बैंक ऑफ महाराष्ट्र, सोलापुर जनता सहकारी बँक इ. बँकांकडून दिलेली कर्जे” कायद्याच्या कक्षेत नसल्यामुळे “संबंधित बँक सील करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी

प्रेस न्यूज
1)”बैंक ऑफ महाराष्ट्र, सोलापुर जनता सहकारी बँक इ. बँकांकडून दिलेली कर्जे” कायद्याच्या कक्षेत नसल्यामुळे “संबंधित बँक सील करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी !”
“जिल्हा सरकारी वकील पदावर नियुक्त असलेल्या व्यक्तिला व्यावसायिक बँकेच्या संचालक पदावर राहता येईल का?”
बँक ऑफ महाराष्ट्र, सोलापूर जनता सहकारी बँक लिमिटेड, सोलापूर चे संचालक मंडळ, मुख्य व्यवस्थापक, शाखा व्यवस्थापक जुळे सोलापूर ब्रँच व संबंधित अधिकारी हे भारतीय रिजर्व बँकेच्या नियमांचे / तरतुदींचे उल्लंघन करून “बँक नोट” हीच “वैध रूपया” आहे असे भासवून भारतीय नागरिक असलेल्या तमाम कर्जदारांना दिलेली गृहकर्ज, व्यापारी कर्ज, उद्योग कर्ज, कॅश क्रेडीट (CC) कर्ज, शैक्षणिक कर्ज, पीक कर्ज, वाहन कर्ज इत्यादी कर्जे ही कायद्याचे उल्लंघन करून, कर्जदारांची दिशाभूल व फसवणूक करून दिलेली आहे. त्यामुळे भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १७८, १७९, १८०, ३१८, ३३६, ३३८, ३४१, ३४४ इ. कलमांन्वये बँकेने अपराध केलेला असल्यामुळे भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत फौजदारी गुन्हे दाखल होऊन संबंधित बँका सील करण्याची मागणी बसवराज येरनाळे यांनी बँकेला पाठविलेल्या नोटीसीद्वारे व पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारी अर्जामध्ये केलेली असून त्याची प्रत मा. जिल्हाधिकारी, मा. पोलीस आयुक्त यांना दिलेली असल्याचे पक्षकार संघाचे राज्यसहसचिव बसवराज येरनाळे यांनी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले.
त्याप्रमाणे सोलापूर जिल्हा न्यायालयामध्ये “जिल्हा सरकारी वकील” या पदावर नियुक्त असलेले मा.अॅड. प्रदिपसिंग रजपूत हे गेल्या अनेक वर्षापासून सोलापूर जनता सहकारी बँक लि. सोलापूर या नफा कमविणाऱ्या व्यावसायिक बँकेच्या “संचालक” या पदावर आहेत. त्यामुळे त्यांच्या “जिल्हा सरकारी वकील” या पदाचा प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष “लाभ” सोलापूर जनता सहकारी बँकेला होऊ शकतो. त्यामुळे सदरचे कृत्य हे कायद्यात किंवा नैसर्गिक न्याय तत्वात बसणारे आहे का? त्यामुळे याची दखल संबंधित न्यायालय, जिल्हाधिकारी यांनी घ्यावी अशी विनंती करीत आहोत.
त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील सर्व राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, पतसंस्था, फायनान्स कंपनी यांनी बँकेच्या दर्शनी भागात बँकेच्या ग्राहकांच्या हितार्थ खालील माहितीचे फलक त्वरीत लावण्याबाबतची मागणी पक्षकार संघाच्या वतीने करीत आहोत.
१) कायद्यानुसार “कर्ज म्हणजे काय? आणि कर्जाची व्याख्या स्पष्ट करावी.”
२) भारताचे चलन “रूपया म्हणजे काय? आणि “रूपया” वास्तवात कसा दिसतो ते स्पष्ट करावे.
३) राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, पतसंस्था, फायनान्स कंपन्या आपल्या ग्राहकांना “कोणत्या रूपयात कर्ज देते” याचा तपशील स्पष्ट करावा.
४) कायद्यानुसार “व्याज” म्हणजे काय? आणि बँकाना “कर्जदार चक्रवाढ व्याजाच्या रूपाने रक्कम घेता येते का? आणि कायद्यात “कर्जावर चक्रवाढ व्याज” घेण्याची तरतूद असल्यास बँकेने तपशील स्पष्ट करावा.
५) कर्जाचे हप्ते थकित झाले म्हणून बँकेला कर्जदाराचे व जामीनदाराचे बँक खाते सील करण्याचा किंवा बैंक खाते डेबिट होल्ड करण्याचा अधिकार कायद्यातील कोणत्या तरतुदीनुसार आहे हे बँकेने स्पष्ट करावे.
६) “सिबिल स्कोअर” या नावाने नागरिकांमध्ये दहशत व भिती निर्माण करून, नागरिकांची पत व प्रतिष्ठा व सन्मान याला धक्का पोहचवणारी व केवळ बँकांचा फायदा व्हावा या हेतूने निर्माण केलेली “सिबिल स्कोअर” ही संकल्पना रद्दबातल करावी.
७) “वर नमूद माहितीबाबतचे कायदेशीर फलक बँकेच्या प्रत्येक शाखेत लावून याचे जाहीर प्रसिध्दीकरण बँकेने केल्याशिवाय बँकेने, कर्जदार जामीनदार यांची मालमत्ता जप्ती करू नये.
सदर पत्रकार परिषदेला पक्षकार संघाचे प्रदेश सहसचिव बसवराज येरनाळे, बाबुराव मैंदर्गीकर, सतिश शिंदे, मन्त्रूसिंग बाबावाले, सुरज बिलोरे, किशोर वटवटवाले, राजू करनुर, व्यंकटेश बोगा, सत्यनारायण गड्डम इ. उपस्थित होते.
आपला विश्वासू,
(बसवराज येरनाळे) राज्य सहसचिव
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




