मंडलनामा क्रमश:22. छगन भुजबळ आणि समता परिषद

मंडलनामा क्रमश:22. छगन भुजबळ आणि समता परिषद
ओबीसी नेते छगन भुजबळ पूर्वी शिवसेनेत होते. मंडल आयोगाची अंमलबजावणी व आरक्षण या मुद्द्यावर त्यांची घुसमट होत असल्याने ते शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये दाखल झाले. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी ते आग्रही असत. समस्त ओबीसी समाजाला एकत्र करण्यासाठी ते सतत बैठका घेत. या बैठकांमधून झालेल्या विचारविनिमयातून सर्व ओबीसींची संघटना स्थापन करावी व तिच्यामार्फत मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी पाठपुरावा करावा, असे ठरले. यासाठी छगन भुजबळ यांनी त्यांच्या देवगिरी या शासकीय बंगल्यावर बैठक आयोजित केली.
या बैठकीला अॅड. जनार्दन पाटील (आगरी समाज), मी शब्बीर अन्सारी (मुस्लिम ओबीसी), भीमराव कटकधोंड (चर्मकार समाज), जी. जी. चव्हाण (भटके विमुक्त समाज), डॉ. प्रल्हादराव वडगावकर (ओबीसी महासंघ), नेताजी गुरव (गुरव समाज), रामराव शिंदे (वडार समाज), वसंतराव जगदाळे (कुंभार समाज), दीपक म्हस्के (दलित समाज), अॅड. ज्ञानेश्वर पाटसकर (शिंपी समाज), राजन शर्मा व डॉ. निरगूडकर (ब्राह्मण समाज), निवृत्ती पावले (साळी समाज), काका गायकवाड व बाळकृष्ण घाडगे (नाभिक समाज), नंदू क्षीरसागर (तेली समाज), श्रीमती फुलवंताबाई झोडगे, कृष्णकांत कुदळे व वसंतराव नन्नावरे (माळी समाज), पत्रकार पांडुरंग गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद स्थापन करण्यात आली. संघटनेच्या अध्यक्षपदी छगन भुजबळ, कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे व सचिवपदी वसंतराव नन्नावरे
यांची निवड करण्यात आली.
संघटनेने ठरवल्यानुसार महात्मा फुले समता परिषदेचा पहिला विभागीय मेळावा ६ जून १९९३ रोजी जालना येथे घेण्यात आला. आझाद मैदानावर झालेल्या या मेळाव्याला मराठवाड्यातील ओबीसी व मुस्लिम ओबीसी बांधवांनी मोठी गर्दी केली. पहिल्या विभागीय मेळाव्याला मुख्यमंत्री शरद पवार, छगन भुजबळ, विलासराव देशमुख, अॅड. जनार्दन पाटील, वसंतराव नन्नावरे, कृष्णकांत कुदळे, मी शब्बीर अन्सारी व ओबीसी समाजातील अनेक नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती. या मेळाव्यात १७ ठराव मंजूर करण्यात आले. त्यात महाराष्ट्रात मंडल आयोगाच्या शिफारशींची तत्काळ अंमलबजावणी करावी हा अत्यंत महत्त्वाचा ठराव होता. या ठरावाच्या अनुषंघानेच पुढे मुख्यमंत्री शरद पवार यांनी १९९४ मध्ये मंडल आयोगाच्या शिफारशींनुसार ओबीसींना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. या मेळाव्यानंतर पुण्यातील सर परशुराम महाविद्यालयाच्या पटांगणावर १० डिसेंबर १९९३ रोजी महात्मा फुले समता परिषदेचा दुसरा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला राष्ट्रपती डॉ. शंकरदयाल शर्मा, महाराष्ट्राचे राज्यपाल डॉ. पी. सी. अलेक्झांडर, मुख्यमंत्री शरद पवार, छगन भुजबळ यांच्यासह राज्याचे अनेक मंत्री, परिपदेचे पदाधिकारी, अॅड. जनार्दन पाटील व मी उपस्थित राहिलो. परिषदेत इतर मान्यवरांसह माझेही भाषण झाले. यानंतर अमरावती येथे २० मार्च १९९४ रोजी महात्मा फुले समता परिषदेचा तिसरा मेळावा पार पडला. या मेळाव्याला मुख्यमंत्री शरद पवार, छगन भुजबळ व इतर मंत्री, परिषदेचे पदाधिकारी व मी उपस्थित होतो. या मेळाव्यांमुळे महाराष्ट्रात मंडल आयोगाच्या बाजूने वातावरण निर्मिती झाली.
🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴




