शरद शेतकरी संवाद मेळावा मराठा समाजाला आरक्षण देऊ न शकलेले फडणवीस आमची नक्कल करीत आहेत – बार्शीच्या शेतकरी संवाद मेळाव्यात शरद पवारांची टीका

🟠ओबीसी च्या बातम्या🟠
4) शरद शेतकरी संवाद मेळावा मराठा समाजाला आरक्षण देऊ न शकलेले फडणवीस आमची नक्कल करीत आहेत – बार्शीच्या शेतकरी संवाद मेळाव्यात शरद पवारांची टीका सत्तेत येण्यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी ५० टक्क्यांच्या आतच मराठा समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांना – शक्य झाले नाही. आता ते आमची नक्कल करीत आहेत, अशी टीका खा. शरद पवार यांनी केली.
बार्शीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार – पक्षाच्या वतीने आयोजित शरद शेतकरी संवाद मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील, आमदार रोहित पवार, ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, माजी आमदार राहुल मोटे, नारायण पाटील, विनायकराव पाटील, डॉ. प्रताप सिंह – पाटील, सक्षणा सलगर, गणेश पाटील, – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विश्वास बारबोले, शहराध्यक्ष किरण देशमुख, तालुकाध्यक्ष महेश चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष इकबाल पटेल, कृष्णराज – बारबोले, भारत देशमुख यांच्यासह – राष्ट्रवादी काँग्रेसचे बार्शी आणि जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. खा. पवार पुढे म्हणाले,
लोकसभेला चारशे पार म्हणाऱ्यांना तीनशे पार करता आले नाही. त्यांना दुसऱ्याची मदत घ्यावी लागली. आज या देशातील शेतकऱ्यांना त्यांच्या घामाची, कष्टाची किंमत मिळत नाही. मोदी यांच्या राज्यात शेतीची अवस्था गंभीर आहे. शेतकरी उत्पन्न नाही वाढले, उलट आत्महत्या वाढल्या. शेतकरी आत्महत्या ही साधी गोष्ट नाही. देशातील शेतकऱ्यांना त्याच्या कष्टाची किंमत मिळत नाही. तरुण नोकरी नाही म्हणून निराश झालेला दिसतोय, जिथे तरुण निराश असतो तिथल्या देशाचे चित्रही नैराश्यमय दिसतं आहे, असेही पवार म्हणाले.
यावेळी विश्वास बारबोले म्हणाले, पक्षात फूट पडली, पण न घाबरता लोकसभेत यश मिळविले. सुसंस्कृत राजकारण करण्याचा प्रयत्न केला. आज बार्शीतील परिस्थिती वाईट वळणावर थांबली आहे.
व्यापारी, कारखानदार दहशतीखाली वावरत आहेत. लोकांत भीतीचे वातावरण आहे. हे थांबविण्याची गरज. इथे माणूस उघड बोलू शकत नाही. आता आम्ही त्रास खपवून घेणार नाही. बेधडक लढणार आहोत, असेही बारबोले म्हणाले.
खा. धैर्यशील मोहिते-पाटील म्हणाले, विद्यमान सरकार फक्त स्कीमच्या घोषणा देतंय अन् दुसऱ्या बाजूला काढून घेतंय. सरकार फसवायच काम करतंय. फक्त योजना मोठ्या झाल्या. विकास आहे तिथंच आहे. फक्त ओरबडण्याच काम सुरू आहे. यावेळी रोहित पवार, कृष्णराज बारबोले, आदींनी विचार व्यक्त केले. किरण देशमुख यांनी आभार मानले. सभेनंतर शरद पवार यांनी जुने सहकारी रामचंद्र सोमाणी, दिलीप सोपल, प्रभाताई झाडबुके यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




