गाथा बसवण्याची लेखक चन्नवीर भद्रेश्वर मंडळी लिंगवंत वा लिंगायत म्हणवून घेतात.

गाथा बसवण्याची लेखक चन्नवीर भद्रेश्वर मंडळी लिंगवंत वा लिंगायत म्हणवून घेतात.
महात्मा बसवण्णांनी तत्कालीन वैदिक व्यवस्थेच्या विरोधात लढा देत समताधिष्ठित समाजाची उभारणी केली सामाजिक सुधारणेच्या एका सर्वोच्च टोकानंतर शरणभूमी कल्याण रक्ताने माखून गेली. हरळय्या आणि मधुवय्या यांच्या मुलांच्या विवाहाचे निमित्त झाले. शरणांची कत्तल झाली. वचन संपदा नष्ट करण्यात आली. शरण कल्याणातून परांगदा झाले. हा इतिहास आहे.
नंतरच्या काळात जानपद, लोकसाहित्य, लोककलेच्या माध्यमातून बसव विचारांचा जागर कायम राहिला. मात्र ते ज्या व्यवस्थेविरुद्ध लढले, त्या व्यवस्थेने आता त्यांच्या विचारांचाही ताबा घेतला आहे. सनातन वैदिक व्यवस्था आता स्वामी, जंगम, वीरशैव, माहेश्वर आणि आराध्यसह इतर रूपात अस्तित्वात आली. आदी जगद्गुरू शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या जगद्गुरू पीठांप्रमाणे पंचाचार्य पीठांची स्थापना झाली. सनातन वैदिक व्यवस्थेत ब्राम्हण या प्रमाणे वीरशैव लिंगायत व्यवस्थेत जंगम स्वामी अशी पुरोहितशाही अस्तित्वात आली. या व्यवस्थेने बसवण्णांचे नाव घेत आपला अजेंडा राबविला.
शरणांचेच नाव घेत व्यासपीठावरून भाषण ठोकू लागले. बसवादी शरणांच्या वचनांतून व्यक्त झालेल्या विचारांचीच ही विटंबना आहे. कर्मकांडाचे अवास्तव स्तोम न माजवता शुद्ध आचार आणि निस्सीम भक्तीचा मार्ग बसवण्णांनी सांगितला. मंदिर महात्म्य आणि पौरोहित्यशाहीसह पंचसूतकांना त्यांनी नाकारले आहे. आज तुम्ही रोज सकाळी कोणतेही टीव्ही चॅनेलवर पाहा, या झाडाला दूध वाहा, या देवाला तांदूळ अशाच भाकडकथा सांगणारे पुरोहित गुरुजी दिसतात. बसवण्णांनी जन्म, जाती, रजस्व, उच्छिष्ट, मृत्यू इत्यादीसंबंधीच्या सूतकांचे पालन करू नये, अशा लिंगायत धर्माज्ञेचे महत्त्व आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात ठळकपणे
जाणवते. ज्या शक्तींनी तथागत बुद्धाला दशावतारात गुंफून त्याला विष्णुरूप दिले. बसवण्णा स्थापित अनुभव मंटप या जगातील पहिल्या संसदेचे तिसरे अध्यक्षपद भूषविलेले, नाथ संप्रदाय आणि शरण संप्रदायाचे अन्योन्य संगम ठरलेल्या शिवयोगी सिद्धरामय्या यांना तळ्यातला महादेव याच रूपात बंदिस्त करून टाकले. त्या शक्तींच्या कचाट्यातून महात्मा बसवण्णा कसे सुटतील. व्यवस्थेने त्यांना महादेवाचे वाहन नंदीचा अवतार बनवून टाकले. महादेवाच्या समोरील बैल म्हणून त्या लोककल्याणकारी संताचा उपमर्द केला. परंतु नव्या साक्षेपी अभ्यासकांमुळे वैदिक व्यवस्थेचे पितळ उघडे पडताना दिसून येते. वस्तुनिष्ठ अभ्यासकांमुळे समाजाच्या मस्तकांत प्रश्न निर्माण झाला. त्या प्रश्नांच्या समाधानकारक उत्तरासाठी मस्तके आग्रह धरू लागली. प्रश्न विचारणारी मस्तके वाढल्याचे हे पचवणेही व्यवस्थेला कठीण होत असल्याने गोळ्या झाडल्या जात आहेत. पण मस्तके संपतील तरच ना नित्य नवी मस्तके निर्माण होतील, नव्याने
बसवादीशरणांची मांडणी होईल, नव्याने विवेकवाद सांगितला जाईल, तेव्हा नव्याने बंदूका तयारही होतील. बसव हा तीन अक्षरी मंत्र युगायुगात विचारी डोकी तयार करेल. बंदुकांना मर्यादा राहील, मस्तकांना नव्हे कारण धानप्पा पट्टणशेट्टी यांच्या ‘धर्मपिता महात्मा बसवण्ण्णा’ या प्रस्तुत पुस्तकामुळे दुष्काळी परिसरातही बसव प्रज्ञेची ही बाग बहरली असल्याचे स्पष्ट होते. जत या गावाला धानम्माताई-
धानेश्वरीपासून बसव विचारांचा इतिहास आहे. या इतिहासातील धग कायम ठेवण्याचे कार्य सत्यशोधक दीनबंधू संपादक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 क्रमशः




