सोशल

सद्भावना मंच सोलापूर

सद्भावना मंच सोलापूर

आम्ही कुठ जात आहोत ?

अशा प्रकारच्या छोट्या छोट्या घटना परंतु जास्त उग्रवादी आणि हिंसक (Law volum and high intesity) घटनांकडे जास्त कल असल्याचे दिसून येते. ज्याप्रमाणे झारखंडमध्ये एक युवक आणि अल्पवयीन मुलाला झाडावर फासाला लटकविण्यात आले. दादरीमध्ये मोहम्मद अखलाकची करण्यात आलेली निर्घुण हत्या, सांप्रदायिक दंगली यांचा विरोध करणाऱ्या लोकांना टार्गेट करून त्यांच्या हत्या दिल्ली, हरियाणा, मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात, मणिपूर, आग्रा आणि मुंबईमध्ये चर्चवरील हल्ले विश्वविद्यालयामधूप दलितांवरील अत्याचार, पुण्यातील एका मुस्लिम आयटी इंजिनियरवर झुंडशाहीच्या माध्यमातून हल्ला करून त्यांची हत्या, त्यानंतर अनेक झुंडशाहीच्या घटना, गुडगाव येथील मस्जिदीमधील मुस्लिम पेशइमामची हत्या, रेल्वेमध्ये मुस्लिम असल्याच्या आधारावर हत्या, शाळेतील शिक्षकांकडून अल्पवयीन मुस्लिम विद्यार्थ्यांवर अत्याचार, या त्या घटनांपैकी काही मोजक्या घटना आहेत की, ज्यांची चर्चा समाज माध्यमांवर झालेली आहे. परंतु सदरच्या घटना याबाबतही साक्ष देत आहेत की, आता जागतिक स्तरावरील बदनामी व विरोधालाही न जुमानता त्याकडे हेतुपुरस्पर काना डोळा केला जात आहे. ज्याप्रमाणे देशाच्या राज्यामध्ये, शहरात घडणाऱ्या दंगली हरियाणामधील मेवात येथील नूहच्या दंगली, देशातील बऱ्याच ठिकाणी बुलडोझरच्या माध्यमातून केलेला दहशतवाद या काही घटना आहेत की,

पान नं. ५

ज्याच्यामुळे देशाला जागतिक स्तरावर नामुष्की पत्करावी लागली. ज्यामुळे देशाचे चित्र मलिन करण्यात आलं. एवढेच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये विकसनशील व शांततेचे प्रतीक समजली जाणारी राज्य महाराष्ट्रात घडलेल्या सांप्रदायिक घटनादेखील येथील जनतेला विचार करण्यास भाग पाडीत आहे. नॅशनल क्राईम ब्युरोच्या अहवालानुसार वर्ष २०१४ ते २०२० च्या दरम्यान राज्यामध्ये सांप्रदायिक तणावाच्या एकूण २७२ घटनांची नोंद झाली. जिच्यामध्ये बळींची संख्या ९१७ दाखवली जाते. वर्ष२०२१ मध्ये देशात एकूण ३७८ घटनांची नोंद करण्यात आली होती. ज्यामध्ये ७७ घटना या केवळ महाराष्ट्र राज्यात घडल्या. झारखंडामध्ये घडलेल्या १०० घटना नंतर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर होता. जालना जिल्ह्यातील अन्वा गावामध्ये मशिदीतील पेशइमांमवरील जीवघेणा हल्ला, एका षडयंत्रकारी पद्धतीने सोशल महाराष्ट्र राज्यातील मिडियावर अफवा पसरवून साताऱ्यात एका मशिदीच्या मोज्जनच्या मुलाची हत्या, अशाच प्रकारे कोल्हापूर आणि अकोल्यामध्ये सोशल मिडीयाच्या पोस्टच्या माध्यमातून उद्भवलेला वाद आणि या वादात निष्पाप लोकांचा बळी, औरंगाबाद आणि अहमदनगरच्या शेगावमध्ये धार्मिक मिरवणुकीनंतर वाद निर्माण होणे. या सर्व घटना हे सिद्ध करतात की, सांप्रदायिक घटनांचे हे विष आपल्या राज्यात देखील झपाट्याने पसरत आहे. याशिवाय जर पूर्ण देशावर नजर फिरवली तर कळून चुकते

पान नं. ६ सत्यशोधक दीनबंधू संपादक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button