सोशल

दिनांक १७ एप्रिल १९११ रोजी सत्यशोधक समाजाचे पहिले अधिवेशन पुणे मुक्कामी पार पडले.

– प्राचार्य गजमल माळी, २. विजयी मराठा अंक – ५-९-१९२७, ३. दीनमित्र अंक – ३०-५-१९२३, ४. दीनमित्र अंक – ५-५-१९१४

आवटे

बापूराव रामचंद्र

(मृत्यू १३ सप्टेंबर १९१९)

पुणेकर सत्यशोधक देवराव कृष्णराव ठोसरांचे अॅड. बापूराव रामचंद्र आवटे हे तीन जावयांपैकी एक सत्यशोधक जावई होते. देवराव ठोसरांची द्वितीय कन्या बापूराव आवटे यांना दिली होती. बापूराव आवटे हे विधिज्ञ (बी. ए., एलएल. बी.) होते. अॅड. आवटे हे सन १९१२ च्या सुमारास बडोदा येथे सब जज्ज होते. अॅड. आवटे हे कट्टर सत्यशोधक समाजीयन होते.

दिनांक १७ एप्रिल १९११ रोजी सत्यशोधक समाजाचे पहिले अधिवेशन पुणे मुक्कामी पार पडले. या अधिवेशनाला अॅड. आवटे आवर्जून उपस्थित होते. दरम्यान, सत्यशोधक अधिवेशन चळवळीपूर्वी ‘मराठा शिक्षण परिषदे’ला इ. स. १९०७ पासून आरंभ झाला. मराठा शिक्षण परिषदेचे पहिले अधिवेशन ३० व ३१ डिसेंबर १९०७ रोजी धारवाड येथे संपन्न झाले. या अधिवेशनातील निबंध

सत्रात ‘मराठा शिक्षण परिषद-तिची आवश्यकता, उद्देश आणि कार्य’ या विषयावर त्यांनी निबंधाचे वाचन केले. या नंतर मुंबई येथे संपन्न झालेल्या दुसऱ्या मराठा शिक्षण परिषदेतही (१९०८) त्यांनी एका अभ्यासू निबंधाचे वाचन केले. अॅड. आवटे यांचे साडू ‘दीनबंधु’कार वासुदेवराव बिर्जे यांचे नाशिक येथे

कॉलऱ्याच्या साथीत डिसेंबर १९०८ मध्ये अकस्मात निधन झाले. अशा बिकट प्रसंगी ‘दीनबंधु’ पत्र प्रसिद्धीसाठी त्यांनी, त्यांच्या पत्नी तानुबाई बिर्जे यांना मोलाचे सहकार्य केले. पुढे १५ डिसेंबर १९१२ रोजी प्रकाशित झालेल्या वासुदेवराव बिर्जे यांच्या ‘क्षत्रिय आणि त्यांचे अस्तित्व’ या ग्रंथाच्या दुसऱ्या आवृत्तीला अॅड. आवटे यांनी चिकित्सक प्रस्तावना लिहिली आहे. इंग्रजीत असलेली ही प्रस्तावना अभ्यासू, चिंतनपर, चिकित्सक अशी आहे. या प्रस्तावनेमुळे विर्जे यांचा जीवनपट समजण्यास काही अंशी मदत होते. प्रस्तुत चिंतनपर प्रस्तावना दोन विभागांत विभागली असून पूर्वार्धात बिर्जे यांच्या जीवनकार्यावर चांगला प्रकाश

सत्यशोधकांचे अंतरंग / २६

टाकते. प्रस्तुत ग्रंथाची ही १९०३ च्या प्रकाशित ग्रंथाची निखळ पुनर्मुद्रित आवृत्ती नसून आवटे यांचे या आवृतीला काही अभिप्रायही जोडलेले आहेत. सत्यशोधक देवराव ठोसरांचे एक जावई, एकनिष्ठ सत्यशोधक अनुयायी, बहुश्रुत निबंधकार, न्यायमूर्ती बापूराव आवटे यांचे दिनांक १३ सप्टेंबर १९१९ रोजी मुंबई येथे अकस्मात निधन झाले.

संदर्भ – १. क्षत्रिय आणि त्यांचे अस्तित्व कै. वासुदेवराव लिंगोजी विजें (द्वितीय आवृत्ती), २. ‘दीनमित्र’ अंक – २४-१-१९१९

0

आल्हाट

गणपत तुकाराम

गणपत तुकाराम आल्हाट हे पुणेकर सत्यशोधक असून, सत्यशोधक समाजाच्या १८७३ ते १८७५ या दोन वर्षांच्या अहवालात यांच्या सत्यशोधकों कार्याचा उल्लेख आहे. तो असा की, आल्हाट यांनी त्यांच्या आजीचा दशक्रिया विधी सत्यशोधकमते केला. सत्यशोधक समाजाच्या सभासदांनी त्यांचे विर्घा सत्यशोधक

समाजमते करावे, असे म्हटले आहे. संदर्भ – १. महात्मा फुले समग्र वाङ्मय संपादक – य. दि. फडके

आत्माराम रामचंद्र

इंगळकर

सत्यशोधक शाहीर आत्माराम इंगळकर यांचे शिगावा, ता. वाळवे, जिल्हा सांगली येथे वास्तव्य होते. मात्र कामगार असल्याने ते कामगार चळवळीतील एक पुढारी होते. इंगळकर प्रभादेवी विभागाच्या सत्यशोधक शाखेचे बरीच वर्षे अध्यक्ष होते. शाहीर इंगळकरांनी १९५६ मध्ये स्वतःचे कलापथक उभे केले होते.

सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button