सोशल

मंडलनामा क्रमशः 38.बचत गट, महिला प्रशिक्षण

मंडलनामा क्रमशः

38.बचत गट, महिला प्रशिक्षण

नसीम महात या हरहुन्नरी व अत्यंत कुशल संघटक होत्या. सांगली जिल्ह्यातील मुस्लिम व इतर महिलांमध्ये त्यांचा पूर्वीपासूनच वावर होता. ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनमध्ये सामील झाल्यानंतर त्यांनी महिलांमधील संपर्काचा खुबीने उपयोग करण्यास सुरुवात केली. महिलांची आर्थिक स्थिती सुधारण्याकरिता सांगली जिल्ह्यात मुस्लिम महिलांचे एक हजारापेक्षा जास्त बचत गट स्थापन केले. या माध्यमातून महिलांमध्ये ओबीसी चळवळ पोहचवली. महिलांना आर्थिक शिस्त लावली. शासनाचे विविध लाभ महिलांना मिळवून दिले. बचत गटांच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होत असल्याने महिलांचा संघटनेवरील विश्वास वाढला. संघटना आतापर्यंत फक्त मेळावे, परिषदा, मोर्चे, आंदोलन, धरणे, उपोषण आदी कार्यक्रम करत होती. नसीम महात यांनी महिला आघाडीच्या माध्यमातून रचनात्मक काम सुरू केले. संघटनेत सामील झालेल्या महिलांच्या रोजगाराची चिंता केली. त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी साह्य केले. बचत गटांच्या माध्यमातून नसीम महात यांनी शेकडो महिलांचे संसार उभे केले. याचा संघटनेच्या कार्यालाही हातभार लागला. या बचत गटाच्या माध्यमातून संघटित झालेल्या महिलांनी १९९९ मध्ये मिरज विधानसभा मतदारसंघात आमचे उमेदवार हाफीज धत्तुरे

यांचा जोरदार प्रचार करून विजयात सिंहाचा वाटा उचलला.

फक्त बचत गट स्थापन करून भागणार नव्हते. या महिलांना रोजगार द्यायचा तर त्यांना व्यवसाय प्रशिक्षण देणे गरजेचे होते. मिरज, सांगली भागात मुस्लिम व इतर धर्माच्या गरीब महिला विड्या वळण्याचे काम मोठ्या प्रमाणातच करत. तेथे त्यांचे शोषण होत होते. नसीम महात यांनी त्या महिलांमध्ये संपर्क वाढवून त्यांचे बचत गट बांधले. या व इतर महिलांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यासाठी महिला प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली. आम्ही तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची भेट घेऊन सांगली जिल्ह्यातील महिला चळवळीची माहिती दिली. महिला प्रशिक्षण केंद्राची संकल्पना देशमुख यांना पटली. त्यांनी प्रशिक्षण केंद्र मंजूर करण्यास संमती दिली. शासनाकडून प्रशिक्षण केंद्र मिळेल पण जागा कोठून आणायची? आम्ही शासनाकडे जागेची मागणी केली. विलासराव देशमुख यांनी विशेष बाब म्हणून ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनला महिला प्रशिक्षण केंद्रासाठी २००१ मध्ये मिरज येथे २२ गुंठे जागा दिली. हा निर्णय घेताना या जागेचा वापर कोणत्याही धार्मिक कामासाठी करता येणार नाही, अशी अट घातली आहे. संघटनेने या जागेवर १४ हजार चौरस फुटांचे बांधकाम करून ‘ओबीसी भवन’ बांधले. त्यासाठी विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, सुरेश कलमाडी, प्रफुल्ल पटेल यांनी त्यांचा आमदार, खासदार निधी दिला. या जागेत सुरू झालेले महिला प्रशिक्षण केंद्र नसीम महात यांनी अत्यंत धडाडीने चालवले. हे केंद्र आजही सुरू असून शिलाई. विणकाम, मसाला, कुक्कुटपालन, ब्युटीपार्लर, शेळीपालन, दुग्धजन्य पदार्थ निर्मिती यासह विविध व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षणानंतर महात यांनी महिलांना यंत्र

खरेदीसाठी दानशूर मंडळींकडून आर्थिक साह्य मिळवून दिले. मुस्लिम महिलांचे कौटुंबिक प्रश्न सोडवण्यासाठी आयपीएस अधिकारी श्रीदेवी गोयल यांनी कौटुंबिक समुपदेशन केंद्र चालविण्याची परवानगी दिली. नसीम महात यांनी या केंद्राद्वारे अनेकांचे तुटणारे संसार जुळवले.

मिरजचे आमदार हाफीज धत्तुरे हे मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष झाले. त्यांच्या कार्यकाळात नसीम महात यांची महामंडळाच्या संचालकपदी नेमणूक करण्यात आली. या कार्यकाळात त्यांनी महामंडळामार्फत महाराष्ट्रातील मुस्लिम महिलांना रोजगार निर्मितीसाठी मोठी मदत केली. नसीम महात यांचे कार्य जोमाने वाढत असल्याने सांगली व मिरज भागात त्यांचे विरोधकही तयार झाले. त्यांनी महात, संघटना व माझ्यावर निरनिराळ्या प्रसंगी टीका केली. महात यांना संघटनेपासून तोडण्याचाही अनेकांनी प्रयत्न केला. पण ही जहरी टीका पचवून त्या संघटनेत कार्यरत राहिल्या.

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button