सोशल

कामगार मंत्री श्री. सुरेश खाडे यांची हकालपट्टीसाठी मंत्रालयात आंदोलनाचा निर्णय

कामगार मंत्री श्री. सुरेश खाडे यांची हकालपट्टीसाठी मंत्रालयात आंदोलनाचा निर्णय

सोलापूर :- राज्याचे कामगार मंत्री श्री. सुरेश खाडे हे निष्क्रीय ठरल्यामुळे राज्य मंत्री मंडळातून
त्यांची हकालपट्टी करण्यात यावी आणि कामगारांच्या प्रलंबित कायदेशीर मागण्या मान्य करण्यात यावे अशी मागणी सोलापूरचे जिल्हाधिकारी यांना दिनांक ३० एप्रिल, १३ जून, ०८ ऑगष्ट २०२४ रोजी ३ निवेदने सादर केले होते. जिल्हाधिकारी सोलापूर यांनी मंत्री महोदयांची हकालपट्टी व कामगारांच्या मागण्याचे प्रस्ताव प्रधान सचिव मुख्यमंत्री सचिवालय मंत्रालय मुंबई यांना पाठवले आहेत. आणि स्थानिक कामगारांच्या मागण्यासंदर्भात सोलापूरचे सहाय्यक कामगार आयुक्त यांना महासंघाबरोबर बैठक लावून निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. सहाय्यक कामगार आयुक्त यांनी दिनांक १३ ऑगष्ट २०२४ बैठक घेऊन महासंघासोबत चर्चा केली, परंतु निर्णय घेतले नाही. त्यावर शासनाने निर्णय घेऊन कारवाई केली नाही.

शासनाच्या निषेधार्थ सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर दिनांक १५ ऑगष्ट २०२४ रोजी मोर्चा आयोजित करुन शासनाच्या प्रतिमेचे दहन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु शासनाचे प्रधान सचिव श्रीमती विनिता वेद सिंगल आणि सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आर्शिवाद यांनी मोर्चा रद्द करा निर्णय घेण्यात येईल असे सांगितल्यामुळे मोर्चा रद्द करण्यात आला होता. परंतु शासनाने निर्णय घेऊन कारवाई केली नसल्यामुळे महासंघाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

कामगार विभाग मंत्रालय मुंबई आणि इमारत व इतर बांधकाम कामगार कल्यणकारी मंडळ मुंबई या कार्यालयात झालेल्या कोठ्यावधीचे भ्रष्टाचार आणि कॉन्ट्रक्ट बेसवर घेतलेली नोकर भरत, कामगारांना दर्जेदार जेवणाचा ठेका, भांडे साहित्य वाटप ठेका राल्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी आपल्या नातेवाईकांना दिला आहे. यापूर्वी राज्याचे तत्कालीन कामगार मंत्री हसन मुशीफ यांनी ही अशाच प्रकारे कामकाज करुन कामगार विभागाच्या भ्रष्टाचार प्रकरणात मंत्री सुरेश खाडे यांनी संरक्षण देऊन पाठीशी घातले आहे. १५ दिवसात शासनाने निर्णय घेऊन महासंघाला उलट टपाली कळवावे अन्यथा महासंघाच्या वतीने कामगार विभागाचे प्रधान सचिव श्रीमती विनिता वेद सिंगल यांच्या निजी कक्षेसमोर मंत्रालय मुंबई येथे अन्न व पाणी त्याग करुन निर्णय होईपर्यंत महसंघाचे कार्यकर्ते आंदोलन करतील, असा इशारा कामगार संघटना महासंघाचे अध्यक्ष साथी बशीर अहमद यांनी पत्रकार परिषदेत दिले. या पत्रकार परिषदेत कामगार संघटना महासंघाचे पदाधिकारी साथी बशीर अहमद, सायबण्णा तेगेळ्ळी, साथी छगन पंढरे, राजअहमद मुल्ला, अशोक कांबळे उपस्थित होते.

आपला विश्वासू, વશીરજાદાય साथी बशीर अहमद अध्यक्ष

*** शिवक्रांती टीव्ही
दिन बंधू न्यूज चॅनेल
सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील

संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे ७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button