सोशल

महात्मा फुले साहित्य आणि चळवळ क्रमशा. 40

महात्मा फुले साहित्य आणि चळवळ क्रमशा. 40

 

पत्नी सावित्रीबाई यांना स्वतः शिक्षण दिले; आणि त्या त्यांच्याबरोबर नियमितपणे शाळेत येऊ लागल्या. चूल व मूल यात गुंतून न पडता घराचा उंबरठा ओलांडणारी व सामाजिक कार्यात भाग घेणारी महाराष्ट्रातील पहिली स्त्री सावित्रीबाई याच होत. आपला सगळा समाजच इथून तिथून रूढीपूजक होता. मग एका शूद्र स्त्रीने अशा प्रकारे आपली पायरी सोडून वागणे ते तत्कालीन उच्चवर्णियांना साहजिकच सहन झाले नाही. त्यांनी जे आकांडतांडव करायचे ते केलेच, परंतु जोतीरावांच्या माळी जातीतील लोकांनाही त्यांचे हे कृत्य पसंत पडले नाही. या सर्वांनी मिळून जोतीरावांच्या वडिलांवर सतत दडपण आणले; मुलाला सुनेसह घराबाहेर काढण्यास भाग पडले. तरी एकदा हाती घेतलेले कार्य सोडून देण्याची कल्पनाही फुले पति-पत्नीच्या मनाला शिवली नाही.

सावित्रीबाईंनी जोतीरावांना अखेरपर्यन्त समरसतेने व सातत्याने साथ दिली. परंतु समाजपरिवर्तनाच्या कार्यात त्या केवळ त्यांची सावली होऊन राहिल्या नाहीत. त्यांचे व्यक्तित्व जोतीरावंच्या व्यक्तिमत्वाशी संवादी असले, तरी स्वतंत्र होते. त्यांचे विचार त्यांनी डोळसपणे ग्रहण केले होत. त्यांची तत्त्वप्रणाली त्यांनी तत्परतेने आत्मसात केली होती. सावित्रीबाईंच्या चरित्रात त्यांची कार्यनिष्ठा व नीतिधैर्य यांची ग्वाही देणारे कितीतरी प्रसंग आढळून येतात. सनातनी लोकांनी कितीही अडथळे आणले, तरी शेवटी आपल्या तत्त्वांचाच विजय होणार याबद्दल त्यांना शंका नव्हती. त्या दृष्टीनेच त्यांनी माहेराहून जोतीरावांना १० ऑक्टोबर १८५६ रोजी लिहिलेल्या पत्रात “पुण्यास आपल्याविषयी दुष्टावा माजविणारे विदूषक पुष्कळ आहेत. तसेच येथेही आहेत. त्यांना भिऊन आपण हाती घेतलेले कार्य का सोडून द्यावे ? सदासर्वदा कामात गुंतावे, भविष्यातले यश आपलेच आहे. २६ असा आशावाद प्रकट केला आहे.

घराचा आधार तुटल्यामुळे जोतीरावांना उदरनिर्वाहाकरिता स्वतंत्र व्यवसाय शोधावा लागला. या गडबडीत शाळेतील मुलींची संख्या रोडावली, आणि काही काळ ही शाळा बंद पडली. पुढे सर्व काही स्थिरस्थावर होऊन जरा

शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक
शंकरराव लिंगे 73
87 37 78 01

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button