सोशल

आनंदस्वामींनी वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी योगाभ्यासास प्रारंभ केला.

थोरले शंकरराव आणि त्यांच्या पाठचे रामभाऊ हे आनंदस्वामींचे बंधू होते. या दिवटे कुटुंबास वाघुंडे येथे आठ-दहा एकर कोरडवाहू जमीन होती. शंकरराव हे वडगाव रासाई येथील आश्रमात महंत होते. या आश्रमात आरंभी आनंदस्वामींचे जाणे-येणे असे. आनंदस्वामींनी वयाच्या अवघ्या १२ व्या वर्षी योगाभ्यासास प्रारंभ केला.

 

धिप्पाड शरीरयष्टी, कुशाग्र बुद्धी आणि पहाडी आवाजाची जन्मजात देणगी लाभलेल्या आनंदस्वामींचे मूळ नाव बहुधा काशीनाथ राघुजी दिवटे असावे. मौजे वडगाव रासाई, तालुका शिरूर, जिल्हा पुणे येथील कैवल्याश्रमात आनंदस्वामींचे तारुण्यात वास्तव्य राहिले. याच कालखंडात हे तरुण गूढ स्वामी सत्यशोधकमताकडे आकर्षित झाले; पण नेमके सत्यशोधक छत्रछायेखाली ते केव्हा आले हे सांगणे कठीण आहे. दरम्यान, या आश्रमात भंडाऱ्याचा (प्रसादाचे भोजन) कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने होत असे. अशाच एका भोजनाच्या कार्यक्रमात आनंदस्वामींनी सत्यशोधक जलशांच्या खेळाचा कार्यक्रम ठेवला. या खेळाच्या आयोजनाने गुरू हरिस्वामी यांच्याशी वादविवाद होऊन मतभेद वाढले.

पुढे हरिस्वामींच्या निवृत्तीनंतर आनंदस्वामींनी कैवल्य आश्रमास सत्यशोधक चळवळीचा केंद्रबिंदू बनवून टाकले. या आश्रमातील कार्यपद्धती आणि अध्यापन शैलीत आनंदस्वामींनी आमूलाग्र परिवर्तन केले. आश्रमातील शाळेत सर्व जाती- धर्माच्या विद्यार्थ्यांना प्रवेश खुला केला. पुढे आश्रमात इंग्रजी शाळा सुरू केली. पुणेकर सत्यशोधक हरिश्चंद्र नारायण नवलकर या शाळेचे मुख्याध्यापक राहिले. त्यांच्याकडे शाळेचे प्रशासन त्यांनी सोपविले. आश्रमात अद्ययावत ग्रंथालय उभे केले. भगवे वस्त्र परिधान करणाऱ्या आनंदस्वामींचे अंतःकरण मात्र सत्यशोधकमताने पूर्णतः ओथंबलेले होते. आनंदस्वामींच्या कीर्तनाचा बाज सत्यशोधकी असे. सत्यशोधक जलशांचे एक संघटन करून सोलापूर जिल्हयातील जलसामालक सोनूपंत कुलकर्णी यांच्या जलशासह अनेक जलसाकारांना आनंदस्वामींनी आर्थिक मदत केली. १९२० सालात सातारा जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उठाव केला. या उठावाचे नेतृत्व आनंदस्वामींनी केले. त्यांना ‘पारनेरचा वाघ’ म्हणूनही संबोधले गेले.

आयुष्याच्या उत्तरार्धात आनंदस्वामींचे विदर्भात काही वर्षे वास्तव्य राहिले. बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील जांभोरा येथे १९२२ साली त्यांचे आगमन झाले. पुढे १९२३ साली जांभोऱ्याचे यशवंतराव खरात यांनी पुढाकार घेऊन गावकऱ्यांची एक जाहीर सभा आयोजित केली. या ग्रामस्थांच्या सभेला आनंदस्वामींनी मार्गदर्शन केले. यानंतर ग्रामस्थांनी आणि आनंदस्वामींनी जांभोरा येथे ‘ब्रह्मचर्याश्रम’ स्थापन केला. इ. स. १९२३ ला या आश्रमात एक शाळाही सुरू केली.

अमरावती येथे २८ डिसेंबर १९२५ रोजी पुणेकर सत्यशोधक अॅड. केशवराव बागडे यांच्या अध्यक्षतेखाली अ. भा. सत्यशोधक समाजाचे १३ वे अधिवेशन संपन्न झाले. या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष आनंदस्वामी हेच होते. आपल्या स्वागताध्यक्षीय भाषणात आनंदस्वामींनी महात्मा फुले यांचे जीवनकार्य, सत्यशोधक समाजाचे मूलभूत तीन तत्त्वे, सत्यशोधक शाहीर भीमराव महामुनी, पंडित धोंडीराम कुंभार आदी सत्यशोधकांच्या कार्याचा धावता आढावा घेतला. तसेच विदर्भातील धार्मिक गुलामगिरीचा उल्लेख करून या प्रदेशातील सामाजिक गुलामगिरी संपुष्टात आणण्याचे आवाहनही त्यांनी केले. प्रस्तुत आनंदस्वामींचे भाषण ‘रॉयल प्रेस’, पुणे येथून मुद्रित केले असून अधिवेशन चळवळीचा हा एक मूलगामी दस्तऐवज आहे. प्रस्तुत अधिवेशन सफल व्हावे म्हणून आनंदस्वामींनी नोव्हेंबर १९२५ मध्ये मद्रास प्रांताचा दौराही केला होता. यापूर्वी सत्यशोधक समाजाचे नववे अधिवेशन (१९२०) कऱ्हाड येथे ‘दीनमित्र’कार मुकुंदराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भरले होते. या अधिवेशनाला आनंदस्वामींचे मार्गदर्शन लाभले होते.

बुलडाणा जिल्ह्यातील वास्तव्यात आनंदस्वामींनी १९३५-३६ सालात अनेक शेतकरी परिषदा घेतल्या. यानंतर १९३७ साली त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. दरम्यान, त्यांना अटक झाली. पुढे कारावासही झाला. या कारावासातून १० ऑगस्ट १९४६ रोजी त्यांची सुटका झाली. याप्रसंगी नागपूरकरांनी त्यांचा जाहीर सत्कारही केला.

दरम्यान, आनंदस्वामींची रोजनिशीची एक हस्तलिखित डायरीही उपलब्ध आहे. ही डायरी १९२९ सालची असून ‘श्री हनुमान प्रेस’चे मालक लक्ष्मण बाबूराव कोकटे (सदाशिव पेठ, पुणे) यांनी आनंदस्वामींना बहुधा भेट म्हणून दिली असावी. १ जानेवारी १९२९ ते १ मे १९२९ पर्यंतची रोजनिशी आनंदस्वामी यांनी मोठ्या ढोबळ (दुर्बोध) अक्षरांत सोप्या सरळ जनलोकभाषेत लिहिली आहे. त्यामुळे डायरी अवलोकनास जरा कठीण जाते. मात्र या डायरीवरून आनंदस्वामी या चार महिन्यांच्या कालखंडात विदर्भातील दारव्हा, कारंजा, दिग्रस, मंगरूळ दस्तगीर, अमरावती, बडनेरा, मोर्शी, पुसद, सिरसगावबंड,

सत्यशोधकांचे अंतरंग क्रमशः

🔴 ***शिवक्रांती टीव्ही
🌹💐💐💐 दिन बंधू न्यूज चैनल सबस्क्राईब करा लाईक करा बातमी व्हिडिओ शेअर करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा 💐💐💐💐
अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण फोटो व्हिडिओ पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼
संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१ हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा 🙏🏼🙏🏼🙏🏼💐💐💐💐💐🔴🔴🔴 🔴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button