सोशल

♦वटपौर्णिमा मिथकीय उलगडा ♦

♦वटपौर्णिमा मिथकीय उलगडा ♦

वटपौर्णिमा मिथकीय उलगडा :

आज घडीला पावसाळा सुरु झाला की, सर्वाधिक रोपे, बिया स्त्रीया लावतात.कारले,भोपळे, दोडके, कद्दुचे वेल तर हमखास स्त्रीयाच लावतात.लसणाचे वाफे, किंवा भातशेती स्त्रीयाच करतात. नांगरणी , कोळपणी , ही पिक उगवल्यानंतरची कामे पुरुषांना.नांगराचा शोध पुरुषांनी लावला. म्हणून नांगराच्या शोधानंतर ही बाकी कामे पुरुषांच्याकडे गेलीत.बाकी लावणी स्त्रीयांचीच. म्हणूनच तर तमाशात आलेली लावणी ही शेतीच्या लावणीतूनच सांस्कृतिक अंगाने पुढे आलेली आहे. शेतीच्या लावणीची प्रमुख स्त्री आणि तमाशाच्या फडावरच्या लावणीची प्रमुख देखील स्त्रीच असते.शेती करताना गाणे म्हनने , नाचणे यातून लावणीचा विकास झालेला आहे. तमाशातील कलगीतुरा,फड हे शब्द शेती क्षेत्रातून आलेले आहेत.
म्हणून शेतीची अद्यकर्ती स्त्री निऋती होय.स्त्री निसर्गपुजक असल्यामुळे तिच्या अनेक सण उत्सवांत निसर्गाशी एकरूपता असलेले इव्हेंट आहेत.वृक्षपुजा सिंधूसंस्कृतीत असल्याचे निशपन्न झालेच आहे. घटस्थापना हा स्त्रियांचा शेती क्षेत्राशी निगडित असलेला सण आहे.प्रत्येक सणवार उत्सवात स्त्रियां एकमेकिंची धान्याने ओटी भरतात. त्या या कृतीतून शेतीशी नातेही सांगतात आणि नवनिर्मितीचे, नवसृजनाचे वाण त्या एकमेकींना वाटतात. भरल्या घरातून स्त्री जाताना, रिकाम्या हाताने जाऊ नये म्हणून तिची ओटी भरली जाते, आणि त्या ओटी मध्ये तांदूळ, नारळ,खारीक, वाटी, बदाम, सुपारी असते. ह्या नव निर्मितीच्या बिया आहेत. याची रोपे तिने लावावीत असा यामागचा आशय होता.
पुढे पितृसत्ताक ब्राम्हणी राजवटींची सत्ता आल्यावर, पूर्वीपासुन चालत आलेले मातृसत्तेचे सणवार उत्सव त्यांना जाहीर बंद करता आले नाहीत. मग त्यांनी त्या सण-वार उत्सवांचे ब्राह्मणीकरण करण्याचा प्रयत्न केला. खोट्या कथा जोडून त्या सणांचा गाभा बदलण्याचा प्रयत्न झाला. सणांचं स्वरूपच बदलून टाकण्यात आलं. वटपौर्णिमेच्या बाबतीत असंच झालेलं आहे.
वटपौर्णिमा या सणाच्या बाबतीत पुरुषसत्ताक छावणीने डोके वर काढल्यानंतर आणि पोरोहित्य ब्राम्हणी छावणीकडे गेल्यानंतर,स्त्रीच्या निसर्गपुजनाची ही भौतिककृती नवऱ्याच्या मृत्युशी सत्यवान आणि सावित्रीच्या कथेच्या मिथकरुपाने बंदिस्त केली गेली.म्हणजे स्त्रीयांच्या निसर्गपुजनाच्या विधायक लौकिक कृतीचे ब्राम्हणी छावणीने अलौकिकत्वाशी नाते जोडुन, विकृतीकरण केले आहे. यामुळे स्त्री आनखी गुलामगिरीच्या खाइत लोटली गेली. तिला गुलाम बनवण्यासाठी, आपल्या हाताखाली भोगवस्तू बनवण्यासाठी सत्यवाण – सावित्रीची कथा बनवलेली आहे. आगदीच सात जन्मासाठी ती बंदिस्त ठेवण्याचा एवढा क्रृर सुड ब्राम्हणी छावणीने घेतला आहे. सत्यवान सावित्रीची कथा इथे काही सांगत नाही. परंतु या कथेतून स्त्रियांना पितृसत्ताक पुरुष वर्चस्ववादी गुलामगिरीच्या खाईत लोटण्यासाठीच सात जन्म हाच नवरा मिळावा, म्हणून वडाच्या झाडाचे पूजन करावे,या प्रकारचा मीथकीय रिवाज स्त्रियांच्या डोक्यात घालण्यात आलेला आहे. स्त्री ही मूलतः निसर्ग पुजक आहे.नवऱ्यामुळे किंवा नवऱ्यासाठी नव्हे तर स्त्री ही पूर्वपार चालत आलेल्या निसर्गपूजनाच्या कृतीशी नाते सांगण्यासाठी वडाच्या झाडाचे पूजन करते. सर्वांना सावली देनारे आणि वर्षानुवर्षे टिकनारे वडाचे झाड तिने लावने , दरवर्षी ते वाढत जातेय हे पाहुन आनंदाने, उत्साहाने तिने ते पुजने साहजिकच आहे.त्यात पुनर्जन्म घुसवून ब्राम्हणी छावणीने सहजरित्या या स्त्रीयांच्या निसर्गपुजनाच्या कृतीला बळकावले आहे.

वटपौर्णिमा हा सण पेरणीच्या काळातच येतो,पावसाळा लागल्यानंतरच येतो.पावसाळ्याच्या तोंडावर सर्वत्र बिया टोचुन ती धरती सजवण्यासाठी वृक्ष लागवड करत असेल तर नवऱ्याच्या गुलामगिरीला पावित्र्य भासवून तिला बंदिस्त करु पहाणाऱ्या ब्राम्हणी छावणीला उध्वस्त केले पाहिजे.नवऱ्याचा आणि तिच्या वृक्षपुजनाचा काहीही संबंध नाही.आणि पुन्हा तिला तु निसर्गाची, नवसृजणाची, नवनिर्मितीची अद्यकर्ती होतीस ही प्रेरणा दिली पाहिजे.हे आत्मभान दिले पाहिजे. म्हणून वटपोर्णिमा कुण्या सावित्रीचा सण नाही तर तो समस्त स्त्रीजातीच्या वृक्षरोपणाचा सण आहे. सावित्री आणि सत्यवानाची कथा ही नंतर घुसवलेली आहे. नवऱ्याच्या नावाने वड पुजण्याच्या या कृतीला आपण विधायक नकार दिला पाहिजे. त्या दिवशी स्त्रियांनी भरपूर झाडे, रोपे लावावीत. वृक्ष लागवडीचा उत्सव साजरा करावा.
पण हे मिथक वटवृक्षाशीच का बांधले गेले आहे?

दीर्घकाळ टिकणारे झाडे स्त्रिया त्याकाळी लावत असाव्यात. वडाचे झाड हे कृषी मायेचा सण म्हणून त्याकाळी सार्वजनिक रित्या उत्सव म्हणून लावले जात असावे. वडाचे झाड लावण्याचा सण त्याकाळी कोणाला कोण्या गणात साजरा होत असावा. यातून पुढे पितृसत्तेने सर्वाधिक प्रिय असणाऱ्या वडाच्या झाडाचा संबंध सर्वाधिक प्रिय असणाऱ्या नवऱ्याशी बांधून दिला.
सात जन्म एकाच व्यक्तीशी त्याला न विचारता मनानेच बांधील होण्याच्या कृतीला नकार द्यायला आणि विरोध करायला स्त्रियांनीच पुढाकार घेतला पाहिजे.

ह.भ.प.धर्मकीर्ती महाराज परभणीकर
मो : 9970744142

🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴🪴

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button