नमस्कार मित्रांनो 

मी अहिल्यानगर ची लोकसभा निवडणूक लढवत आहे.

नमस्कार मित्रांनो
मी अहिल्यानगर ची लोकसभा निवडणूक लढवत आहे.मला ओबीसी बहुजन पार्टीने पाठींबा दिला आहे.ओबीसी ,एस सी ,एसटी ,एन टी,व्हीजेएनटी, अल्पसंख्याक विस्थापित मराठा मतदार आज माझ्या पाठीशी आहेत.मी फाॅर्म भरताना लोकवर्गणीतून फाॅर्म भरला .माझी ऐपत नाही की कार्यकर्ते यांना गाड्या देयाची की हाॅटेल मध्ये जाऊन शाही जेवणावळी देयाची,कार्यकर्ते यांना मी पैसेही देऊ शकलो नाही.माझा प्रचार वैयक्तिक भेटीगाठी आणि सोशियल मिडीयावर जास्त चाललाय मला शेवगाव, पाथर्डी, जामखेड, कर्जत, श्रीगोंदा, पारनेर,राहुरी ,नगर मधील ओबीसी समाज माझ्या बरोबर नक्की राहील याची खात्री मला आहे.
ओबीसी ह्रदय सम्राट मा.उपमुख्यमंत्री तथा अन्न नागरी पुरवठा मंत्री ना.छगनरावजी भुजबळ साहेबांचा कट्टर कार्यकर्ता तसेच ओबीसी बहुजन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.आ.प्रकाश आण्णा शेंडगे,टी.पी.मुंढे सर ,तांडेल सर ,बावकर साहेब ,गोरे सर ,सुधाकरजी आव्हाड साहेब यांच्या सहकार्याने मार्गदर्शानाने ही निवडणूक लढवत आहे .काही नसतानाही ओबीसी मतदार जागृत झाला आहे.काही झाले तरी ओबीसी मते ही ओबीसी बहुजन पार्टीच्या उमेदवारालाच देण्याचे नक्की केले आहे त्यामुळे विरोधकाची मानसिकता ढासळत आहे.नवनविन क्लृप्त्या करत आहे परंतु माझी भुमिका काल ही ठाम होती आणि आजही ठाम आहे उद्याही ठाम राहिल ओबीसी बांधवांनी ओबीसी उमेदवारालाच मतदान करायाचे आपली ओबीसीची ताकद वाढवायाची असेल तर ओबीसी बहुजन पार्टीला मतदान करावे लागेल .
भाजप ला मतदान केले तर ते भाजपची वोट बँक म्हणून गणले जाईल.
राष्ट्रवादीला मतदान केले तर राष्ट्रवादीची वाट बँक म्हणून गणली जाईल.
मी वंचितला मतदान केले तर वंचित ची वोटबॅक म्हणून गणली जाईल यात ओबीसी मते कुठे आहे? त्यामुळे कोणाचं खायचं?कोणाचे पैसे घ्यायचे पण मत मात्र ओबीसी बहुजन पार्टीलाच करायचे ! आज नाही तर पुन्हा कधीच नाही . राग माझ्याबद्दल असेल तर मी आपली जाहीर माफी मागतो .ओबीसी समाजासाठी ओबीसीच्या हक्कासाठी ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसी मधून बोगस कुणबी दाखले काढण्यासाठी ओबीसींचा राजकीय प्रवासाची नविन सुरुवात करण्यासाठी मी मतदान करत आहे माझ्या हक्काच्या माणसाला मी मतदान करणार आहे गोरख आळेकर यांना का तर माझ्या शेतीचा सर्वांगीण विकासासाठी माझ्या शेतमालाला हमीभाव मिळवून देण्यासाठी माझ्या शेतीला पाण्याची सोय करण्यासाठी माझ्या शेतीसाठी सोलर पंप मिळवण्यासाठी माझ्या म्हातारपणाच्या आधारासाठी
माझ्या तरुणांना रोजगार मिळवून देऊन रखडलेली मुलांची लग्न होण्यासाठी..
गोरख आळेकर यांना मतदान करणार आहे कुणी कितीही सांगितले तरीही मी ओबीसी हे कधीच विसरू शकत नाही की छगनरावजी भुजबळ साहेबांचे योगदान आणि प्रकाश आण्णा शेंडगे साहेबांचे ओबीसी साठीच योगदान .त्यामुळे मी कोणत्याच भुलथापांना बळी न पडता यावेळी फक्त आणि फक्त गोरख आळेकर यांना मतदान करणार अनुक्रमांक नंबर 15 गोरख दशरथ आळेकर चिन्ह तुतारी पुढील बटन दाबून गोरख आळेकर यांना माझे मतदान देणार आणि ओबीसी मतदार जागृत आहे तो ओबीसी विरोधात विधानसभेसमोर घोषणा देणाऱ्याला आणि भूजबळ साहेबांचा राजीनामा मागणाऱ्याला व मा.आ.प्रकाश आण्णा शेंडगे यांच्या गाडीवर शाई फेकणार्या अवलादीला मत देणार नाही याची खात्री आहे मला .
एकच पर्व ओबीसी सर्व
अनुक्रमणिका नंबर १५ गोरख दशरथ आळेकर
चिन्ह तुतारी

