11 मे महात्मा सन्मान दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सत्यशोधक शंकरराव लिंगे

11 मे महात्मा सन्मान दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सत्यशोधक शंकरराव लिंगे
११ मे १८८८ रोजी मुंबईतील भायखळ्याजवळच्या मांडवी कोळीवाडा येथे आग्री, भंडारी, कोळी कामगार बांधव हजारोंनी एकत्र जमले आणि त्यांनी समाजक्रांतिकारक जोतीराव फुल्यांना “महात्मा” ही पदवी दिली.
भारतीय कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे यांना पहिली कामगार संघटना बांधायला जोतीरावांचेच प्रोत्साहन होते. टिळक-आगरकरांना पहिल्या तुरुंगवासात त्याकाळात (१८८२) दहा हजार रूपयांचा जामीन द्यायला आणि सुटकेनंतर त्यांथा मानपत्र देवून सत्कार करण्यातही तेच पुढे होते.
मराठी ग्रंथ छापण्याची सोय १८०६ साली सुरू झाली. १८६९ साली जोतीरावांनी मराठीतले पहिले शिवचरित्र लिहिले. १८८० साली त्यांनी देशात पहिल्यांदा शिवजयंती उत्सव सुरू केला. रायगडवरील शिवसमाधीची डागडुजी केली आणि शिवरायांना महानायक म्हणुन लोकमाणसात प्रस्थापित केले. पुण्यात हिराबागेत आणि मुंबईला लालबाग-परळ भागात करण्यात आलेल्या शिवजयंती कार्यक्रमांच्या नोंदी उपलब्ध आहेत. फुले चरित्रकार पंढरीनाथ सीताराम पाटील, माधवराव बागल, धनंजय कीर यांनी त्याबाबतचे अनेक पुरावे दिलेले आहेत.
सामाजिक न्यायासाठी त्यांनी शुद्र-अतिशुद्रांना आरक्षण देण्याची मागणी केली. आजचे सगळे राजकारण विकास आणि सामाजिक न्याय याच सुत्रांच्या भोवती फिरते आहे. जोतीरावांचे राजकारण समजून घेण्यासाठी “सत्तेवाचून सकळ कळा झाल्या अवकळा हे जोतीसुत्र” समजून घेतले पाहिजे.
आजवर उल्लेख
त्यांचा विरोध शोषणकर्त्या नेतृत्वाला होता. त्यावेळी हे नेतृत्व ब्राह्मणांकडे होते. हा समाज त्यावेळी सामाजिक सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक सत्तेच्या सगळ्या किल्ल्या स्वतःच्या कंबरेला बाळगून होता.
जोतीराव पर्यायी संस्कृतीचे जनक होते. आज समग्र सत्ता परिवर्तन झालेले आहे. आता सगळी सुत्रे बहुजनांकडे आलेली आहेत. आज जोतीराव असते तर त्यांनी आसुडाचे फटके कोणाला मारले असते? अर्थातच बहुजन नेतृत्वाला.
“ख्रिस्त महंमद मांग ब्राह्मणाशी धरावे पोटाशी बंधूपरी !” असे पोटतिडकीने सांगणाऱ्या जोतीरावांच्या नावाचा वापर आज जातीविद्वेष पसरवण्यासाठी केला जावा ही शोकांतिका आहे. आजही राजकीय-सांस्कृतिक सत्ता सर्व बहुजनांपर्यंत झिरपलेली नाही. भटकेविमुक्त, दलित-आदिवासी, ओबीसी, महिला यांची परवड चालूच आहे.
वर्ग, जाती, धर्म व लिंगभावाच्या आधारे केले जाणारे शोषण आणि पक्षपात यांच्यावर पांघरूण घालण्यासाठी तसेच नेतृत्त्वाचे अपयश लपवण्यासाठी आज जातीविद्वेषाच्या वणव्याचा सर्रास आधार घेतला जातो आहे.
महात्मा जोतिबा फुले
महात्मा फुले व साहित्यसंपदा
तृतीयत्न (नाटक)
→185
छ. शिवाजीराजे यांवरील (पोवाडा) → 1869 ड्राम्हणांचे कसब (एक ग्रंथ) 1885
गुलामगिरी 1873 अमेरिकेतील गुलामगिरीतून सुटका करणाऱ्या निग्रो जनतेस समर्पित केला आहे
शेतकऱ्यांचा आसूड (ग्रंथ) 1883
(नियतकालिक)
1885
इशारा (ग्रंथ)
1885
सार्वजनिक सात्यधर्म (गाग्रंथ) → 1891
महत्त्वाचे महात्मा फुले यांना
अनेक उपाधी किताब देऊन अनेकानी गौरविण्यात आले आहे
1) पं. रमाबाई यांना धर्मान्तरापासून रोखणारे – म. फुले २) उक्ती व कृती यामध्ये एकवाक्यत। साधणारे- सत्यशोधक म. फुले
3) भारतीय समाजक्रांतीचे जनक – म. फुले.
4) इंडियन बुकर टी वॉशिंटन” हा किताब बरोड्याचे राजे सयाजीराव गायकवाड यांनी महात्मा फुले यांच्या 61 निमित्त 11 मे 1888 ला पत्र पाठवून दिला होता
5) महाराष्ट्राचे मार्टिन ल्यूथर किंग’ महात्मा फुले
6) खऱ्या लोकशिक्षणाचा शिल्यकार महात्मा फुले
* शूद्र कोण होते ? हा ग्रंथ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी म.फुलेंना समर्पित केला, व त्यांना गुरु मानले
महात्मा गांधी 1932 ला येरवडा जेलमध्ये होते त्यावेळेला पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महात्मा गांधी म्हणाले सच्चा महात्मा व महात्मा है जो महात्मा ज्योतिराव फुले होय
* रावबहादुर विठ्ठलराव कृष्णाजी वडेकर यांनी मुंबईच्या जनतेच्या वतीने ‘महात्मा’ ही पदवी उपाधी किताब पुरस्कार 61 निमित्त देण्यात आली
महात्मा फुले साहित्य ग्रंथ आणि चळवळ” या पुस्तकाची अल्पावधीतच आठवी आवृत्ती काढावी लागत आहे याचा आनंद वाटतो.
राज्य शासनाने महात्मा जोतीराव फुले यांच्या स्मृतीशताब्दी वर्षात १९९० साली महात्मा जोतीराव फुले चरित्र साधने प्रकाशन समितीची स्थापना केली. समितीने आजवर खालील ग्रंथ प्रकाशित केलेले आहेत.
(१) महात्मा फुले : समग्र वाङ्मय, (२) सावित्रीबाई फुले : समग्र वाङ्मय, (३) महात्मा फुले गौरव ग्रंथ, (४) आम्ही पाहिलेले महात्मा फुले, (५) महात्मा फुले : शोधाच्या नव्या वाटा, (६) सावित्रीबाई फुले गौरवग्रंथ, (७) महात्मा फुले : साहित्य और विचार, (८) महात्मा फुले साहित्य आणि चळवळ, (९) युगपुरुष महात्मा फुले, (१०) महात्मा फुले समस्त साहित्य, खंड १ (११) महात्मा फुले समस्त साहित्य, खंड २, (१२) महात्मा फुले : समस्त साहित्य, खंड ३, (१३) महात्मा फुले समस्त साहित्य, खंड ४, (१४) कलेक्टेड वर्क्स ऑफ महात्मा फुले, व्हॉल्युम १ (१५) कलेक्टेड वर्क्स ऑफ महात्मा फुले, व्हॉल्युम २, (१६) कलेक्टेड वर्क्स ऑफ महात्मा फुले, व्हॉल्युम ३.
या सर्व पुस्तकांच्या असंख्य आवृत्त्या काढाव्या लागलेल्या आहेत.
याशिवाय पुढील ६ ग्रंथ प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.
सत्यशोधक चरित्र कोष, सत्यशोधक चळवळ आणि त्यांची लोकप्रबोधनाची साधने, खंड १ ग्रंथ ३, महात्मा फुले समस्त साहित्य, खंड ५; कलेक्टेड वर्क्स ऑफ महात्मा फुले, व्हॉल्युम ४.
याशिवाय संपादनाची प्रक्रिया चालू असलेले अनेक ग्रंथ आहेत.शिवक्रांती टीव्ही न्यूज
ज्याची कोणी दखल घेत नाही अशा, अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी, आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुनिजन गुणवंत यांची यशोगाथा, समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रौप्य महोत्सव, सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव, उद्योगधंदयांचे उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसेच जाहिराती. न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे
७३८७ ३७७८ ०१


