाका यांच्या चरणी प्रार्थना करत होतो

म्हणूनच की काय तो कारखाना आपल्याकडेच राहिला फक्त गट वेगळा मला गटाशी काही देणेघेणे नाही मी फक्त कडवट शिवसैनिक आहे हे मला मान्य आहे बाकी गट तट हे राजकारण आहे हे मला माहित आहे जेव्हा शिवसेनेचे दोन गट झाले तेव्हा मी माझ्या व्हाट्सअप वर पोस्ट पण शेअर केली होती मतभेद असतील पण मनभेद नाहीत शिवसेना ही शिवसेनाच आहे शिवसेना दोन असू शकत नाहीत हे मी तेव्हाच शेअर केले होते आणि आजही मी तुमच्याशी शेअर करत आहे
तरी मला तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुळजापूर विधानसभा ही शिवसेनेसाठी राखीव ठेवावा आणि तेथून माझी उमेदवारी आपण होऊन जाहीर करावी मला येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुळजापूरचा विधानसभा सदस्य होण्याचा पहिला मान शिवसेनेचा मिळवायचा आहे हे मी माझ्या लग्नाच्या 25 व्या दिनानिमित्त मी तुळजाभवानी मातेस साकडे घातलेले आहे आणि हे पूर्ण झाल्याशिवाय मी तुझ्या दर्शनाला येणार नाही
हे मी तिला सांगितलेले आहे तरी यापुढील कार्यवाही आपल्याच हातात आहे बाकी भेटींती खुलासा माझे कार्य तुळजापूर मध्ये व तुळजापूर मतदारसंघांमध्ये सर्वश्रुत आहे खरं तर 2009 मध्येच माझी उमेदवारी जाहीर होणे हे बाकी होते परंतु मला माझ्या कामाच्या व्यापामुळे मी राजकारणाकडे दुर्लक्ष केले परंतु आज दुर्लक्ष करून चालणार नाही बाकी सर्व आपणास ज्ञात आहे क्रमशः कळावे आपला महादेव सोपान लिंगे मुक्काम पोस्ट सारोळा बुद्रुक तालुका जिल्हा धाराशिव



