शंकरराव लिंगे यांची मुलगी डॉक्टर जयश्री प्रशांत गवळी यांचे साईकृपा हॉस्पिटल अकरावा वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा

शंकरराव लिंगे यांची मुलगी डॉक्टर जयश्री प्रशांत गवळी यांचे साईकृपा हॉस्पिटल अकरावा वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देऊन शंकरराव लिंगे यांनी घेतलेली मुलाखत गुरुवार दिनांक 11 एप्रिल 2024 रोजी श्री साईकृपा हॉस्पिटल व डायग्नोस्टिक सेंटर पेनुर यांच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर, हृदयविकार व मेंदू विकार शिबिर आयोजित करण्यात आले होते
रक्तदान शिबिराचे उद्घाटन डॉक्टर सचिन भोसले पाटील रेडिओलॉजिस्ट मोहोळ यांनी केले
11 एप्रिल महात्मा फुले जयंती असल्यामुळे महात्मा फुले यांची पूजन डॉक्टर विशाल फडे चेस्ट फिजिशियन पंढरपूर यांनी केले
धन्वंतरी पूजन डॉक्टर सुनील पवार हृदयरोग तज्ञ पंढरपूर यांनी केले राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष सत्यशोधक शंकरराव लिंगे
या बापूसाहेब भंडारे अखिल भारतीय समता परिषद सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष यांच्यासह पेनुर पंचक्रोशीतील सर्व मान्यवर मंडळी नातेवाईक मंडळी गरजू रुग्ण शेकडो लोकांनी दिवसभर भेट देऊन सोविसुविधाचा लाभ घेतला आणि शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या वेळी गावातील सरपंच उपसरपंच सर्व नेते मंडळी उद्योजक बागायतदार व डॉक्टरांची उपस्थित होते
श्री साईकृपा हॉस्पिटल व डायग्नोस्टिक सेंटर यांच्या अकराव्या वर्धापनदिनी डॉक्टर सुनील पवार सर यांनी हृदय विकारांवरील शिबिरात रुग्णांची तपासणी करून यांच्यावर उपचार व सल्ला दिला
तसेच सुप्रसिद्ध मेंदू विकार तज्ञ डॉक्टर शुभदा खंदारे मॅडमनी मेंदू विकारावरील शिबिरात रुग्णांची तपासणी व उपचार केला
रक्तदान शिबिरामध्ये 27 रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य केले त्यामध्ये धनाजी भीमराव कारंडे महेश चौरे कैलास चौरे सैफन शेख सर डॉ.गणेश नामदेव डॉ. सचिन व्यवहारे सौ. स्नेहल राहुल चव्हाण डॉ.सौ जयश्री प्रशांत गवळी आदी 27 जणांनी रक्तदान केले
दिनांक 11/04/2024 रोजी श्री साईकृपा हॉस्पिटल व डायग्नोस्टिक सेंटर यांच्या अकराव्या वर्धापन दिनानिमित्त
1) भव्य रक्तदान शिबिर वेळ सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत
2) डॉ. शुभदा खंदारे (मेंदू विकार तज्ञ) यांचे मेंदू विकार, चक्कर, डोकेदुखी, फिट, लहान बाळाच्या तापामध्ये येणारे झटके, जन्मजात मतिमंद पणा व अर्धांगवायू विषयी तपासणी व उपचार शिबिर वेळ सकाळी 9 ते दुपारी 12
3) डॉ. सुनील पवार (हृदयरोग तज्ञ) यांचे हृदयविकार तपासणी उपचार व शिबिर वेळ सकाळी 9 ते दुपारी 12
4) रक्तातील साखर व हिमोग्लोबिन तपासणी शिबिर वेळ सकाळी 9 ते दुपारी 12
5) एप्रिल व मे महिन्यात सवलतीच्या दरामध्ये कुटुंब नियोजन एक टाका व तीन टाके ऑपरेशन कॅम्प नाव नोंदणीसाठी खालील नंबर वर संपर्क करावा वेळ सकाळी 9 ते दुपारी 12
स्थळ:- श्री साईकृपा हॉस्पिटल मोहोळ-पंढरपूर, रोड पेनुर विविध उपक्रम आहेत
संपर्क क्रमांक :-9172109502,9860549502
अकराव्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रमाचे सोयी सुविधा आयोजन केले याचा आनंद डॉक्टर प्रशांत केराप्पा गवळी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता
HOSPITAL SAIKRUPA SHRI
शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक लिंगे 73 87 3770 हा नंबर आपल्या ग्रुप मध्ये ऍड करा बातमी व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल दाबा

