टॉप न्यूजमहाराष्ट्रसोशल

ठाणे जिल्ह्यातील सोनाळे (ता. भिवंडी) येथे आयोजित आगरी महोत्सव-२०२५ या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

  1. ठाणे जिल्ह्यातील सोनाळे (ता. भिवंडी) येथे आयोजित आगरी महोत्सव-२०२५ या कार्यक्रमाला उपस्थिती लावली.

भिवंडी तालुक्यातील स्थानिक भूमिपुत्र समाज असलेल्या आगरी समाजाच्या या महोत्सवात सहभागी होऊन आनंद वाटला. आगरी बंधू-भगिनींनी अतिशय आपुलकीने माझे स्वागत केले, तसेच गाय-वासराची सुरेख मूर्ती देखील भेट दिली. याप्रसंगी आगरी पारंपरिक पद्धतीने स्थानिक देवतेला नारळ फोडून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या सर्व आगरी बंधू-भगिनींशी संवाद साधत सर्वांना महोत्सवासाठी शुभेच्छा दिल्या.

या महोत्सवाचे प्रमुख आयोजक व संस्थापक श्री. विशु भाऊ म्हात्रे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या महोत्सवाचे अतिशय उत्तम आयोजन केलेले आहे. गेल्या १२ वर्षांपासून आयोजित करण्यात येणाऱ्या या महोत्सवात आगरी रूढी परंपरा, वारकरी दिंडी, भजन-कीर्तन, प्रबोधनपर व्याख्याने, स्थानिक कलावंतांचे विविध सांस्कृतिक कार्यक्रम, गुणवंतांचा सन्मान, आगरी खाद्यसंस्कृतीचे दर्शन अशा विविध उपक्रमांचा अंतर्भाव असतो.

यावेळी आ. रमेश पाटील, कार्यक्रमाचे अध्यक्ष दयानंद जी. चोरघे, स्वागताध्यक्ष यशवंत सोरे, कार्याध्यक्ष हनुमान पाटील, उपाध्यक्ष विजय पाटील, पंडित पाटील, अमर म्हात्रे, विजय जोशी, दिनेश पाटील, विष्णू म्हात्रे, चंद्रकांत पाटील, विवेक शेलार यांच्यासह विविध मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

#Nashik #Thane #महाराष्ट्र

दिन बंधू न्यूज शिवक्रांती टीव्ही संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 हा नंबर आपल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये ऍड करा व्हिडिओ बातमी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा कॉमेंट करा आयकॉन बेल दाबा आपल्याकडील व्हिडिओ फोटो बातमी पाठवा वाढदिवस जाहिरात पाठवा

HTML img Tag Simply Easy Learning
[gspeech-button]
HTML img Tag Simply Easy Learning
लिंगे उद्योग समूहाचा उपक्रम Simply Easy Learning
HTML img Tag Simply Easy Learning

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button