सोशल

थकीत दूध अनुदानासाठी ‘जनहित’चे आंदोलन

थकीत दूध अनुदानासाठी ‘जनहित’चे आंदोलन

कुरुल: थकीत दूध अनुदान व प्रतिलिटरला रुपये ३५ प्रमाणे लिटरला दर दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने दूध संकलन केंद्रासमोर दुधाचा टँकर अडवून शासनाचा निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आले.

दूध उत्पादक शेतकऱ्यांचे थकीत पाच रुपये अनुदान व ३५ रुपये प्रतिलिटरचा भाव राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाहीर केला होता. त्याप्रमाणे तो दर व अनुदान विनाविलंब शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करा, या मागणीसाठी दूध संकलन केंद्रासमोर दोन ठिकाणी दुधाचा टँकर अडवून शासनाचा निषेध व्यक्त करून आंदोलन करण्यात आले. यावेळी संस्थापक प्रभाकर देशमुख नाना मोरे, औदुंबर गायकवाड, मोहन जमदाडे, बालाजी कदम, पिंटू पवार, राजाभाऊ आंधळकर, सचिन काशीद, समाधान काशीद, आबासाहेब काशीद, राजेश धामणे, शिवाजी सुतार, दत्ता लोखंडे, भारत आदमाने आदी शेतकरी उपस्थित होते.

*** शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चॅनेल
सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील

संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button