सोलापूर

🔥 मानवमुक्तीच्या महासंग्रामातील ज्वालामुखी हाक — लढा थांबणार नाही! 🔥

🔥 मानवमुक्तीच्या महासंग्रामातील ज्वालामुखी हाक — लढा थांबणार नाही! 🔥

ही केवळ कविता नाही…
हा एका लढवय्या बापाचा इतिहास आहे.
हा अन्यायाविरुद्ध पेटलेल्या विचारांचा जाहीरनामा आहे.
ही प्रत्येक संवेदनशील माणसाला अंतर्मुख करणारी ठिणगी आहे.

खालील लेखन जसंच्या तसं सादर करत आहोत — एकही शब्द न कमी करता, कारण प्रत्येक वाक्य हा संघर्षाचा श्वास आहे.

माझ्या बापाची अंत्ययात्रा…
तू माझ्या बापाच्या अंत्ययात्रेत होतास?
काय….
वेळ नव्हता म्हणतोस!
हो असेलही खरं ..
नाहीतरी कुठे असतो वेळ तुला
अशा ‘किरकोळ’ घटनांकडे लक्ष द्यायला !
माझा बाप जेव्हा
मोलकरणींसाठी रस्त्यावर उतरायचा
तेव्हाही तू असायचास
तुझ्या महत्वाच्या कामात ‘बिझी’
मोलकरणींचं काय घेऊन बसायचं
त्यांना दोन वेळचं खायला मिळतंच की!
माझा बाप जेव्हा
फेरीवाल्यांच्या खांद्याला खांदा लावून
उभा रहायचा मैदानात
तेव्हाही तुझं चालू असायचं
काहीतरी महत्वाचं काम
फेरीवाले काय
रहदारीतली अडचणच की!
माझा बाप जेव्हा
कामगारांचा आवाज बनून
भांडवलशाहीवर हल्ला बोलायचा
तेव्हाही तुझ्या डोळ्यात
असायची स्वप्नं ‘विकासाची’
कामगारांचं काय
यंत्रंच की नुसती विकासातली!
माझा बाप जेव्हा
शेतमालाच्या भावासाठी
बाजारात घुसायचा
तेव्हाही तुझं चाललं होतं
जीवन मरणाचं काहीतरी
शेतकरी काय
अडाणी, खेडवळ, बेअक्कल कुठले?
माझा बाप जेव्हा
विज्ञानाचा जागर करायचा
दैव सोडून प्रयत्न घ्या म्हणायचा
तेव्हाही तू टिकटिक करत असायचास काहीतरी
टेबलवरच्या लॅपटॉपवर
विज्ञानाचं काय, व्यर्थ धडपड सारी!
माझा बाप जेव्हा
कुळवाड्यांचा राजा
आणि
धर्मनिरपेक्ष राज्यकर्ता म्हणून
खरा शिवाजी सांगायचा
तेव्हाही तू चघळत असायचास
प्रत्येक दहशतवादी मुसलमान असल्याचे किस्से
धर्मनिरपेक्षता आणि कल्याणकारी राज्य काय
बोलण्यातले शब्द नुसते!
माझा बाप जेव्हा
टोलविरोधाचा आवाज बनून
रणशिंग फुंकायचा
तेव्हाही तुझी सुसाट कार
टोल देऊनच धावायची
जगण्याची गती कमी होऊ नये म्हणून
टोलविरोधाचं काय
बाष्कळ बडबड नुसती!
अरे दोस्ता….
दोस्त तरी कसा म्हणू तुला?
तुला माझ्या जीवंत असण्याची
गरजच जाणवली नाही कधी!
अरे माणसा ….
माणूस तरी कसा म्हणू तुला
तुला माझं माणूस असणंही
कधी समजलं नाही!
अरे मुर्दाड माणसा ….
हो, मुर्दाडच तू….
माणूसकीच्या लढाईकडं दुर्लक्ष करून
ऐशआरामी जगणारा,
संघर्षाला घाबरून
आपल्यात कोषात रमणारा,
संघर्षाची वाट चालणाऱ्यांचा
पदोपदी अवमान करणारा,
मुर्दाडच तू!
तुझ्याकडून कशी धरावी अपेक्षा
माझ्या लढवय्या बापाच्या अंत्ययात्रेत
सहभागी होण्याची?
पण
बरं झालं….आला नाहीस
माणूसकीचं आणि तुझं
थोडं तरी नातं आहे
हे जाणवू दिलं नाहीस,
अन्यायाच्या विरोधात
एकदाही मूठ वळवली नाहीस,
तुझ्याबद्दल माझं मत
खोटं तू ठरवलं नाहीस.
आणखी एक लक्षात ठेव
तुझ्या या ‘कोषात जगण्याचं’
मलाच काय
कुणालाच नाही कौतुक
माझे मात्र साथी असंख्य
चार्वाकापासून…. बुद्धापर्यंत,
तुकोबापासून….गाडगेबाबापर्यंत,
जोतीबापासून….दाभोलकर, पानसरेंपर्यंत
आता म्हणशील,
‘त्यांचं काय घेऊन बसलास?
त्यांचं काय जगणं होतं?
गाडी नाही, माडी नाही
क्षणाक्षणाला झुरणं होतं
एवढ्या ‘सुंदर’ जगात
साधेपणाचं कुढणं होतं ‘
आणि मला हिणवशील
पुढं म्हणत,
‘छान सुंदर बायको’
दोन गोंडस बाळं
बायकोला महागडी साडी
पोरांना चारचाकी गाडी
आठवडाभर कामाचं
‘थोडंसं’ टेन्शन
आणि मग शेवटी
छान ‘विकेंड’
कधी शिर्डी, कधी तिरुपती
कधी महाबळेश्वर, कधी कुलू मनाली
काय छान जीवन असतं!’
एवढंच बोलून थांबणार नाहीस
कदाचित
मनातल्या मनात हेही म्हणशील,
‘आणि तुझं काय?
आज कामगार, उद्या शेतकरी
आज परित्यक्त्या, उद्या मोलकरणी
आज अंधश्रद्धा, उद्या जातीपाती
आज कलेक्टर कचेरीसमोर,
उद्या मंत्रालयासमोर
सगळीकडे हेलपाटे….
नुसती फरपट….
शी! हे काय जगणं आहे? ‘
पण
याद असू दे तुला….
मी लढलो म्हणूनच
धर्माच्या बंधनातून तू मुक्त झालास
मी लढलो म्हणूनच
जातीचे पीळ तुझ्या सैल झाले
मी लढलो म्हणूनच
तुझी आई, बहीण माणूस झाली
मी लढलो म्हणूनच
चहावालं पोर देशाचा प्रधान झालं
आणि म्हणूनच …
मी लढणार आहे….
राबणाऱ्या हातांसाठी
मी लढणार आहे…..
कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी
मी लढणार आहे…..
स्त्रीजातीच्या मुक्तीसाठी
मी लढणार आहे…..
विज्ञानवादाच्या आग्रहासाठी
मी लढणार आहे….
माझ्या बापाच्या विचारांसाठी
तू खुशाल बस
माझ्या वैचारिक बापांच्या अंत्ययात्रा
टी. व्ही. वर बघत,
मी उतरणार आहे
त्या प्रत्येक अंत्ययात्रेत,
नवे बाप जन्माला घालण्यासाठी
हो, त्या भेकड हल्लेखोरांच्या भ्याड पाठीराख्यांना
ठोस उत्तर देणारे
वैचारिक बाप जन्माला घालण्याच्या जिद्दीने
मी उतरेन प्रत्येक अंत्ययात्रेत!
ओळख सांगतो जाता जाता
मी आहे
मानवमुक्तीच्या महासंग्रामातील
छोटासा कार्यकर्ता !!!
कृष्णात स्वाती – 8600230660

संकलन – प्रशांत आंबी – 8421229935

✊ सोशल मीडिया संदेश

ही फक्त पोस्ट नाही — ही विचारांची मशाल आहे.
जर तुम्हाला अन्यायाविरुद्ध उभं राहायचं असेल,
जर तुम्हाला विज्ञान, समता, स्त्रीमुक्ती आणि मानवतेचा मार्ग स्वीकारायचा असेल,
तर ही पोस्ट प्रत्येक संवेदनशील माणसापर्यंत पोहोचवा.

📢 दिनबंधू न्यूज सेवक
📢 क्रांती टीव्ही
📢 संपादक सत्यशोधक शंकररावलिंगे

📲 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये त्वरित जोडा.

👍 लाईक करा
🔁 शेअर करा
📩 फॉरवर्ड करा
💬 कॉमेंट करा
🔔 सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका!

🔥 विचार जिवंत ठेवा…
🔥 संघर्ष जिवंत ठेवा…
🔥 मानवमुक्तीचा लढा जिवंत ठेवा…

#मानवमुक्ती
#वैचारिकलढा
#सत्यशोधक
#समाजपरिवर्तन
#विज्ञानवाद
#कामगारहक्क
#शेतकरीआवाज
#स्त्रीमुक्ती
#दिनबंधून्यूज
#क्रांतीटीव्ही

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button