सोशल

🔥🔥 बाळासाहेब ठाकरे जयंती विशेष | ओबीसीवरचा अन्याय, भुजबळांची अग्निपरीक्षा आणि अखेर सत्याचा विजय 🔥🔥

🔥🔥 बाळासाहेब ठाकरे जयंती विशेष | ओबीसीवरचा अन्याय, भुजबळांची अग्निपरीक्षा आणि अखेर सत्याचा विजय 🔥🔥

आज दिनांक २३ जानेवारी. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस. याच ऐतिहासिक दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणात एक महत्त्वाचा अध्याय पुन्हा अधोरेखित झाला—तो म्हणजे ओबीसींचे खंदे नेते, बाळासाहेबांच्या नेतृत्वात घडलेले, शाखाध्यक्षापासून मुंबईचे नगरसेवक, विरोधी पक्षनेते, दोन वेळा महापौर, सात वेळा आमदार, उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, बांधकाम व महसूल मंत्री अशी प्रदीर्घ कारकीर्द गाजवलेले छगनरावजी भुजबळ साहेब यांच्यावर झालेला अन्याय आणि त्या अन्यायावर मिळालेला न्यायाचा शिक्का.

२०१६ साली महाराष्ट्र सदन (महाराष्ट्रधन) घोटाळ्याच्या नावाखाली अँटी करप्शन आणि ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणांनी छगन भुजबळ साहेब, त्यांचे पुत्र आमदार पंकज भुजबळ, पुतणे खासदार समीर भुजबळ आणि डॉ. शेफाली भुजबळ यांना लक्ष्य केले. आरोप झाले, अटक झाली, आणि जवळजवळ दोन वर्षे भुजबळ साहेबांना तुरुंगात खितपत पडावे लागले. आजारपण, उपचारांची वानवा, मानसिक छळ—हे सगळे एका लोकनेत्याच्या वाट्याला आले. पण प्रश्न आजही उभा आहे—इतक्या मोठ्या तपासानंतर, इतक्या वर्षांच्या खटाटोपानंतर, या एजन्सींच्या हाती नेमके काय लागले? काहीच नाही! एकही आरोप सिद्ध झाला नाही!

भुजबळ साहेबांवर झालेला हा हल्ला वैयक्तिक नव्हता; तो ओबीसी समाजावरचा राजकीय हल्ला होता. ओबीसींच्या हक्कासाठी, आरक्षणासाठी, सामाजिक न्यायासाठी उभा राहणारा नेता संपवण्याचा हा प्रयत्न होता. आधी राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारण, नंतर भाजपसत्तेतील केंद्रीय यंत्रणांचा वापर—हा सगळा डाव ओबीसींना कमजोर करण्यासाठीच रचला गेला. काही काळासाठी हा डाव यशस्वी वाटला, पण इतिहास साक्षी आहे—सत्याला कितीही छळलं तरी ते मिटत नाही.

आज कोर्टाने महाराष्ट्र सदन प्रकरणात एसीबीनंतर ईडीच्या केसमधूनही छगनरावजी भुजबळ साहेबांना निर्दोष मुक्त केले. कोर्टाने स्पष्टपणे दाखवून दिले की आरोप निराधार होते. म्हणजेच दोन वर्षांचा तुरुंगवास, अपमान, आजारपण, कुटुंबाची फरफट—हे सगळं एका निर्दोष नेत्याला मुद्दाम भोगायला लावलं गेलं. मग प्रश्न असा उरतो की, ज्यांनी हे खोटे आरोप केले, ज्यांनी तपासाच्या नावाखाली सूडबुद्धीने कारवाई केली, त्यांच्यावर कारवाई कधी होणार? आज सामान्य जनतेच्या मनात ही भावना तीव्र झाली आहे की “जशी वागणूक भुजबळ साहेबांना दिली, तशीच वागणूक खोटे आरोप करणाऱ्यांना मिळायला हवी.”

छगन भुजबळ साहेब हे आज सोन्यासारखे कापून, सलाखांमधून जाऊन बाहेर पडलेले शुद्ध सोनं आहेत. त्यांच्या यातना दुःखद होत्या, पण त्या यातनांनी त्यांची ताकद कमी झाली नाही. कारण ते फक्त एक नेता नाहीत; ते ओबीसींचे दैवत आहेत. ओबीसी समाजाच्या अस्मितेवर झालेला हा आघात आज न्यायालयीन निकालामुळे फसला आहे. याचे दूरगामी परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होणार आहेत—केंद्रीय यंत्रणांचा राजकीय वापर, निवडक नेत्यांवर कारवाई आणि सामाजिक घटकांना लक्ष्य करण्याची पद्धत आता उघडी पडली आहे. ओबीसी समाज अधिक सजग होईल, अधिक एकवटेल आणि अन्यायाविरुद्ध अधिक आक्रमकपणे उभा राहील, हे निश्चित.

आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी भुजबळ साहेबांची निर्दोष मुक्तता झाली, हे काही योगायोग नाही. कदाचित इतिहासानेच ठरवले होते—“तो क्या होता है वही होता है जो मंजुर-ए-खुदा होता है.” बाळासाहेबांनाही आज कुठेतरी समाधान मिळाले असेल की त्यांचा एक सहकारी दोषी नसताना छळला गेला, पण अखेर सत्य जिंकलं.

“ज्यांचे बळ या भूमीवर कधीच कमी पडणार नाही ते भुजबळ!” या ताकदीला हलवणारे बहुतेक आले आणि गेले, पण कधीही न डगमगले ते आमचे छगनरावजी भुजबळ साहेब! 💪👑

दिनबंधू न्यूज | सेवक्रांती
संपादक : सत्यशोधक शंकराव लिंगे
📞 ७३८७३७ ७८०१ (आपल्या व्हॉट्सॲपमध्ये नंबर जोडा)

👉 बातमी लाईक करा 👍
👉 शेअर करा 🔄
👉 सबस्क्राईब करा ▶️
👉 फॉरवर्ड करा 📲
👉 कमेंट करा 💬
👉 बेल आयकॉन दाबा 🔔

#सत्य_परेशान_हो_सकता_है_पराजित_नहीं
#ChhaganBhujbal
#OBCJustice
#महाराष्ट्रसदनघोटाळा
#ED_ACB_Failed
#सामाजिक_न्याय
#दिनबंधू_न्यूज
#ओबीसीचा_आवाज

HTML img Tag Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button