महाराष्ट्रसोशल

अग्रलेख | संत शिरोमणी सावता महाराज तीर्थक्षेत्र अरण – विकासाचा प्रश्न चंदनोटी सोहळा

🌹 जय सावता! 🌹

अग्रलेख | संत शिरोमणी सावता महाराज तीर्थक्षेत्र अरण – विकासाचा प्रश्न चंदनोटी सोहळा

संत परंपरेचा तेजस्वी वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात संत शिरोमणी सावता महाराज यांचे अरण येथील पावन तीर्थक्षेत्र आजही मूलभूत विकासापासून वंचित राहणे ही केवळ खेदजनक नव्हे, तर शासनाच्या निष्क्रियतेची जाहीर कबुली आहे.

सुमारे ७३० वर्षांची परंपरा, अखंड चालणारा समाधी सोहळा, लाखो भक्तांची श्रद्धा आणि “कांदा मुळा भाजी…” या अभंगातून प्रकट झालेली भक्ती—इतका मोठा आध्यात्मिक वारसा असतानाही अरण तीर्थक्षेत्राला आजपर्यंत अपेक्षित दर्जा व विकास का मिळाला नाही? हा प्रश्न प्रत्येक सावताभक्ताच्या मनात धगधगत आहे.

👉 चंदन उटी परंपरा ही केवळ धार्मिक विधी नाही, तर ती भक्ती, समर्पण आणि संतांविषयीची आस्था यांचा जिवंत पुरावा आहे. पूरस्थितीतही भक्तांनी परंपरा जपली, पण शासन मात्र वर्षानुवर्षे आश्वासनांवरच थांबले!

👉 १९९८ पासून सातत्याने निवेदने, आंदोलन, उपोषणे करूनही ‘अ’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा अद्याप पूर्णत्वास का गेला नाही?
👉 जाहीर झालेला १२७ कोटींचा विकास आराखडा अजून कागदावरच का?
👉 भूमी अधिग्रहणाच्या नावाखाली समाजकार्यासाठी दिलेल्या जमिनीवरच गदा का?

ही केवळ दुर्लक्षाची बाब नाही—ही संत परंपरेचा अपमान आहे!

🔥 आता सावताभक्त गप्प बसणार नाहीत!
शासनाने त्वरित:
✔ अरण तीर्थक्षेत्राचा ‘अ’ वर्ग दर्जा प्रमाणे विकास करा वनौषधी संशोधन केंद्र जाहीर करा निर्माण करा

✔ प्रलंबित विकासकामे तात्काळ सुरू करावीत
✔ स्थानिक ‘ – – ‘ जमीनधारक व समाजप्रतिनिधींना शासकीय समितीत स्थान द्यावे

अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन उभारले जाईल, याची शासनाने नोंद घ्यावी!

🙏 चंदन उटी उत्सव हा भक्तीचा नव्हे, तर आता जागृतीचा आणि हक्कासाठी लढ्याचा उत्सव ठरणार आहे.

📢 सोशल मीडिया संदेश
संत सावता महाराजांच्या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी आवाज उठा!
ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करा आणि शासनाला जागे करा!

📱 आपला सहभाग महत्त्वाचा!
👉 दिनबंधू न्यूज | शिवक्रांती टीव्ही
👉 संपादक: सत्यशोधक शंकरराव लिंगे
📞 73 87 37 78 01
➡️ आमच्या WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा
👍 लाईक करा | 🔁 शेअर करा | ▶️ सबस्क्राईब करा
💬 कॉमेंट करा | 🔔 बेल आयकॉन दाबायला विसरू नका!

#जयसावता #SavataMaharaj #अरणतीर्थक्षेत्र
#संतपरंपरा #महाराष्ट्र #भक्तीआंदोलन
#विकासहक्क #OBCआवाज #जयज्योतीजयक्रांती
#जयभीम #जयभारत #जयसंविधान

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button