महिलांच्या सुरक्षिततेवर गदा आणणाऱ्या भाजपला मतदान नको – बाळासाहेब आंबेडकर बदलापूर प्रकरणावरून गंभीर आरोप

महिलांच्या सुरक्षिततेवर गदा आणणाऱ्या भाजपला मतदान नको – बाळासाहेब आंबेडकर बदलापूर प्रकरणावरून गंभीर आरोप
आपल्या कुटुंबातील मुली सुरक्षित ठेवायच्या असतील, तर भाजपला मतदान करू नका, असे ठाम आवाहन सामाजिक व राजकीय स्तरावरून करण्यात येत आहे. बदलापूर येथे घडलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील सूत्रधार असल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीला भाजपने स्वीकृत नगरसेवक म्हणून स्वीकारल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.
महिलांवर अत्याचाराच्या गंभीर आरोपांचा सामना करणाऱ्या व्यक्तीला राजकीय प्रतिष्ठा देणे म्हणजे पीडितांच्या वेदनांवर मीठ चोळण्यासारखे असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. भाजप हा केवळ भ्रष्टाचाराच्या आरोपांनी ग्रासलेला पक्ष नसून, आता महिलांवर अत्याचाराच्या आरोपाखालील लोकांनाही राजकीय आश्रय देणारा पक्ष बनत चालल्याचा आरोप करण्यात येत आहे.
महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना पक्षात स्थान देऊन भाजपने समाजाला कोणता संदेश द्यायचा आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कुटुंबव्यवस्था, महिला सन्मान आणि सामाजिक नैतिकता यांची सातत्याने भाषा करणाऱ्या संघ परिवाराने प्रत्यक्षात मात्र आरोपींना संरक्षण दिल्याचा आरोप टीकाकारांकडून होत आहे.
हे प्रकार थांबवायचे असतील, तर येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत भाजपला मतदान न करण्याचा स्पष्ट संदेश जनतेपर्यंत पोहोचवला जात आहे. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न राजकीय स्वार्थासाठी बाजूला ठेवला जात असल्याचा आरोप करत, जनतेने मतपेटीतून उत्तर द्यावे, असे आवाहन एडवोकेट एडवोकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी केले आहे
— दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
संपादक : सत्यशोधक शंकरराव लिंगे
मो. 73 87 37 78 01




