सोशल

🔶शुभकार्याच्या बातम्या🔶

🔶शुभकार्याच्या बातम्या🔶

[1].स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला भव्य वक्तृत्व स्पर्धा

सोलापूर : विद्यार्थ्यांना संवाद कौशल्य विकसित करण्यात मदत व्हावी, सार्वजनिक बोलण्याचे कौशल्य वाढीस लागावे, तसेच विदयार्थ्यांना नवीन कल्पना आणि दृष्टिकोन शोधण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या हेतून CITU अर्थात सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्सच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला अर्थात १४ ऑगस्ट २०२४ रोजी डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे संध्याकाळी ५ च्या पुढे पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘जागर स्वातंत्र्याचा वक्तृत्व स्पर्धा २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्या स्पर्धकांना

प्रथम क्रमांक : ११०००/- रु. रोख व आकर्षक स्मृतिचिन्ह

‌द्वितीय क्रमांकः ७०००/- रु. रोख व आकर्षक स्मृतीचिन्ह

तृतीय क्रमांकः ५०००/- रु. रोख व आकर्षक स्मृतीचिन्ह

उत्तेजनार्थ-१: ३०००/- रु. रोख व आकर्षक स्मृतीचिन्ह

उत्तेजनार्थ-२: ३०००/- रु. रोख व आकर्षक स्मृतीचिन्ह

असे बक्षीसे देण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक सहभागी स्पर्धाकाला सहभाग प्रमाणपत्र देण्यात येईल.

वक्तृत्व सहभागीचे विषयः-

१) मार्क्स आणि भगतसिंग यांच्या संकल्पनेतील समाजव्यवस्था

२) शैक्षणिक धोरण आणि वाढती बेरोजगारी

३) स्वातंत्र्योत्तर काळातील गांधीवाद

४) संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर

५) प्रसार माध्यमांचे राजकारण लोकशाही पुढील आव्हान

६) आरक्षणाचा सामाजिक आक्रोश
७) धर्मनिरपेक्ष भारतातलं वास्तव

८) आंदोलने भारतीय लोकशाहीला नवसंजीवनी देतील का?

दत्तनगर येथील सिटूच्या मध्यवती कार्यालयात प्रवेशिका मिळतील. प्रदेशिका स्वीकारण्याची अंतिम तारीख दिनांक 8 ऑगस्ट 2024 आहे. तरी सोलापूर शहर व जिल्ह्यातील वरिष्ठ महावि‌द्यालयातील स्पर्धकांनी या स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन वक्तृत्व स्पर्धा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी संपर्कः प्रा. इलियास सि‌द्धिकी (९८६०७५९५२७), अंड अनिल वासन (९३७३५७९१८९), दत्ता चव्हाण (९७६७०६५८६१), मल्लेशम कारमपुरी (८६०५७२७५४५ )

वक्तृत्व स्पर्धेच्या अटीः

१) स्पर्धक हा कोणत्याही मान्यताप्राप्त वरिष्ठ शैक्षणिक महाविद्‌यालयाचा वि‌द्यार्थी विद्यार्थिनी असावा असावी.

२) स्पर्धकांनी अर्जासोबत महावि‌द्यालयाने दिलेल्या त्यांच्या ओळखपत्राची छायांकीत प्रत (स्वतः साक्षांकित केलेली) पाठविणे आवश्यक आहे.

३) स्पर्धकाचे वय १८ वर्षे (पूर्ण) ते २४ वर्षे (पूर्ण) या दरम्यान असले पाहिजे जर स्पर्धकाची वयाची १८ वर्षे पूर्ण झाली नसतील तर त्याच्या पालकाचे परवानगीपत्र सोबत असणे आवश्यक

आहे.

४) प्रत्येक महाविद्यालयातून फक्त दोन स्पर्धकांचे प्रवेश अर्ज स्वीकारले जातील

५) ही स्पर्धा सोलापूर शहर व जिल्ह्यातील खऱ्याखुऱ्या (बोनाफाईड) वि‌द्याथ्यांसाठी खुली आहे.

६) स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क (फी) नाही ७) स्पर्धेतील प्रवेश / भाषण हे स्पर्धकाने स्वतः तयार केलेले असले पाहिजे. त्यात काही गद्य/पद्म अवतरणे उद्धृत केल्यास त्याच्या लेखकांची माहिती दिली पाहिजे. स्पर्धकाचे भाषण ही त्याची व्यक्तिगत बौदधिक संपदा समजली जाईल व तिचे स्वामित्व मालकी संपूर्णपणे स्पर्धकाकडे राहील (उद्धृत केलेल्या अवतरणाव्यतिरिक्त)

८) स्पर्धकाच्या भाषणात / अभिव्यक्तीमध्ये कोणत्याही प्रकारचा अपशब्द, तिरस्कार, सांप्रदायिक, जातीय, बदनामीकारक, लैंगिक, क्षोभक, अवमानकारक, राजद्रोह संकल्पना, विचार किंवा भाषा नसेल, तसेच त्यात बेकायदेशीर, अवैध, अनैतिक आणि सार्वजनिक धोरणाच्या विरोधी असा कोणताही मजकूर नसेल. याशिवाय ज्यामुळे कुणाच्याही खासगी जीवनात हस्तक्षेप किंवा भंग होईल, असा मजकूर किंवा अन्य कुणाच्या बौ‌द्धिक संपदेचे उल्लंघन करणारे काहीही आपल्या भाषणात नाही याची दक्षता स्पर्धकांनी घ्यावी.

९) स्पर्धकांनी सर्व काळात व्यक्तिगत सभ्याचार, शिष्टाचार, विवेक, प्रतिष्ठा यांचे पालन करावे.
१) नियोजित वेळ, तारीख व स्थळ येथे स्पर्धक उपस्थित नसल्यास किंवा संमतीपत्रातील अटींचा भंग करणाऱ्या स्पर्धकांना अपात्र ठरविले जाईल.

१०) स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी स्पर्धकाने आपली प्रवेशिका सादर करणे आवश्यक आहे.

११) स्पर्धेच्या जागी येण्याची व्यवस्था स्पर्धकाला स्वतःच करावयाची आहे. त्याबाबत आयोजक (CITU) यांच्यावर कसलीही जबाबदारी नाही.

१२) प्रत्येक स्पर्धकाने स्पर्धेच्या वेळी आणि जागी आपले शारीरिक आरोग्य व मनःस्थिती चांगली असल्याबददल खात्री करून घ्यावी.

१३) कोणत्याही प्रकरणी आयोजकांचा निर्णय हा अखेरचा, बंधनकारक व अंतिम स्वरूपाचा असेल.

१४) कोणताही स्पर्धक स्पर्धेच्या जागेवर किंवा त्यापूर्वी तेथे तंबाखू / मद्य किवा अन्य कोणताही बेकायदेशीर पदार्थ आणणार नाही किंवा त्यांचे सेवन वापर करणार नाही व कोणतेही त्रासदायक वर्तन करणार नाही.

१५) या स्पर्धेचे आयोजक (CITU) यांनी कोणत्याही वेळी कोणतीही सूचना न देता सदर स्पर्धा किंवा तिचे संबंधित नियम यात बदल करण्याचा, तसेच ही स्पर्धा तहकूब, रद्द किंवा सुधारित करणे, तसेच यात अन्य कोणत्याही प्रकारे भर घालणे / वाढ करणे किंवा विभाजन करणे इत्यादीचे, तसेच बक्षिसामध्ये बदल करण्याचे आयोजकांचे अधिकार राखून ठेवले आहेत.

१६) परीक्षक मंडळ – प्रवेशिका / भाषणे यांची अल्पसूची (शॉर्ट लिस्ट) तयार करणे आणि विजेते ठरविणे यासाठी आयोजक (CITU) एक परीक्षक मंडळ तयार करील. परीक्षकांचा व CITU यांचा निर्णय अखेरचा व बंधनकारक राहील.

१७) संबंधित वक्ता / स्पर्धक हाच / हीच त्याची / तिची प्रवेशिका / भाषण आणि त्यातील समाविष्ट मजकूर याला जबाबदार राहील.

१८) प्रत्येक स्पर्धकाला ७ मिनिटांची वेळ मर्यादा राहील.

१९) स्पर्धा हिंदी मराठी व इंग्रजी भाषेत होईल.

[2]. कला श्री नृत्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कृष्णानुभूती

दि. २७ जुलै २०२४ रोजी, श्री छत्रपती रंगभवन नाट्यगृह येथे दुपारी ४ वाजता, कलाश्री नृत्यालयाच्या रौप्य मोहोत्त्सवी वर्ष निमित्त ” कृष्णानुभूती” हा भरतनाट्यम नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून गुरुवर्य श्री. रघुनाथ गड्डम यांची उपस्थिती आहे व प्रमुख पाहुणे म्हणून श्री. पी आर कुलकर्णी, श्री. पांडुरंग व्हनकडे व सौ. अश्विनी जाधव उपस्थित राहतील.

गेल्या २५ वर्षा पासून कलाश्री नृत्यालयाच्या माध्यमातून नृत्य विशारद सौ. शिल्पा दीक्षित या अनेक वि‌द्यार्थीनींना भरतनाट्यम नृत्याचे शिक्षण देत आहेत. आता पर्यंत विद्यालयाच्या अनेक विद्यार्थीनींनी नृत्य विशारद पदवी संपादन केली आहे. या वर्षी नृत्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्ष निमित्त कलाश्री नृत्यालयाच्या ६० विद्यार्थिनी कृष्ण जीवनावर ” कृष्णानुभूती ” हा कार्यक्रम सादर करणार आहेत.
सोलापूर येथे सन १९८५ पासून सौ. शिल्पा कुलकर्णी दीक्षित यांनी गुरुवर्य श्री. रघुनाथ गड्डम सर यांच्याकडे भरतनाट्यम नृत्य शिक्षणाला सुरवात केली. १९९६ साली त्यांनी अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाची “नृत्यविशारद” हि पदवी प्रथम श्रेणीत संपादन केली. १९९७ साली सोलापुरातील प्रथम “भरतनाट्यम अरंगेत्रम” हुतात्मा स्मृती मंदिर येथे सादर केला. १९९९ साली त्यांनी स्वतःचे भरतनाट्यम नृत्य वर्ग सुरु केले. सन २००० मध्ये त्यांनी टिळक मारहाराष्ट्र विद्यापीठ. पुणे यांची नृत्य प्रवीण हि पदवी संपादन केली.

भरतनाट्यम चे शिक्षण घेत असताना शालेय जीवनात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात प्रथम क्रमांकाचे बक्षिसे मिळवले. १९८७ साली त्यांना कला निर्माण संस्थेचा “बाल नृत्य भूषण” हा पुरस्कार मिळवला. २००२ साली त्यांनी सौ. अश्विनी जाधव यांच्या बरोबर ३० विद्यार्थिनींना घेऊन नृत्य रंग हा कार्यक्रम सादर केला. या मध्ये भरतनाट्यम नृत्य मधून भाव- भक्ती गीते सादर केली. हा कार्यक्रम त्या वेळी असलेल्या अल्फा मराठी व इ. टीव्ही मराठी वाहिन्यांनी प्रसारित केला.

२००५ पासून त्यांनी पुणे येथे प्रख्यात नृत्यगुरू सौ. स्वाती दैठणकर यांच्या कडे पुढील शिक्षण घेतले. १९९९ पासून अनेक शाळा, महाविद्यालये, अनेक संगीत नाटक या मध्ये नृत्य दिग्दर्शन करत असतानाच कलाश्री नृत्यालयाचा माध्यमातून त्यांनी असंख्य विद्यार्थिनींना भरतनाट्यम नृत्याचे शिक्षण दिले. आत्ता पर्यंत नृत्यालायचा अनेक विद्यार्थिनींनी नृत्य विशारद पदवी संपादन केली आहे. रौप्य महोत्सवी वर्षा निमित्त्य आयोजित या कार्यक्रमात सर्व विशारद झालेल्या मुलींचा सत्कार करण्यात येणार आहे.

गेल्या २५ वर्षात कलाश्री नृत्यालयाच्या माध्यमातून १००० ते १५०० विद्यार्थिनींनी भरतनाट्यम नृत्याचे शिक्षण घेतले आहे. कलाश्री नृत्यालायच्या विद्यार्थिनींनी आज पर्यंत अनेक स्पर्धेतून प्रथम क्रमांकाचे बक्षिसं मिळवलेले आहे व आपली कला देश विदेशात सादर केली आहे.

२५ वर्षा पासून सौ. शिल्पा दीक्षित अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षक म्हणून महाराष्ट्र व महाराष्ट्र बाहेर हि काम पाहतात. दिनांक २७ जुलै २०२४ रोजी कलाश्री नृत्यालयाच्या ६० विद्यार्थिनी कृष्ण जीवनावर आधारीत “कृष्णानुभूती” हा कार्यक्रम सादर करणार आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. पांदूरंग व्हनकेडे, श्री. पी. आर कुलकर्णी व सौ. अश्विनी जाधव हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गुरुवर्य श्री. रघुनाथ गड्डम सर उपस्थित राहणार आहे.

टीप: सोबत निमंत्रण पत्रिका जोडत आहे.

आपली विश्वासू,
अनुषा शिंदे, अंकिता हर्षा

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील

🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button