सोलापूर

संडे स्पेशल प्रशांत वाघमारे स्पर्श – जीवनाची जाणिव !

संडे स्पेशल प्रशांत वाघमारे
स्पर्श –
जीवनाची जाणिव !
जगामध्ये एकमेव असा देव आहे विठ्ठल की ज्याच्या दर्शनासाठी लाखो वैष्णवजन शेकडो किलोमीटर चालत येतात. अनेक तास अन्न, पाणी, ऊन, वारा, पाऊस कशाचीही तमा न बाळगता अनेक तास येणाऱ्या प्रत्येक अडचणी, समस्यावर मात करत रांगेत उभे असतात. कशासाठी तर विठ्ठलाच्या चरण स्पर्शासाठी! अगदी क्षणिक अनुभवलेला स्पर्श त्याला परम सुखाची अनुभूती देऊन जातो, एवढी ताकद या स्पर्शामध्ये असते कारण स्पर्श हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वपूर्ण असा हिस्सा आहे.

आपणाला जन्मल्यानंतर जीवनाची जाणीव स्पर्शच करून देतो. जे सजीव असतात ते मनुष्य, प्राणी, वनस्पती या सर्वांच्या जीवनाची सुरुवात ही स्पर्शातूनच होते. अगदी आपल्या जीवनाच्या शेवटच्या अंत क्षणीही आपल्याला कुणाचातरी स्पर्शच हवा असतो. मनुष्य हाताने, प्राणी चाटून अथवा पोटात घेऊन, पक्षी पंखाखाली घेऊन मायेचा स्पर्श देत असतात. या मायेच्या स्पर्शाची किंमत जगात कुठेही होऊ शकत नाही.
जीवनातील कोणताही संस्कार स्पर्शा शिवाय शक्यच नाही. एवढेच काय तर स्पर्शाशिवाय जगाचे अस्तित्वच नाही. स्पर्श नसेल तर जग हे अपंगच गणले जाईल. स्पर्शामध्ये एवढी ताकद आहे की रामाच्या स्पर्शाने शिळेचे अहिल्यात रूपांतर झाल्याचे सांगतात.
भारतीय वैद्यक शास्त्रामध्ये स्पर्श चिकित्सेला फार महत्त्वपूर्ण स्थान आहे. योगी, क्रिया योगी यांनी स्पर्शाच्या साह्याने अनेक अनाकलनीय सिद्धी सिद्ध केलेल्या आहेत.
स्पर्श एक औषध आहे जीवनातील दुःख, दूर करण्याचे! सुखावह स्पर्शाने जीवनातील तणाव नष्ट होतो. त्याचबरोबर सुरक्षितपणाची भावनाही बळावते. जुन्या काळी एक म्हण होती, शेजीचा भात आणि आईने फिरवलेला हात! खरंच एक आश्वासक स्पर्श आपल्या जीवनामध्ये जादूमय प्रभाव पाडतो. स्पर्शानेच सकारात्मक शक्तीचा उदय होऊन प्रचंड अशा ऊर्जा संवहनाद्वारे जीवनाचे अस्तित्व सफल होते.
प्रत्येक स्पर्शाला जीवनामध्ये एक वेगळा अर्थ आहे. आई बाबांचा स्पर्श आत्मीयतेचा, ममतेचा असतो. बहिण-भावांचा स्पर्श आधार, भक्कम पाठिंबा दर्शवून जातो. लेक – लेकीचा स्पर्श प्रेममय आधाराचा असतो. गुरुचा स्पर्श आयुष्यामध्ये ज्ञान फुलवतो. डॉक्टरांचा स्पर्श आत्मविश्वास निर्माण करून मानसिक आधार देतो. आयुष्यातील प्रत्येक टप्प्यावर आपणाला हवा असणारा मित्र-मैत्रिणींचा स्पर्श आपल्या आयुष्यातील अनेक सकारात्मक घटकांना पैलू पाडण्याचे काम करतो. जो स्पर्श आपणास आयुष्याच्या शेवटपर्यंत हवा असतो. आयुष्यातील प्रत्येक भावना आपणास याच स्पर्शातून जाणवतात. डोळे बंद करून कित्येक वर्ष आपण या स्पर्शाची अनुभूती घेऊ शकतो. एवढेच काय वास्तु व वस्तूंना केलेल्या स्पर्शाने आयुष्यातील सुखद क्षण चटकन आठवून जातात.
समोरच्या माणसाचा हात हातात घेतला की, चटकन आपनास त्याच्या मनामध्ये काय आहे हे जाणवते. स्वार्थ, समर्पण, कपट, दिखावा, द्वेष, प्रेम, करुणा हे सगळे भाव या स्पर्शातून व्यक्त होत असतात. स्पर्श प्राण्यांनाही कळतो.
स्पर्शापासून लांब राहणारा माणूस एक तर योगी असतो किंवा निस्तेज जीवन जगणारा निर्जीव रोगी असतो. म्हणूनच आयुष्यामध्ये घेतलेली कडकडून भेट, पाठीवर टाकलेली थाप, खांद्यावर ठेवलेला आश्वासक हात, डोक्यावर; गालावरून फिरवलेली हाताची बोटे, बोटात बोटे गुंफून घट्ट पकडला हात, हात जोडून हृदयापासून केलेला नमस्कार, हाताने दिलेली टाळी या गोष्टींमध्ये भरभरून अशी जीवनाची जाणीव असते. अगदी किंचितसा झालेला बोटांचा स्पर्शही आपणास पुरेसा असतो. आईने गालावरून हात फिरवून कडकडून मोडलेली बोटे जीवनाचा आनंद देऊन जातात. चरण स्पर्श विनम्रता, आशीर्वाद शिकवतो तर, अहंकार; घमेंड ही नष्ट करतो.
अगदी लहान बाळाच्या झालेल्या मुलायम स्पर्शने आपले हृदय भरून पावते. दुःख दूर करण्यास मदत होते.
नकारात्मक स्पर्श
आपण अनुभवलेल्या कोरोनाचे स्पर्शातूनच तांडव झालेले होते ! आयुष्यातील काही नकारात्मक स्पर्श हे अनेक समस्येचे कारण बनलेले असतात. त्यातूनच आयुष्यभर लाभलेली अस्थिर मानसिकता, भांडण तर अगदी युद्धही होतात. त्यासाठी मुलांना योग्य वयात, योग्य स्पर्शाची जाणीव करून देणे ही गरजेचे आहे. अयोग्य स्पर्शाला ठामपणे नकार देणे आणि त्यापासून लांब राहणे हे मुलांना शिकवलेच पाहिजे. श्री. प्रशांत वाघमारे,पंढरपूर 9860786735
कृपया प्रतिक्रिया कळवा व सर्वांना पुढे पाठवा.

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button