सोशल

भटक्या समाजात जातीनिहाय जनगणना व्हावी:शरद पवार यांची मागणी भटके विमुक्त ओबीसी संघटनेचा राज्यव्यापी मेळावा

🟠ओबीसी च्या बातम्या🟠

5) भटक्या समाजात जातीनिहाय जनगणना व्हावी:शरद पवार यांची मागणी
भटके विमुक्त ओबीसी संघटनेचा राज्यव्यापी मेळावा

सोलापूर : भटका समाज हा जातींमध्ये विखुरला असून, या समाजाची जातीनिहाय जनगणना व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी या जनगणनेचा प्रश्न संसदेमध्ये मांडण्याची रविवारी येथे ग्वाही दिली.
सोलापुरात भटके विमुक्त ओबीसी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा राज्यव्यापी मेळावा झाला. पवार यांनी या मेळाव्यास संबोधित केले. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे होते. मंचावर राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते- पाटील, महिला आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा कविता म्हेत्रे, शहराध्यक्षा सुनीता रोटे, काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष भारत जाधव, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, सुधीर खरटमल, तोफिक शेख, महेश कोठे, सुरेश हसापूरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष

चेतन नरोटे, माजी महापौर मनोहर सपाटे, सिद्राम जाधव, युवराज जाधव,लक्ष्मण भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. पवार यांनी आपल्या भाषणातून विखुरलेला भटका समाज नेमका किती याचा शोध घेतला पाहिजे, यासाठी जातीनिहाय जनगणना व्हावी ही समाजाची मागणी रास्त असून, यासाठी आम्ही संसदेमध्ये पाठपुरावा करण्यास कटिबद्ध आहोत. सत्तेचा अधिकार वापरून भटक्या विमुक्तांचे प्रश्ना सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न केले विस्थापित असलेल्या समाजामुळे शासकीय योजना त्यांच्यापर्यंत पोहाचण्यास अडथळे निर्माण होताहेत. या समाजास ऊर्जितावस्था मिळण्यासाठी सुरू केलेल्या आश्रमशाळा जाचक अटींमुळे कमी होत असल्याची चिंता व्यक्त करीत याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय भाषणातून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भटक्या विमुक्त समाजाचे मेळावे भरवून त्यांचे प्रश्न शासन दरबारी पोहोचवले पाहिजेत. फसवेगिरी करणाऱ्यांपासून सावध राहा. आमिषाला बळी पडू नका. प्रलंबित प्रश्नांसाठी एकसंध राहून लढा कायम चालू ठेवावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button