तरुण विद्यार्थी विद्यार्थिनी हे वाचलेच पाहिजे

तरुण विद्यार्थी विद्यार्थिनी हे वाचलेच पाहिजे सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एका खेडेगावातील शेतकरी मुलगा उद्योगपती होतो त्याचा आम्हाला अभिमान वाटतो उद्योगपती सदाशिव बोराटे यांची यशोगाथा मंडळी होती. आता सगळी नाव आठवत नाहीत. पण एक शंकर माने,
श्रीपती कदम व वडील इतकी माणसं असावीत. बैलांच्या गळ्यात घुंगरू बांधले होते. अशा वेळी मला कोणी चल म्हटलं नाही. मी फक्त पाहात होतो. दादासाठी मुलगी पहायला जाणाऱ्यांपैकी माझ्याकडे कोणाचच लक्ष नव्हतं. मी वडिलांजवळ हट्ट धरला पण ते काही येऊ देण्यास राजी झाले नाहीत. गाडी पुढे निघून गेल्यानंतर मी धूम ठोकली. गाडीच्या पाठीमागे पळत गेलो. बऱ्याच वेळानं गाडी गाठली. मला गाडीत जागा मिळाली पण श्रीपती कदमांच्या काठीने मार खाऊनच मला वाटतं त्या दिवशी माझे कपडे विटलेले होतेच पण फाटक्या चड्डीने नग्न अवस्था दिसत असावी.
त्याच दिवशी लग्नाचं देण्याघेण्याचं ठरलं असावं. नवरीकडील माणसांनी वन्हाड आणण्यासाठी किती बैलगाड्या दयायच्या ते ठरलं. माझ्या अंदाजाप्रमाणे 500 रूपये हुंडा व येणाऱ्या माणसांना जेवण ठरलं असावं. समोरचे पाहुणे श्रीमंत असावेत, त्यांच्याकडे म्हशी व बैल यांचा मोठा लवाजमा होता. शिवाय भला मोठा पानमळा होता. आपल्या घरी कोणीतरी नवीन माणूस येणार एवढंच मला कळलं.
ठरल्या दिवशी त्यांनी बैलगाड्या पाठवल्या. कोणाची बैलगाडी पुढे पळते व वेशीत कोणाचा नंबर पहिला लागतो यावरून मोठी भांडण झाली. वडाच्या झाडाखाली आमच्या थोरल्या बंधूंचं लग्न अनेक रूसवे व फुगवे होऊन पार पडलं. पिपाणी व हलगी ही वादयं लग्नासाठी वापरली गेली. सत्यशोधक दिन बंधू न्यूज संपादक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01


